दोन संशयितांना ताब्यात घेऊन दुचाकी व घरफोडीचा गुन्हा गुन्हे शाखेने केला उघड….
घरफोडी आणि दुचाकी चोरीतील दोघे अमरावती गुन्हे शाखेच्या ताब्यात…
अमरावती (प्रतिनिधी) – घरफोडी आणि मोटारसायकल/ दुचाकी चोरीतील दोन अट्टल गुन्हेगारांना अमरावती ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने पकडुन पाच गुन्हे उघडकीस आणून २२ हजारांचा मुद्देमाल हा जप्त केला आहे. आरोपी – विठ्ठल जानराव खामट (वय ३० वर्ष) रा.शेरपूर, ता.आष्टी, जि.वर्धा आणि मंगेश तुळशीरामजी उइके (वय ३०) रा.मोर्डी, ता.जि.- छिंदवाडा, मध्यप्रदेश अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. यांच्यावर मोर्शी पोलिस ठाण्यात ४ आणि माहुली (जहागीर) पोलिस ठाण्यात १ असे पाच गुन्हे दाखल असल्याचे कारवाईत उघड झाले आहे.
या बाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पोलिस स्टेशन मोर्शी येथे (दि.२९जून) रोजी फिर्यादी अंबादास पांडूरंग धांडे, (वय ६५ वर्षे), रा.ऑरेंज सिटी ले आऊट, दिप कॉलनी, मोर्शी, ता.मोर्शी, जिल्हा अमरावती यांनी रिपोर्ट दिला की, त्यांचे ऑरेंज सिटी ले आऊट, दिप कॉलनी, मोर्शी येथील घरातून २८जून रोजी पहाटेच्या वेळी कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीची हिरो कंपनीची स्प्लेंडर मोटारसायकल क्र. एम.एच.२७ बि.एन. ८०५६ चोरून नेली. अशा फिर्यादिच्या तक्रारीवरून पोलिस स्टेशन मोर्शी येथे २९जून रोजी गुन्हा रजि. कमांक २७०/२०२४ कलम ३७९ भादवि अन्वये नोंद करून तो तपासात घेण्यात आला आहे.
मिळालेल्या गोपनीय माहीतीवरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने (दि.२९जून) रोजी सदर गुन्ह्यातील चोरीस गेलेली मोटारसायकल आरोपी विठ्ठल जानराव खामट (वय ३० वर्ष) रा.शेरपूर, ता.आष्टी, जि.वर्धा आणि मंगेश तुळशीरामजी उइके (वय ३०) रा.मोर्डी, तालुका/जिल्हा छिंदवाडा, मध्यप्रदेश यांचेकडून जप्त करून ताब्यात घेऊन तसेच मिळून आलेले दोन्ही आरोपी अमरावती जिल्ह्यातील नसल्याने त्यांची सखोल विचारपूस केली असता दोन्ही आरोपी मागील काही महिन्यांपासून अमरावती जिल्ह्यात वास्तव्यास असून काहीही कामधंदा करत नसल्याचे समजले. तसेच नमुद दोन्ही आरोपीतांनी मिळून अमरावती जिल्ह्यातील मोर्शी पोलिस स्टेशनच्या हद्दिमध्ये दि.२५जून रोजी रात्रीचे वेळी आष्टी रोडवरील ०२ घरफोड्या, फेब्रुवारी महिन्यात भाईपुर शेत शिवारातुन केबल वायर व उप जिल्हा रुग्णालय मोर्शी येथुन एका महीलेच्या पर्स मधुन पैशाची चोरी केल्याची तसेच पोलिस स्टेशन माहुली जहांगीर हद्दीतील सांवंगा आसरा गावातील आसरा माता मंदीर देवस्थानातुन दान पेटी फोडुन त्यातील अंदाजे ८,०००/- रू. ते १०,०००/- रू. चोरी केल्याची कबुली दिल्याने पोलिस अभिलेखावरील गुन्हयांची पाहणी केली असता अनेक गुन्हे उघडकीस आले आहेत.
वर नमुद आरोपीतांकडून हिरो कंपनीची स्प्लेंडर मोटार सायकल क्रमांक एम.एच. २७ बि.एन. ८०५६ किंमत २०,०००/- रू. ची, ०२ किलो तांब्याची तार किंमत १६००/रू. ची आणि नगदी ११८०/- रू. असा एकूण २२,७८०/- रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोन्ही आरोपीतांना जप्त मुद्देमालासह पोलिस स्टेशन मोर्शी यांचे ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास ठाणेदार पोलिस स्टेशन मोर्शी यांचे मार्गदर्शनाखाली सूरू आहे.
अशा प्रकारे सदरची कार्यवाही ही अमरावती जिल्ह्याचे पोलिस अधिक्षक विशाल आनंद, अप्पर पोलिस अधिक्षक पंकज कुमावत यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरण वानखडे यांचे नेतृत्वात पोलिस उपनिरीक्षक नितीन चुलपार, पोहवा रविंद्र बावणे, पोहवा बळवंत दाभणे, पोहवा गजेंद्र ठाकरे, पोहवा भुषन पेटे, पोका पंकज फाटे आणि चालक पोकों मंगेश मानमोडे यांनी केली आहे.