हातभट्टीवाला शब्बीर एक वर्षाकरीता जेल रवाना,अमरावती ग्रामीण पोलिसांनी केली स्थानबध्दतेची कार्यवाही…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

­अमरावती – सवीस्तर व्रुत्त असे की, पोलिस स्टेशन  शिरजगांव कसबा हद्दीतील ग्राम कारंजा बहिरम येथील कुख्यात हातभट्टीवाला इसम शब्बीर खान सुलतान खान हा स्वतःचे आर्थिक फायद्याकरिता मागील बरेच वर्षांपासुन ग्राम कारंजा बहिरम परिसरात गावठी
हातभट्टी ची दारु विक्री करण्यासाठी दारुचे गुत्ते /अड्डे चालवित होता. तो महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम १९४९ मधील तरतुदींचा भंग करुन पोलिसांची नजर चुकवुन गावठी बनावटीची दारु गाळणे व विक्री करणे यासारखे गुन्हे करण्यामध्ये गुंतलेला होता. त्याचे या अवैध व्यवसायामुळे ग्राम कारंजा बहिरम व आसपासच्या परिसरातील तरुण मुले, व्यक्ती हया दारुच्या आहारी जावुन व्यसनाधिन होत होती. यामुळे ग्राम कारंजा बहिरम व आसपासचे
परिसरातील तसेच आजुबाजुचे गावातील भांडण-तंट्याचे प्रमाण वाढले होते व त्याच्या भिती पोटी कोणीही तक्रार देण्यास पुढे
येत नव्हते. त्याचेवर पोलिसांमार्फत वेळोवेळी दखल घेवुन तथा प्रतिबंधक कारवाई करुन देखील त्याने त्याचा अवैध व्यवसाय सुरुच ठेवला होता. ग्राम कारंजा बहिरम व लगतचे परिसरातील सार्वजनिक सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी व कुख्यात हातभट्टीवाला इसम शब्बीर खान सुलतान खान याचे गुन्हेगारी वृत्तीस आळा घालण्यासाठी नवनियुक पोलिस अधिक्षक, अमरावती ग्रामीण यांनी त्यास स्थानबद्ध करण्याचा प्रस्ताव मा. जिल्हादंडाधिकारी, अमरावती यांचेकडे सादर केला होता.
मा. जिल्हादंडाधिकारी, अमरावती यांनी सर्व कायदेशिर बाबींची पडताळणी करुन नमुद इसम हा कुख्यात हातभट्टीवाला इसम असल्याची खात्री झाल्याने त्यास एक वर्षाकरीता अमरावती जिल्हा मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध ठेवण्याबाबतचा आदेश दिनांक २५/११/२०२३ रोजी पारित केला आहे. मा. जिल्हादंडाधिकारी, अमरावती यांचे आदेशास अनुसरुन कुख्यात हातभट्टीवाला इसम

शब्बीर खान सुलतान खान, रा. कारंजा बहिरम, ता. चांदुर
बाजार, जि. अमरावती





याचा तात्काळ शोध घेवून त्यास सदरचा आदेश तामील करुन त्यास दिनांक २५/१२/२०२३ रोजी जिल्हा मध्यवर्ती कारागृह, अमरावती येथे स्थानबद्ध करण्यात आले आहे.



सदरची कार्यवाही नवनियुक्त अधिक्षक  विशाल आनंद, अपर पोलिस अधिक्षक  विक्रम साळी यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा येथील पोलिस निरीक्षक किरण वानखडे, पोलिस
उपनिरीक्षक सागर हटवार, पोहवा अमोल देशमुख तसेच पोलिस स्टेशन शिरजगाव कसबा येथील ठाणेदार सपोनि प्रविण वेरुळकर, तत्कालीन ठाणेदार सपोनि प्रशांत गिते, पोहवा  मनोज पंडित यांनी परिश्रम घेतले.



अमरावती ग्रामीण जिल्हयात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहुन शांतता राहावी याकरीता अशा प्रकारचे गंभीर स्वरुपाचे गुन्हे करणारे व कारवाईस न जुमानणा-या गुंड / सराईत गुन्हेगारांची माहिती संकलीत करण्यात येत असुन त्यांचेवर एमपीडीए कायद्यान्वये कारवाई करण्यात येत आहे.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!