कुन्हा पोलिसांनी अवैधरित्या देशी बनावटीचे पिस्टल व तलवारी सह ७ संशईत ईसमांना घेतले ताब्यात…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

अवैधरित्या देशी बनावटीचे पिस्टल जिवंत काडतूस व धारदार तलवार बाळगनारे इसम केले गजाआड,कुन्हा पोलिसांची कारवाई….

कुन्हा(अमरावती)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, जिल्हयात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, तसेच अवैद्य धंद्यांचे समुळ उच्चाटन व्हावे यासाठी पोलिस अधिक्षक  विशाल आनंद यांचे आदेशाने बेधडक कारवाई सुरू आहे.तसेच  पोलिस ठाणे प्रभारी अधिकारी व अंमलदार यांना अवैद्यरित्या शस्त्रे बाळगणारे सराईत गुन्हेगारांची माहिती घेणेबाबत तसेच जिल्हयातील औद्योगीकदृष्टया प्रगत असलेल्या शहरांमध्ये परराज्या व बाहेरील जिल्हयातुन शस्त्रांची देवाण-घेवान करणारे इसमांचा कसोशिने शोध घेणेबाबत सुचना दिलेल्या होत्या





त्याअनुषंगाने दिनांक ११/०६/२०२५ रोजी रात्रीचे सुमारास मिळालेल्या गुप्त माहितीनुसार ग्राम कौडण्यपुर येथील अंजनसिंगी टी पॉइंट लगत असलेल्या शेतात काही इसम देशी बनावटीचे पिस्टल व तलवारी बाळगूण असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली होती. त्यानुसार पथकाने सापळा रचून लपत छपत जावून पिस्टल  व तलवारी बाळगुन असलेल्या इसमांवर छापा टाकला.



सदरचे इसम पोलिसांना पाहुन सतर्क झाले व सावरासावरीचा प्रयत्न करू लागले होते त्यादरम्यान पोलिसांनी सदर इसमाना जागेवरच ताब्यात घेवून त्यांना त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव १) शेख शानु शेख जब्बार वय ३५ वर्षे रा. इतवारा बाजार, वर्धा २) अनिल सुरेश परीयाल वय ४२ वर्षे रा. महादेवपुरा, वर्धा ३) शेख शाहरूख शेख रउफ वय ३० वर्षे रा. महाराणाप्रता वार्ड, आर्वी ४) मोहमद जाफर मोहमद यासीन वय ३० वर्षे रा. गौरक्षण वार्ड, आर्वी ५) आदीत्या किशोर डाकोडे वय २० वर्षे रा. देउरवाडा ता. आर्वी जि. वर्धा ६) शेख साबीर शेख कदीर वय ३५ वर्षे रा. जनता नगर, आर्वी व ७) प्रतिक बाबाराव ठाकरे वय ३२ वर्षे रा. रेल्वे स्टेशन, वर्धा असे सांगीतले व त्यांना येथे हजर असन्याचे कारण विचारले असता त्यांनी उडवाउडवीचे उत्तरे देत होते. सदरचे इसम हे बाहेर जिल्हयातील असल्याने व त्यांचे वागनुक संक्षयास्पद वाटत असल्याने शेतात असलेल्या टिनाची खोली व खोली मागील शेताची पाहनी केली असता सदर शेतामध्ये दोन धारदार तलवारी मिळून आल्या व टिनाच्या खोली समोर उभ्या असलेल्या चारचाकी वाहन क. एम. ३१ सि.एन. ३५९९ च्या समोरील डॅशबोर्ड वरील डिक्कीमध्ये एका कापडी पिशवीत एक अग्नीशस्त्र (देशी बनावटीचे पिस्टल) व एक मॅक्झीन ज्यात दोन जिवंत काडतुस व रोड लगत उभी असलेली टु व्हिलर मोपेड क. एम. एच. २७ बि.यु. ७२७९ ज्याच्या साईड गार्डला एक लोखंडी रॉड तसेच टिनाच्या खोली समोर एक बाशाची काठी व दोन लाकडी दांडके असे दिसून आल्याने पंचासमक्ष जप्त करण्यात आले.



सदर ठिकाणावरूण एक अग्नीशस्त्र (देशी बनावटीचे पिस्टल) व एक मॅक्झीन किंमत अंदाजे २०,०००/- रू. व दोन जिवंत काडतुस किं. अं. २००० /- रू. दोन तलवारी किं. अं. ४०००/- रू., एक लोखंडी रॉड किं.अं. ५००/-रू., एक बाशाची काठी किं.अं. १०० /- रू. व दोन लाकडी दांडके किं.अं. ३००/- रू., एक चारचाकी वाहण क. एम. ३१ सि.एन. ३५९९ किं.अं. २,००,०००/- रू. व टु व्हिलर मोपेड क्र. एम. एच. २७ बि.यु. ७२७९ किं.अं. ६०,००० /- रू. असा एकूण २,८६,९०० /- रू. चा मुद्देमाल पंचासमक्ष जप्त करण्यात आला. सदर इसमांवीरुध्द विनापरवाना बेकायदेशीररित्या अग्नीशस्त्र व धारदार शस्त्र बाळगले प्रकरणी पोलिस स्टेशन कुहा, अमरावती ग्रामीण येथे कलम २२३, ३(५), भारतीय न्याय संहिता सहकलम ३,४, २५ भारतीय हत्यार कायदा सहकलम १३५ महाराष्ट्र पोलीस कायदा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर आरोपींच्या कब्जातुन मिळुन आलेले अग्नीशस्त्र (देशी बनावटीचे पिस्टल), दोन जिवंत काडतुस व दोनी धारदार तलवारी मिळुण आल्याने सदर अवैद्य शस्त्र ग्राम कौडण्यपुर येथे कोठुन आले याबाबत पोलिस  पुढील तपास करत आहे.

सदरची कार्यवाही पोलिस अधिक्षक. विशाल आनंद, अपर पोलिस अधिक्षक पंकज कुमावत, उपविभागीय पोलिस अधिकारी चांदुर रेल्वे अनिल पवार  यांचे मार्गदर्शनात ठाणेदार पोलिस स्चेशन कुन्हा सपोनी अनुप वाकडे, पोउपनि विलास थुल,सफौ सोमेश्वर सपाटे, पोहवा योगेंद्र लाड,अनिल निघोट, उमेश वाघमारे, चापोहवा ज्ञानेश्वर देवतळे, पोशि सागर निमकर, दर्पन बनसोड, अक्षय विरघट,कुणाल भोयर यांनी केली





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!