
दुकानाचे शटर वाकवुन चोरी करणारी आंतराज्यीय टोळी अमरावती ग्रामीण LCB चे ताब्यात…
अमरावती – अमरावती ग्रामीण जिल्हयात बंद दुकानाच्या शटर वाकवून चोरी करण्याच्या घटनांना आळा बसावा याकरीता
पोलिस अधीक्षक, अमरावती ग्रामीण यांनी सुचना निर्गमीत करुन अशा प्रकारचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत मार्गदर्शन केले होते. अशा घटनेच्या अनुषंगाने पो.स्टे.खोलापुर अप.क्र. २०६/२०२३ कलम ४६१,३८० भादंवि व पो.स्टे. येवदा येथे अप.क्र. २७१/२०२३ कलम ३८०,५११ भादंवि अन्वये गुन्हे नोंद करण्यात आले होते. त्याअनुषंगाने
सदर घटनांचा स्थानिक गुन्हे शाखा अमरावती ग्रामीण पथकाकडून समांतर तपास करीत असतांना व घटनेचे सिसिटिव्ही फुटेजची बारकाईने पाहणी करुन आरोपीची शरीरयष्टी व गुन्हा करण्याची पध्दती अभ्यासुन तसेच सदर आरोपीबाबत गोपनीय माहिती प्राप्त करुन अशी खात्रीलायक माहिती प्राप्त झाली की सदरचे गुन्हे करणारी टोळी ही लेक पॅलेस कॉलनी, झोपडपट्टी इंदोर (मध्यप्रदेश) येथील असून बंद दुकानाचे शटर वाकवून चोरी करण्यात सदरची टोळी तरबेज आहे. अशा माहिती वरुन स्थानिक गुन्हे शाखा, अमरावती येथील पथक इंदोर येथे रवाना होवून सिसिटिव्ही फुटेज मधील इसमाची गोपनीयरित्या विचारपुस केली असता माहिती प्राप्त झाली की सदर पध्दतीचा गुन्हा करणारी टोंळी ही बुरहानपुर येथील असल्याचे निष्पन्न होताच व सिसिटीव्ही मधील ईसम हा नवलसींग जुवानसींग भुरीया असल्याचे निष्पन्न झाले. सदर माहितीवरुन अत्यंत शिताफीने व कौशल्याने आरोपी क्रमांक


१) नवलसींग जुवानसींग भुरीया वय ४० वर्ष,रा.नाहवेल ता.कुक्षी जिल्हा धार ह.मु चोईथराम मंडीच्या मागे लेक पॅलेस कॉलनी झोपडपटटी इंदोर (मध्यप्रदेश) यास ताब्यात घेण्यात आले. त्यास सदर गुन्हयांबाबत विचारपुस केली असता त्याने प्रथम उडवाउडवीचे उत्तरे दिली. परंतु त्यास पुन्हा विश्वासात घेवून
विचारपुस केली असता त्याने सांगितलेकी त्याने सदरचा गुन्हा हा त्याचे तीन साथीदार आरोपी क्र २) विरेद्र शोभाराम नागेश्वर, वय ४० वर्ष, रा. गोलखेडा, ता नेपानगर, जि.बु-हाणपुर ह.मु श्रीनाथ सीटी, देवास रोड, ता.सावेर,जिला इंदोर मकान नं (मध्यप्रदेश) ३) रामकीसन मुनसी शिलवेकर, वय ३६ वर्ष, रा.गोलखेडा, नेपानगर, जिल्हा बु-हाणपुर (मध्यप्रदेश) ४) राजू रामदिल जांभेकर, वय ३२ वर्ष रा. गोलखेडा,ता. नेपानगर,जिल्हा बु-हाणपुर यांचे मदतीने केल्याचे सांगितले. त्यास अधिक विचारपुस केली असता त्यांनी
सांगितले की, त्यांनी २ मोटार सायकली खंडवा मध्यप्रदेश येथुन चोरी करुन दुचाकींच्या सहाय्याने अमरावती जिल्हयात प्रवेश
करुन दुकानाचे शटर वाकवून आतमध्ये प्रवेश करुन गुन्हे केल्याचे कबुली दिली. आरोपींनी अमरावती शहरातील
भातकुली येथे तिन दुकाने फोडल्याचे सांगितले. त्यांचे विरुध्द पो.स्टे. कोतवाली खंडवा (मध्यप्रदेश), पो.स्टे. पिपलोद खंडवा
(मध्यप्रदेश) येथे मोटार सायकल चोरीचे गुन्हे नोंद आहेत. आरोपींनी वरुड तसेच अकोला जिल्हयात सुध्दा गुन्हे केले असल्याची शक्यता असल्याने त्याबाबत अधिक विचारपुस सुरु आहे.
सदरची कार्यवाही पोलिस अधीक्षक,विशाल आनंद, अपर पोलिस अधीक्षक विक्रम साळी यांचे मार्गदर्शनाखाली, किरण वानखडे, पो.नि. स्थागुशा, यांचे नेतृत्वात पोउपनि संजय शिंदे, अंमलदार त्रंबक मनोहर, सुनिल महात्मे, सैय्यद अजमत, सुधीर बावणे, निलेश डांगारे, अमोल केंद्रे, सागर धापड, रितेश वानखडे, संजय गेठे यांनी केली.



