
क्रिकेट बुकीवर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा,१५ लक्ष रु चा मुद्देमाल केला जप्त…
अमरावती – सवीस्तर व्रुत्त असे की पोलिस अधीक्षक अमरावती ग्रामीण यांनी जिल्हयातील होत असलेल्या आय.सी.सी क्रिकेट
वर्ल्ड कप २०२३ मध्ये लागना-या क्रिकेट सटयावर आळा घालण्या करीता स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला प्रभावी कार्यवाही करण्यात यावी अशा सुचना निर्गमीत केल्या होत्या. त्या अनुषंगाने दि. १९/११/२३ स्थानिक गुन्हे शाखा, अमरावती ग्रामीण येथील पथक हे पेट्रोलींग करित असतांना गुप्त बातमीदाराकडून खात्रीलायक माहिती मिळाली की, ग्राम सावळापुर येथे राधाकृष्ण विदयालय समोरील सार्वजनिक रोडचे कडेला दोन इसम एका पांढ-या रंगाचे कार मध्ये बसुन फोनव्दारे क्रिकेट सटटा करीत आहे. अशा मिळालेल्या माहितीवरून पो.उप.नि संजय शिंदे व त्यांचे पथकाने ग्राम सावळापुर येथे जावून शिताफीने त्या दोन्ही इसमांना ताब्यात घेवून त्यांची नाव गाव विचारली असता त्यांनी त्यांचे नाव
१) विजय शंकरलाल अग्रवाल, वय ४२ वर्ष, रा येवदा


२) अथरोध्दीन जहिरोध्दीन, वय २३ वर्ष, रा. येवदा

असे सांगीतले. त्यांचे जवळ असलेल्या मोबाईल ची पाहणी केली असता ते दिनांक १९/११/२०२३ रोजी दुपारी ०२/०० पासुन सुरू झालेल्या मेन्स आय. सी. सी मेन्स वर्ल्ड कप २०२३च्या भारत विरूध्द आस्ट्रेलिया क्रिकेटच्या फायनल सामण्यावर मोबाईल व्दारे बेटींग करित असतांना मिळून आले त्यांचे ताब्यातून

१) क्रिकेट सटटा आकडे उतरवीलेले बुकाचे चार पाने किंमत अंदाजे ०० /००रू
२) दोन मोबाईल किंमत अंदाजे २०,०००रू
३) क्रिकेट सटयाचे नगदी १०,५००रू
४) एक पांढ-या रंगाची किया सेल्टाझ कार क्रमांक एम एच २६ सी.एल ४७७८ किंमत अंदाजे १५,००,००० रू असा एकुन
१५,३०,५०० रू चा मुददेमाल मिळून आल्याने आला.
विजय शंकरलाल अग्रवाल, वय ४२ वर्ष, रा येवदा
याला क्रिकेट सटया बाबत सविस्तर विचारपुस केली असता त्याने सांगीतले की, तो नांदेड येथे राहनारा शेख निसार याचे सांगने वरून क्रिकेट सटटा चालवित असुन तो क्रिकेट सटयाचे आकडे शेख निसार कडे उतरवीतो व निसार त्याला झालेल्या धंदयावर ३ टक्के कमीशन देत असतो असे सांगीतले. दोन्ही आरोपीतांना
पुढील तपास कामी पो.स्टे आसेगाव पुर्णा यांचे ताब्यात देण्यात आले.
सदरची कार्यवाही पोलिस अधीक्षक अविनाश बारगळ, अपर पोलिस अधीक्षक, शशिकांत सातव, यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा अमरावती ग्रामीणचे पोलिस निरीक्षक किरण वानखडे यांचे नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखा अम ग्रा येथील पोउपनि संजय शिंदे, अंमलदार त्रंबक मनोहर, सुनिल महात्मे, सैय्यद जमत,सुधिर बावने, निलेश डांगोरे, सागर धापड, चालक निलेश येते यांनी केली.


