
अट्टल गुन्हेगार ताब्यात घेऊन स्थानिक गुन्हे शाखेने ३ गुन्हे केले उघड,९ लाखाचा मुद्देमाल केला हस्तगत….
घरफोडी करणारे अट्टल गुन्हेगार स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेऊन,तीन घरफोडीचे गुन्हे केले उघड….
अमरावती(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस स्टेशन मोर्शी येथे दि. ०४ मे २०२५ रोजी तक्रारदार राजेश बापुराव संतापे, वय ५० वर्षे, रा. व्यास लेआउट, शिंभोरा रोड मोर्शी ता. मोर्शी, जि. अमरावती यांनी तक्रार दिली की, दि ०४ रोजी रात्री ००.३० वा. दरम्यान ते त्यांचे घराला कुलूप लावुन जुन्या घरी झोपायला गेले व सकाळी ०८.०० वा दरम्यान घरी परत आले असता त्यांचे घराचे कुलूप तुटलेले दिसले व त्यांचे कपाटातुन सोन्याचे दागिणे, किंमत ७,१७,५००/- रू चा माल कोणीतरी अज्ञात चोराने कपाटातुन चोरून नेला अशा तक्रारीवरुन अप क २५१/२५ कलम ३०५, ३३१(४) बोएनएस अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता


अमरावती जिल्हयात वाढत्या घरफोडीच्या घटना पाहता, प्रभारी पोलिस अधीक्षक, पंकज कुमावत यांनी सदरचे गुन्हे उघडकिस आणनेबाबत आदेशीत केले होते त्याअनुषंगाने दि ०६ मे २०२५ रोजी सदर गुन्हयाबा समांतर तपास करीत असतांना, गुप्त बातमीदाराकडून खात्रीलायक बातमी मिळाली की, मौर्शी हद्दीतील सिंभोरा रोडवरील कॉलनीमध्ये झालेली घरफोडी ही अट्टल चोरटा नरेन्द्र कोडापे याने केली असुन सध्या तो मोर्शी परिसरातच गुन्हे करण्याचे उद्द्देशाने मोटार सायकलवर फिरत आहे. मोर्शी हद्दीत नरेंद्र कोडापे चा शोध घेत असतांना पाव्य फाट्यावर एका स्प्लेंडर मोटार सायकलवर नरेंद्र कोडापे हा त्याचे एका साथीदारासह पाळा दिशेने जात असतांना रात्री दरम्यान दोन्ही इसमांना मोटार सायकलसह ताब्यात घेवुन त्यांना त्यांचे नाव गांव विचारले असता, त्यांनी त्यांची नावे १) नरेन्द्र नथ्युजी कोडापे, वय ३६, रा. मालखेड, ता. वरुड, जि. अमरावती आणि २) प्रकाश उकंटराव रंगारे, वय २६ वर्षे, रा. परासीया, ता. परासिया, जिल्हा छिन्दवाडा, मध्यप्रदेश असे सांगितले. त्यांना सदर गुन्हयाबाबत विचारपुस केली असता, त्यांनी प्रथम उडवाउडविची उत्तर दिले. त्यांना विश्वासात घेवुन सखोल विचारपुस केली असता, त्यांनी दोघांनी मिळून काही दिवस अगोदर बडनेरा येथुन चोरुन आणलेल्या स्लेंडर मोटार सायकलचा वापर करून मोर्शी मधील सिंभोरा रोडवरील कॉलनी मध्ये एका बंद घराचे कुलुप कोंडा तोडुन सोन्याचे दागिने व एक एसबीआयचे एटीएम कार्ड च्या चोरीची कबुली दिली.

यावरुन त्यांच्या अंगझडती दरम्यान नरेंद्र कोडापे याचेकडुन एका पाउच मध्ये असलेले व गुन्हयात चोरीस गेलेल्या मुद्देमालापैकी १) पिवळया धातुच्या सोन्याच्या ०२ बांगडया, २) एक पिवळया धातुची सोन्याची लांब पोत, ३) एक पिवळया धातुच्या सोन्याचा नेकलेस, ४) पिवळया धातुच्या सोन्याचा लॉकेट असलेला लहाण गोप, ५) पिवळया धातुच्या सोन्याचा मोठा गोप, ६) एक पिवळ्या धातुच्या सोन्याची आंगठी ज्यावर R लिहीलेले असे एकुण वजन अंदाजे १०३.७७ ग्रॅम, किं.८,६३,५५२/- रु ये सोन्याचे दागिणे जप्त करण्यात आले. दरम्यान नरेंद्र कोडापे हा चो-या करुन रात्रीदरम्यान त्याचे साथीदारासह करजगांव येथील महेंद्र निस्वादे याचे किंग हॉटेल येथे थांबत असल्याचे व चोरीच्या मुद्देमालापैकी एक अंगठी ही महेंद्र निस्यादे यास दिल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने महेंद्र विठोबा निस्वादे, वय ४०, रा. करजगांव, ता. वरुड, जि अमरावती यास ताब्यात घेऊन त्याचे ताब्यातुन एक पिवळ्या धातुची सोन्याची अंगठी वजन अं ४ ग्राम याप्रमाणे चोरीस गेलेल्या मुद्देमालापैकी सोन्याचे दागिणे एकुण वजन १०७.७७ ग्राम, एकुण किंमत ९,००,०२८/- रु चा माल जप्त करण्यात आला आहे.तसेच त्यांनी दिलेल्या कबुलीवरुन पोलिस स्टेशन हट्टीतील घरफोडीचे दोन गुन्हे आणि अमरावती शहर हद्दीतील पो स्टे बडनेरा येथील मोटार सायकल चोरीया एक गुन्हा याप्रमाणे पोलिस अभीलेखावरील खालील नमुद गुन्हे उघडकीस आणण्यात आले आहेत.-

१) पो स्टे मोर्शी अप क २५१/२५ कलम ३०५, ३३१ (४) बीएनएस २) पो स्टे वरुड अप क ३०५/२५ कलम ३०५(अ), ३३१ (४) बीएनएस ३) पो स्टे वरुड अप क ३२२/२५ कलम ३०५ (अ), ३३४(१) बीएनएस ४) पो स्टे बडनेरा अप क १७९/२५ कलम ३०५ (व) बीएनएस असे एकुण ०४ गुन्हे उघड करण्यात आले असुन त्यांचे ताब्यातुन सोन्याचे दागिणे एकुण वजन १०७.७७ ग्राम, एकुण किंमत ९,००,०२८/-, नगदी १७,०००/-, मोटर सायकल, कि.अं. ४०,०००/- रु आणि एक मोबाईल, किं. अं. १०,०००/- रु असा एकुण ९,६८,०२८/- रु चा मुददेमाल जप्त करून आरोपींना मुद्देमालासह पुढील कारवाई साठी पोस्टे मोर्शी यांचे ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कार्यवाही प्रभारी पोलिस अधिक्षक पंकज कुमावत यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरण वानखडे यांचे नेतृत्वात पोउपनि सागर हटवार,पोहवा गजेंद्र ठाकरे, बळवंत दाभणे, रविंद्र बावणे, भुषण पेटे,पोशि पंकज फाटे, चेतन गुल्हाणे, सागर धापड, रितेश गोस्वामी, शिवा शिरसाठ, चालक निलेश अवांडकर तसेच पो स्टे मोर्शी येथील पोउपनि अमोल बुरकुल,सफौ वाघमारे,पोशि स्वप्निल बायस्कर, छत्रपती करपते यांनी केली


