परतवाडा पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा,सात आरोपी अटकेत…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

परतवाडा(अमरावती ग्रामीण) प्रतिनिधी – सवीस्तर व्रुत्त असे की पोलिस अधिक्षक अमरावती ग्रामीण यांनी जिल्ह्यात चालणारे अवैध धंदे तसेच जुगार अड्डे यांच्यावर कार्यवाही करण्याच्या सुचना सर्व ठाणेदारांना देण्यात आल्या होत्या तरीही काही ईसम चोरुन लपुन परतवाडा शहरातील टिंबर डेपो परीसरात जुगार खेळत असल्याची माहीती ठाणेदार संदीप चव्हाण यांना मिळताच त्यांनी परिसरातील
एका घरावर पोलिसांनी शनिवारी रात्री ८.०० वा चे सुमारास धाड टाकून जुगाराचा डाव उधळला. येथून ८ प्रतिष्ठित लक्षाधीशांना ताब्यात घेण्यात आले, तर ४ ते ५ जण पळून गेले. रोख रक्कम,
मोबाइल, वाहने असा सुमारे २,५००००/- रु चा  मुद्देमाल पोलिसांनी
जप्त केला आहे. या कारवाईमुळे  शहरात एकच खळबळ
उडाली आहे.
पोलिस सूत्रांनुसार, टिंबर डेपो परिसरातील

शिवाजी चित्रकार





यांच्या घरावर शनिवारी सायंकाळी परतवाडा पोलिसांना गोपनीय
माहितीच्या आधारे धाड टाकली. ठाणेदार संदीप चव्हाण यांनी
पोलिस चमूचे नेतृत्व केले. शहरातील प्रतिष्ठित जुगार खेळताना
आढळले. तथापि, ज्यांचे घर आहे, ते प्रत्यक्षात उपस्थित नव्हते.
पोलिसांनी या ठिकाणाहून ८६ हजार शंभर रुपये रोख,४४ हजाराचे
मोबाईल तसेच १ लाख २० हजाराचे तीन दुचाकी असा एकुन २,५००००/- रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याशिवाय



१) नरेश किसनराव लाडेकर (४२, रा. गाडगेनगर, अमरावती)



२) अजय लीलाराम घमेले(४९, रा. कासदपुरा, अचलपूर)

३) नरेश मदनलाल अग्रवाल (४८, रा.सदर बाजार, परतवाडा)

४) सुरेश जानकीलाल अग्रवाल (३९, रा.कविठा स्टॉप, परतवाडा)

५) रिजवान रफीक पठाण ३६, रा. टवलार,ता. अचलपूर)

५) धीरज सेठी (४४, चावलमंडी, अचलपूर)

६) विजय बबनराव उदापूरकर (३४, रा. गुप्तानगर, कांडली)

७) दिनेश ऊर्फ पायल बबनराव दुरतकर ( ३०, रा. एकतानगर, परतवाडा)

अशी अटक करण्यात आलेल्या जुगाऱ्यांची नावे आहेत. त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

सदरची  कार्यवाही अमरावती जिल्हा ग्रामीण पोलिस अधिक्षक अविनाश बारगल, अपर पोलिस अधीक्षक शशिकांत सातव, उपविभागीय पोलिस अधिकारी अतुलकुमार नवगिरे यांच्या
मार्गदर्शनाखाली परतवाडा पोलिस स्टेशन चे ठाणेदार संदीप
चव्हाण,पोलिस उपनिरीक्षक सूरज सुसतकर, सुधीर राऊत, उमेश
सावरकर, मनिष काटोलकर, विवेक ठाकरे, जितेश बाबिल, घनश्याम कीरोले यांनी केली .





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!