अमरावती LCB ने दोन देशी कट्ट्यासह दोघास घेतले ताब्यात….
स्थानिक गुन्हे शाखेने विधानसभा निवडनुकीच्या अनुषंगाने दोन वेगवेगळ्या कार्यवाहीत ०२ देशी कट्टे केले जप्त…..
अमरावती(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,आगामी काळात पार पडणा-या महाराष्ट्र विधानसभा निवडणुक-२०२४ दरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवु नये तसेच निवडणुक ही निष्पक्ष व भयमुक्त वातावणात पार पडावी याकरीता अमरावती ग्रामिण कायक्षेत्रात विशेष अभियान राबवून अवैध शस्त्र विक्री/बाळगणे, अवैध दारू विक्री, वाहतुक ई. प्रकारावर पुर्णतः आळा घालण्याबाबत पोलिस अधिक्षक विशाल आनंद यांनी आदेशित केले होते
त्याअनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेची वेगवेगळी पथक तयार करुन त्यांना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक यांनी योग्य त्या सुचना देऊन रवाना केले असता दि. ०२/११/२०२४ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पो.स्टे. मोर्शी हद्दीत गस्त करित असतांना गुप्त बातमीदारा कडुन माहीती मिळाली की, रेकॅार्डवरील गुन्हेगार राजेश पंजाबसिंग भादा, वय ३४ वर्ष, रा. रोहना, जि. बेतुल (म.प्र.),ह. मु.हिवरखेड, ता. मोर्शी हा हिवरखेड येथील त्यांचे राहत्या घरी अवैधरित्या विनापरवाना देशी बनावटीची पिस्तुल सदृश्य लोखंडी देशी कट्टा बाळगुन आहे.
सदरची माहीती प्राप्त होताच पथकाने त्वरीत हिवरखेड गाठुन नमुद आरोपीच्या घराची झडती घेतली असता त्याचे ताब्यातुन १ देशी कट्टा किं. २५,०००/- रूचा मिळुन आला सदर आरोपी विरूध्द पो.स्टे. मोर्शी येथे गुन्हा नोंद करण्यात आला असुन पुढील तपास मोर्शी पोलिस करित आहेत.
त्याचप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पो.स्टे. पथ्रोट हद्दीत गस्त करित असतांना गुप्त बातमीदारा कडुन माहीती मिळाली की, रेकॅार्डवरील गुन्हेगार सादीक खान साबीर खान, वय २९, रा. अजीजपुरा, अंजनगाव हा त्याचे जवळ अवैधरित्या विनापरवाना लोखंडी देशी कट्टा बाळगुन आहे अशी माहीती प्राप्त होताच पथकाने त्वरीत नमुद ईसमास शिंदी फाटयावर थांबवुन त्याची झडती घेतली असता त्याचे ताब्यातुन १ देशी कट्टा व ०२ जिवंत काडतुस जप्त करण्यात आले आहे. आरोपी विरूध्द पो.स्टे. पथ्रोट येथे गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पथ्रोट पोलिस करित आहेत.
सदरची कारवाई पोलिस अधिक्षक विशाल आनंद, अपर पोलिस अधिक्षक,पंकज कुमावत यांचे मागदर्शनात किरण वानखडे, पोलिस निरीक्षक स्था.गु.शा. यांचे नेतृत्वात पोउपनि. सागर हटवार,नितीन इंगोले, पो. अमंलदार गजेन्द्र ठाकरे, रविन्द्र बावणे, पंकज फाटे, त्र्यंबक मनोहर, सुनिल महात्मे, सै. अजमत, निलेश डांगोरे यांचे पथकाने केलो आहे.