परतवाडा शहरात गावठी बॅाम्ब बनविणाऱ्यास स्थानिक गुन्हे शाखेने घेतले ताब्यात…
परतवाडा शहरात स्फोटक पदार्थ (गावठी बॉम्ब) बाळगणा-या इसमास अटक,३३ नग गावठी बॉम्ब जप्त स्थानिक गुन्हे शाखा अमरावती ग्रामीण ची कार्यवाही…..
परतवाडा(अमरावती ग्रामीण) – सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक १९/१२/२०२३ रोजी परतवाडा शहरात स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पेट्रोलिंग करीत असता गोपनिय खबर मिळाली कि, जसपालसिंग सोहनसिंग बावरी रा. आझाद नगर, परतवाडा याने त्याचे राहते घरात स्फोटक पदार्थ (गावठी बॉम्ब) ठेवले आहे. अशा गोपनिय खबरेवरुन स्थानिक गुन्हे शाखेचे पथक जसपालसिंग सोहनसिंग बावरी रा. आझाद नगर, परतवाडा याचे घरी गेले असता सदर इसम घरी हजर मिळुन आला त्याचे घराची पंचासमक्ष झडती घेतली असता त्याचे घरुन मानवी जिवीतास धोकादायक असलेले ३३ नग स्फोटक पदार्थ (गावठी बॉम्ब) मिळुन आले. सदर बॉम्ब बाबत आरोपीस विचारणा केली असता त्याने उडवाउडवीचे उत्तरे दिल्याने त्याचे कडुन ३३ नग स्फोटक पदार्थ (गावठी बॉम्ब) जप्त केले. आरोपीचा अधिक तपास करणे असल्याने त्यास ताब्यात घेवुन त्याचे वर पोलिस स्टेशन परतवाडा येथे कलम २८६ भादंवि सहकलम ५ स्फोटक पदार्थ अधिनियम १९०८ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
आरोपीस पुढील कार्यवाही कामी पो स्टे परतवाडा यांचे ताब्यात देण्यात आले असुन पुढील तपास पोलिस स्टेशन परतवाडा करीत आहे.
सदरची कारवाई .विशाल आनंद, पोलिस अधिक्षक अमरावती ग्रा., विक्रम साळी, अप्पर पोलिस अधिक्षक, यांचे मार्गदर्शनात किरण वानखडे, पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा अम.ग्रा. यांचे नेतृत्वात सहा पोलिस निरीक्षक सचिन पवार, पोलिस अंमलदार युवराज मानमोठे, रविंद्र व-हाडे, स्वप्नील तंवर, सागर नाठे, शांताराम सोनोने, चालक मंगेश मानमोडे यांनी केली.