विटाने जखमी करुन लुटणारे स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

लोणी येथे दाम्पत्याला विटाने मारुन जखमी करुन लुटणार्या आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद….

अमरावती(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस स्टेशन लोणी येथे दि 31 मार्च 2025 रोजी तक्रारदार सौ. चित्रा सिध्दार्थ मस्के वय 21 वर्ष, रा. ब्राम्हणगांव ता.पुसद जि. यवतमाळ यांनी तक्रार दिली कि, त्या त्यांचे पती व लहान मुलीसह दि. 30 रोजी सायंकाळी 06.00 वा. पतीचे मोटार सायकलने बडनेरा येथे पतीचे मित्र मयुर नारळे यांचे घराचे वास्तु शांतीचे कार्यक्रमांकरीता गेले होते. कार्यक्रम आटपुन ते पतीसह मोटार सायकलने बडनेरा येथुन धानोरा फशी कडे जात असतांना लोणी गावचे पुलाजवळ रात्री 10.45 वा. दरम्यान त्यांचे मागुन एक मोटार सायकल आली त्याचे वर दोन इसम बसलेले होते. त्यांनी एकदम त्यांची मोटार सायकल तक्रारदार यांचे मोटार सायकल ला आडवी केली व त्या मोटार सायकल वर मागे बसुन असलेला इसम हा खाली उतरला व तक्रारदार यांचे पतीला तेथीलच विटीचा तुकडा उचलुन डोक्यावर, कपाळावर, गालावर मारले वरुन तक्रारदार यांचे पती खाली कोसळले व त्यांचे डोक्यातुन रक्त निघु लागले दरम्यान मोटार सायकल चालकाने त्याचे साथीदारास तिच्या गळयातील पोत घे असे म्हटले वरुन त्याने तक्रारदार यांचे गळयातील पोत हिसकावुन घेवुन दोघेही त्यांचे मोटार सायकलवर बसुन अकोला वाशिम रोडने पळुन गेले त्यानंतर तक्रारदाराने आरडाओरड केल्याने तेथे लोक जमा झाले व तक्रारदार यांचे पतीला दवाखान्यात नेले आणि तक्रारदार या पो. स्टे.लोणी येथे तक्रार देणे करीता आल्या. अशा तक्रारदार यांचे तक्रारीवरुन पो.स्टे.लोणी येथे अप. क्रमांक 90/2025 कलम 126(2),309 (6), 3 (5) बी.एन.एस. प्रमाणे नोंद करण्यात आला आहे.





सदर गुन्हयांचे गांभीर्य लक्षात घेता पोलिस अधिक्षक विशाल आनंद यांनी सदर गुन्हा उघड करण्याकरीता स्थानिक गुन्हे शाखा यांना सुचना केल्या होत्या.त्या अनुषंगाने सदर गुन्हयाचा समांतर तपास करीत असतांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला  तांत्रीक पुराव्या वरुन तसेच गुप्त बातमीदाराकडुन खात्रीलायक बातमी मिळाली कि, सदरचा गुन्हा माचीस रा. बडनेरा याने केला असल्याचे सांगीतले



यावरुन सदर ईसमास बडनेरा येथे बस स्थानक परीसरात पो. स्टॉप चे मदतीने सापळा रचुन प्रमोद ऊर्फ माचीस संभाजीराव धोरपडे वय 30 वर्ष रा. हमालपुरा, यवतमाळ रोड, बडनेरा यास ताब्यात घेतले व  त्यास सदर गुन्हया संबंधाने विचारपुस केली असता आधी उडवाउडवीचे उत्तरे दिली वरुन त्यास अधिक विचारपुस केली असता त्याने सदर गुन्हा हा त्याचा साथीदार दिलीप ऊर्फ पांडु बाबुराव अंबोरे वय 26 वर्ष रा. बोरगांव (मंजु) ता. अकोला ह.मु. पवन नगर झोपडी, यवतमाळ रोड, बडनेरा याचे सोबत त्याचे स्प्लेंडर मोटार सायकलने केला असल्याचे सांगीतले यावरुन दिलीप ऊर्फ पांडु बाबुराव अंबोरे वय 26 वर्ष रा.बोरगांव (मंजु) ता. अकोला ह.मु. पवन नगर झोपडी, यवतमाळ रोड, बडनेरा यास पो.स्टॉप चे मदतीने ताब्यात घेवुन सदर गुन्हया संबंधाने विचारपुस केली असता त्याने सदर गुन्हा हा त्याचा मित्र माचीस याचे सह केला असल्याचे सांगीतले. वरुन त्याची काळया रंगाचे व त्याचेवर लाल पटटे असलेली स्लेंडर मोसा क्रमांक नसलेली किंमत अंदाजे 50,000/-रु ची आरोपी दिलीप ऊर्फ पांडु बाबुराव अंबोरे याचे कडुन जप्त करण्यात आली आहे. तसेच सदर आरोपींनी पुढील कार्यवाही कामी पो.स्टे. लोणी यांचे कडे सोपविण्यात आले आहे.



सदरची कार्यवाही पोलिस अधिक्षक  विशाल आनंद, अप्पर पोलिस अधिक्षक पंकज कुमावत यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक किरण वानखडे स्थानिक गुन्हे शाखा अमरावती (ग्रामीण) यांचे नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक नितीन इंगोले, पोहवा सुनील महात्मे, सैय्यद अजमत, सुधीर बावणे, निलेश डांगोरे, चेतन दुबे, चापोहवा  प्रज्वल राऊत सर्व नेमणुक स्था.गु.शा. अमरावती (ग्रामीण) तसेच पो.स्टे. सायबर अमरावती (ग्रामीण) येथील पोहवा सागर धापड, शिवा शिरसाठ यांनी केली.

 





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!