गर्भवतीचा निर्घृण खून; सहा जणांना जन्मठेप

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

गर्भवतीचा निर्घृण खून; सहा जणांना जन्मठेप

जालना – गर्भवतीचा निर्घृण खून केल्याप्रकरणी चार महिलांसह सहा जणांना जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती व्ही.एम.मोहिते यांनी खुनासह इतर कलमांतर्गत जन्मठेप व दंडाची शिक्षा सुनावली आहे. निलोफर जाफर खान (वय २३), नसिमाबी जाफर खान (वय ५५), हलीमाबी उर्फ हल्लो धुमअली शहा (वय ६०) व शबाना धुमअली शहा (वय ३०) या चार जणींसह आरबाज खान जाफर खान (वय २०), ईस्माईल उर्फ शक्ती शहा (वय ३८), अशी जन्मठेप झालेल्या आरोपींची नावे आहेत.





आरोपी जालन्यातील कागजीपुरा व वलीमामू दर्गा परिसरातील रहिवासी आहेत, अशी माहिती अतिरिक्त सरकारी अभियोक्ता भारत के खांडेकर यांनी दिली. याप्रकरणी हिना खान ही गर्भवती महिला आरोपींनी घरात घुसून काठी, घन, चाकूने केलेल्या मारहाणीत मृत पावली होती. दि.९ ऑगस्ट २०२० राेजी रात्री ११ च्या सुमारास हल्ला करण्यात आला. घटनेची फिर्याद सय्यद कय्यूम तांबोळी यांनी सदर बाजार पोलीस ठाण्यात दिली होती. याप्रकरणी सात साक्षीदार तपासण्यात आले.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!