कुन्हा पोलिसांनी MD drug बाळगणार्यास केले जेरबंद….

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

कुन्हा पोलिसांची धडाकेबाज कामगिरी अंमली पदार्थ MD drug सह एकास घेतले ताब्यात….

कुन्हा(अमरावती)प्रतिनिधी – नशेच्या आहारी जाणारी युवा पिढी व  तसेच त्यांना अंमली पदार्थाची विक्री करणारे व बाळगणारे यांच्यावर कारवाई करण्याचे  पोलिस अधिक्षक विशाल आनंद,अपर पोलिस अधिक्षक पंकज कुमावत यांनी संपूर्ण जिल्हयातील प्रभारींना आदेशीत केले होते





त्याअनुशंगाने दि.१९/०६/२०२५ रोजी पोलिस स्टेशन कुन्हा हददीत पेट्रोलिंग करीत असतांना माहिती मिळाली की, चमन नगर कुन्हा येथे एक ईसम त्याचे घरात एम.डी. नावाचे अंमली पदार्थ विक्री करण्याच्या उदद्देशाने बाळगुण आहे. अशी खात्रीलायक बातमी मिळाल्यावरून नमूद ठिकाणी जाउन सापळा रचून पो. स्टाफच्या मदतीने सदर ईसमास ताब्यात घेउन त्याचे नाव गाव विचरले असता त्याने त्याचे नाव आरीफ खा आबीद खा वय ४५ वर्ष रा. चमणनगर, कुन्हा ता. तिवसा जि. अमरावती असे सांगितले.



पंचासमक्ष त्याच्या घराची झडती घेतली असता त्यांचे घरातील हॉल मध्ये असलेल्या कुलरच्या एक प्लास्टीक टोकरीमध्ये एक राजा छाप तंबाखु पुडीमधील दोन प्लास्टीक पुडयांमध्ये पांढऱ्या रंगाचे स्फटीक स्वरूप पदार्थ मिळुन आल्याने आम्ही सदर ईसमास सदर पदार्थ काय आहे असे विचारले असता त्यानी ते एम.डी. (मॉफेड्रॉन) नावाचे ड्रग्स असल्याचे असुन ते नशा करण्याकरीता वापरला जातो असे  सांगीतले. यावरून पंचांसमक्ष  दोन्ही प्लॅस्टिक पुड्या अंमली पदार्थासह वजन केले असता, ३.०२० ग्रॅम एम.डी इग्ञ्ज, किं. अं.१५,१०० रू चा माल मिळुन आल्याने सदर आरोपीस ताब्यात घेउन त्याच्यविरूद्ध पोलिस स्टेशन कुन्हा येथे अप क. २३७/२५ कलम ८ (क), २१ (ब) गुंगीकारक औषधीद्मव्य आणि मनोव्यापारावर परीणाम करणारे पदार्थ अधिनीयम १९८५ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असुन पुढील तपास सुरू आहे.



सदरची कामगिरी पोलिस अधिक्षक विशाल आनंद.अपर पोलिस अधिक्षक पंकज कुमावत,उपविभागीय पोलीस अधिकारी, चांदुर रेल्वे अनिल पवार यांच्या मार्गदर्शनात सपोनि अनुप वाकडे, ठाणेदार, पो.स्टे. कुन्हा, पोउपनि विलास थुल, पोहवा योगेंद्र लाड, अनिल निंघोट,उमेश वाघमारे, पोशि हेमंत डहाके, मपोशि मेघा बापट, चालक पोहवा  ज्ञानेश्वर देवतळे, चालक पोशि सागर निमकर यांनी केलेली आहे.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!