
मित्राच्या पत्नीबरोबर असलेल्या अनैतिक संबंधातुन मित्रानेच केला मित्राचा खुन,आरोपी अटकेत…
अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या इसमाचा खुन करणाऱ्या आरोपीस तळेगाव पोलिसांनी तात्काळ अटक करुन गुन्हा केला उघड…
तळेगाव दशासर(अमरावती)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, पोलिस स्टेशन तळेगाव दशासर हद्दीत निमगव्हाण फाट्या जवळ स्कुटी क्रमांक एच एच २७सी. आर. ३७५० वर एक ईसम रक्तात पडुन असल्याची माहिती पो.स्टे. तळेगाव यांना दि २९ जाने चे रात्री ९.३० वा. प्राप्त झाली होती. तळेगाव पोलिसांनी त्वरीत घटनास्थळी दाखल होवून पाहाणी केली असता अज्ञात आरोपीने मृतक मनोज वामणराव नागापुरे वय ४० वर्ष, रा. तळेगाव दशासर याचे डोक्यावर जड वस्तुने जबर प्रहार करुन ठार मारल्याचे प्रथम दर्शनी दिसुन आले. सदर घटनेचे अनुषंगाने मृतक यांचा भाऊ सुनिल वामनराव नागपुरे, रा. तळेगांव यांचे तक्राररीवरून पो.स्टे. तळेगांव येथे खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला होता


सदर घटनेचे गांभीर्य ओळखुन पोलिस अधिक्षक विशाल आनंद यांनी तात्काळ भेट देऊन हा गुन्हा उघडकिस आणण्यासाठी स्था.गु.शा. व पो.स्टे. तळेगाव येथील पोलिस अधिकारी यांना योग्य मार्गदर्शन केले त्यानुसार गोपनीय माहीतीनुसार गुन्हयातील आरोपीस निष्पन्न करुन अटक करणेकामी पो.स्टे. तळेगाव व स्थानिक गुन्हे शाखा, अमरावती ग्रामीण येथील पथके तयार करण्यात आली.पोलीस पथकाने सदर गुन्हयाचा तपास करीत असतांना गोपनिय माहीती प्राप्त झाली की, सदर गुन्हा गावातीलच एका व्यक्तीने केला आहे वरून संशयीत म्हणुन उमेश शिवा शिंदे यास ताब्यात घेवुन विचारपुस केली असता त्यांने खुनाच्या गुन्हयाची कबुली दिली तसेच मृतक मनोज वामणराव नागापुरे वय ४० वर्ष, रा. तळेगाव दशासर याची पत्नी हीचे उमेश शिवा शिंदे याचे सोबत अनैतीक संबंध होते व मृतक हा त्यांचे अनैतीक संबंधामध्ये अडसर ठरत होता तसेच याच कारणावरून तो आपल्या पत्नीस मारहाण करित होता म्हणुन आरोपी उमेश शिवा शिंदे रा. तळेगाव याने घटनेच्या दिवशी मृतक यास दारु पिण्याचे बहाण्याने त्याचे शेतात नेवून मयत बेसावध असतांना त्याचे डोक्यावर लोखंडी गजगोटयाने जबर प्रहार करून जिवानिशी ठार केले व त्यानंतर अपघाताचा बनाव करण्याकरीता मृतक व त्याची स्कुटी रस्त्याचे कडेला आणून टाकली असल्याची आरोपीने कबुली दिली आहे. आरोपीस अटक करण्यात आली असुन पुढील तपास तळेगांव (द.) पोलिस करित आहेत.

सदरची कारवाई पोलिस अधिक्षक विशाल आनंद, अपर पोलिस अधिक्षक पंकज कुमावत,उपविभागिय पोलिस अधिकारी चांदुर रेल्वे पवार, यांचे मार्गदर्शनात किरण वानखडे पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, स.पो.नि. रामेश्वर धोंडगे ठाणेदार पो.स्टे. तळेगाव दशासर, पो.उप.नि. मोहम्मद तस्लीम, पो.उप.नि. सागर हटवार, श्रेणी पोउपनि मुलचंद भांबुरकर, व स्था.गु.शा. व पो.स्टे. तळेगाव दशासर येथील अंमलदार यांनी केली.



