शेतातील केबल चोरणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

शेतातील केबल चोरणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळयात,मुद्देमालासह तिघांना ताब्यात घेऊन ३ गुन्हे केले उघड….

अमरावती(ग्रामीण प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक विशाल आंनद यांनी जिल्हयात होत असलेल्या शेतीपयोगी साहित्य व केबल चोरीचे घटनेच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखा अमरावती ग्रा. यांना जास्तीत जास्त गुन्हे उघडकिस आणुन सदर घटनेवर आळा घालण्याबाबत आदेशीत केले होते त्या अनुषंगाने दि. १३ डिसेंबर २०२४ रोजी स्थानिक गुन्हे शाखा अमरावती ग्रा चे पथकास गोपनिय माहीती मिळाली कि, तिन इसम त्यांचे मोटर सायकलवर प्लास्टीक पोत्यात तांबा तार भरुन विकी करीता कासदपुरा, अचलपुर परीससरात फिरत आहे.





अशा गोपनिय खबरेवरुन स्थागुशा पथकाने सदर इसमांचा कासदपुरा अचलपुर परीसरात शोध घेतला असता मिळालेल्या गोपनिय खबरेतील वर्णनाचे तिन्ही इसम त्यांचे HF DELUX कंपनीचे विनानंबर मोटर सायकलवर प्लास्टीक पोते घेवुन संशयितरित्या भंगार दुकानाकडे जाताना दिसुन आले. सदर इसमांना पंचासमक्ष ताब्यात घेवुन त्यांचे नाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव अनुक्रमे १) अविनाश सदाशिव इंगळे वय ३६ वर्ष रा. तळणी पुर्णा ता. चांदुरबाजार २) विजय किसनराव नांदणे वय २७ वर्ष रा. वासणी (बु) ता.अचलपुर ३) आकाश नारायण नांदणे वय २३ वर्ष रा. वासणी (बु) ता.अचलपुर यांना ताब्यात घेऊन त्याचेकडे असलेल्या प्लास्टीक पोत्याची पाहणी केली असता प्लास्टीक पोत्यात केबल जाळुन काढलेला अर्धवट जळालेला तांबा तार तसेच एक पेंचीस व नट खोलण्याचे दोन पाने दिसुन आले.



सदर इसमांना  गुन्हयासंबंधाने विचारपुस केली असता त्यांनी आधी उडवाउडवीचे उत्तरे दिली परंतु त्यांना पुन्हा विश्वासात घेवुन विचारपुस केली असता त्यांनी सांगितले कि, त्यांनी तिघांनी मिळून मागील काही महिण्यात रात्री दरम्यान शिरजगाव हददीतील रतनपुर सायखेडा, सोमठाणा तसेच पथ्रोट हददीतील पाचआंबा शेतशिवारातील शेतातुन केबल चोरुन आणला आणी सदर केबल जाळुन त्यातील तांबा तार काढुन विकी करीता घेवुन जात असल्याचे सांगितले. आरोपींनी दिलेल्या कबुली वरुन त्यांनी चोरी केलेल्या शेतातील घटनास्थळाची व कालवधीची पाहणी केली असता आरोपींनी खालील प्रमाणे गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले.०१) पो.स्टे. शिरजगाव ४८९/२४ कलम ३०३ (२) भा.न्या. संहिता०२) पो.स्टे. शिरजगाव २७९/२४ कलम कलम ३०३ (२) भा.न्या. संहिता ०३) पो.स्टे.पश्नोट ७५/२४ कलम ३७९ भां.द.वि.



यावरुन तिन्ही आरोपींकडुन वरील गुन्हयात चोरलेल्या केबल मधील जाळुन काढलेला तांबा तार कि. ९९००/- रु तसेच केबल चोरीसाठी वापरेलेली HF DELUX कंपनीची विनानंबर मोटर सायकल, एक पेंचीस, दोन पाने असा एकुण ८०,२००/- रु मुददेमाल जप्त करण्यात आला आहे. तिन्ही आरोपींना पुढील तपासकामी पोलिस स्टेशन शिरजगाव कसबा यांचे ताब्यात देण्यात आले असुन आरोपींकडुन अधिक गुन्हे उघडकिस येण्याची शक्यता आहे.

सदरची कामगिरी पोलिस अधिक्षक विशाल आनंद,अपर पोलिस अधिक्षक पंकज कुमावत आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरण वानखडे, पोलिस निरीक्षक अर्जुन ठोसरे यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा पथकाचे स.पो.नि. सचीन पवार पोलिस अंमलदार युवराज मानमोठे, रविंद्र व-हाडे, स्वप्नील तंवर, सागर नाठे, शांताराम सोनोने, चालक प्रशात राजेश यांनी केली.

 





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!