
मारहान करुन जबरीने रोकड लुटणारे दोन आरोपी गुन्हे शाखेने केले जेरबंद…
धारणी हद्दीत मायक्रो फायनान्स कंपनीची रोकड जबरीने लुटणारे दोन आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात,एक आरोपी फरार….
अमरावती(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि(९)रोजी यातील तक्रारदार पवनकुमार मोरे रा. पंधाना (मध्यप्रदेश) हे त्याचे मोटर सायकलने चेंडो ते दाबियाखेडा रोड, धारणी येथुन स्वतंत्र मायको फायनान्स लिमी. कंपनीचे नगदी ७४,८००/- रु घेवुन जात असता ग्राम जामपाणी गावाजवळ कपडा बांधुन असलेल्या काही अज्ञात इसमांनी तक्रारदार यांना काठी मारुन मोटर सायकलचे खाली पाडुन जखमी केले व त्यांचे कडे असलेले नगदी ७४,८००/- रु हिसकावुन जंगल मार्गाने पळुन गेले होते.अशा त्यांचे तक्रारीवरुन पो स्टे धारणी येथे अप क्र.३६६/२४ कलम ३९४,३४ भादंवि चा गुन्हा दाखल करण्यात आला होता.


सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिस अधिक्षक विशाल आंनद यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरण वानखडे यांना गुन्हा उघडकिस आणुन आरोपींना अटक करणेबाबतचे आदेश दिले होते. त्याअनुषंगाने स्थागुशाचे पथक घटनेच्या दिवशी पासुन पोलिस स्टेशन धारणी येथील अधिकारी अंमलदार याचेसह संयुक्तरित्या आरोपींचा शोध घेणे कामी धारणी हद्दीत ठान मांडुन बसले असता पथकाने दिनांक १२/०६/२०२४ रोजी मिळालेल्या गोपनिय खबरेवरुन तसेच तांत्रिक पध्दतीने तपास करुन सदर गुन्हा हा सुरेशसिंग गुलाबसिंग सिसोदीया रा. बारातांडा शेतशिवार याने त्याचे साथीदारासह मिळुन केल्याचे निष्पन्न केले. स्थागुशाचे पथक व स्थानिक पोलिस स्टेशन धारणी येथील पो स्टाफ असे गुन्हयातील आरोपी सुरेशसिंग गुलाबसिंग सिसोदीया वय ३९ वर्ष, रा. बारातांडा (शेतशिवार) याचे बारातांडा येथील शेतात असलेल्या घराजवळ गेले व तेथे सापळा लावला असता सुरेशसिंग सिसोदीया याला पोलिसांची चाहुल लागताच तो जंगलात पळुन जावु लागला त्यास पो स्टाफचे मदतीने ताब्यात घेवुन त्यास चेंडो ते दाबियाखेडा रोडवरील गुन्हयासंबंधाने विचारपुस केली असता त्याने उडवाउडवीचे उत्तरे देवुन दिशाभुल करण्याचा प्रयत्न केला परंतु त्यास विश्वासात घेवुन विचारपुस केली असता त्याने त्याचे साथीदार रमेश मुन्ना सिसादीया व आणखी एक साथीदार (फरार) यांचेसह मिळुन रमेश सिसोदीया याचे होन्डा शाईन मोटर सायकलने दि.०९/०६/२०२४ रोजी चेंडो ते दाबियाखेडा रोडवर जावुन झुडपात दबा धरुन तेथुन जाणा-या एका मोटर सायकल चालकास काठीने मारहाण करुन पैसे हिसकावुन नेले होते अशी कबुली दिली.

वरुन सदर गुन्हयातील दुसरा आरोपी नामे रमेश मुन्ना सिसोदीया वय २७ वर्ष रा. बारातांडा (शेतशिवार) यास त्याचे राहते घरुन ताब्यात घेतले. दोन्ही आरोपींचे ताब्यातुन गुन्हयातील चोरी केलेले नगदी ५२,०००/- रुपये तसेच गुन्हयात वापरलेली होन्डा शाईन मोटर सायकल असा एकुण १२२,०००/- रु माल जप्त करुन दोन्ही आरोपींना पुढील तपासकामी पो स्टे धारणी यांचे ताब्यात देण्यात आले.तसेच गुन्हयातील फरार आरोपींचा शोध सुरु आहे.

सदरची कामगिरी पोलिस अधिक्षक विशाल आनंद,अपर पोलिस अधिक्षक,पंकज कुमावत यांचे मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा किरण वानखडे,. यांचे नेतृत्वात,पोलिस निरीक्षक.अशोक जाधव, ठाणेदार पो स्टे धारणी, स्थागुशा पथक सहा. पोलिस निरीक्षक सचिन पवार, पोलिस अंमलदार युवराज मानमोठे, रविंद्र व-हाडे, स्वप्नील तंवर, सागर नाठे, शांताराम सोनोने चालक श्याम मते व पो स्टे धारणी पोलिस अंमलदार विनोद धर्माळे, प्रविण बोंडे, जगत तेलगोटे, जिवन गोळंबे यांनी केली.


