धारणी पोलिसांनी पकडला २६ लाखाचा सुगंधीत तंबाखु गुटखा…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

धारणी पोलिसांनी नाकाबंदी करुन पकडला अमरावती शहरात जाणारा सुगंधीत तंबाखु गुटख्याचा साठा….

धारणी(अमरावती प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, अमरावती ग्रामिण जिल्हयात असलेल्या अवैध धंद्यांचे समुळ उच्चाटन करण्याकरीता पोलिस अधिक्षक विशाल आनंद यांनी सर्व ठाणे प्रभारी यांना आदेशित केले होते त्याअनुषंगाने दिनांक १२ सपटेबर २०२४ रोजी पोलिस स्टेशन धारणी येथील डी बी पथक परीसरात पेट्रोलिंग करीत असतांना त्याना गुप्त बातमीदाराकडुन माहीती मिळाली की एका आयशर ट्रकमधे  ईंदोर मध्यप्रदेश येथुन अमरावती येथे कळमखार ते कुसुमकोट या रस्त्याने महाराष्ट्रात प्रतिबंधित अशा सुगंधीत गुटख्याची वाहतुक होणार आहे





अशा मिळालेल्या गुप्त बातमी वरुन कळमखार ते कुसुमकोट रोडवर नाकाबंदी करुन मिळालेल्या माहीतीनुार आयशर क्र.एम.एच.१२ टी.डी. ७३०१ वाहन येतांना दिसले त्यास पंचासमक्ष थांबविले असता सदर वाहनाचा महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत गुटखा व सुगंधीत तंबाखुचा वास आल्याने सदर वाहन हे पोलिस स्टेशनला आणुन शासकीय पंचासमक्ष तपासणी केली असता सदर वाहनामध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतीबंधीत केलेला गुटखा व सुगंधीत तंबाखु कि.२६,०५,५००/- रु, आयशर कि १२,००,०००/- रु. असा एकुण ३८,०५,५००/- रु. मुद्येमाल जप्त करण्यात आला



सदर गुन्हयात आरोपी १) जयेश निरंजन मिश्रा, वय ३० वर्ष, रा. विश्वास नगर ग्रामपंचायत, जि. इंदोर २) रामलाल चरणदास मेहरा, वय २६ वर्ष, रा. विश्वास नगर ग्रामपंचायत, जि. इंदौर ३) सुनिल निशाद ऊर्फ चोधर रा. इंदौर ४) अमित गुप्ता रा. इंदौर ५) दिनानाथ ओझा रा. इंदौर ६) विक्रम ऊर्फ विक्की मंगलानी रा. रामपुरी कॅम्प अमरावती ७) सय्यद जुनेद सय्यद जब्बार रा एसटी कॉलनी अमरावती ८) शेख अमिन शेख नाजीम रा. जुनी वस्ती बडनेरा यांचे विरुध्द पोलिस स्टेशन धारणी येथे गुन्हा नोंद करण्यात आला असुन सदरचा प्रतिबंधीत गुटखा इंदौर येथुन अमरावती येथे काही इसमांकडे पोहचविण्यात येणार होता असे ताब्यातील आरोपींना सांगितले आहे. पुढील तपास धारणी पोलिस करीत आहेत.



सदरची कार्यवाही पोलिस अधिक्षक विशाल आनंद,अपर पोलिस अधिक्षक पंकज कुमावत,सहा पोलिस अधिक्षक तथा प्रभारी उपविभागिय पोलिस अधिकारी, अचलपुर शुभम कुमार यांचे मार्गदर्शनात अशोक जाधव, ठाणेदार, पो.स्टे. धारणी, सतिश झाल्टे, पोउपनि पो.स्टे. धारणी, पोलिस अंमलदार नितीन बौरसिया, शेख गणी, राम सोळंके, मोहीत आकाशे, जगत तेलगोटे, पंकज वानखडे यांनी केली आहे.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!