
तोतया CBI पोलिस असल्याचे सांगुन लुटमार करणाऱ्या दोन लोकांना बीड शहर पोलिसांनी केली अटक…
बीड- सीबीआयचे पोलिस असल्याचे सांगत लूटमार करत असल्याचे प्रकार समोर आले होते. पोलिस यांच्या मागावर असताना दोन अट्टल दरोडेखोर पोलिसांच्या ताब्यात सापडले असून त्यांना जेरबंद करण्यात बीड शहर पोलिसाना यश आले आहे. तपासात २० पेक्षा जास्त गंभीर गुन्हात सहभाग समोर आले आहे.
सीबीआयचे पोलिस असल्याचे सांगत लूटमार करणाऱ्या २
अट्टल दरोडेखोरांना पकडण्यात बीड शहर पोलिसाना यश आले आहे. यात अली बाबूलाल अली आणि मिस्किन जावेद जाफरी अशी
अटक केलेल्या आरोपीची नावे आहेत. मागील महिन्यात या
आरोपीनी अंबाजोगाई लातूर महामार्गावर रस्त्यात अडवून १ लाख ५ हजार रुपयांचा ऐवज चोरला होता. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांकडून सापळा रचून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहेत.
यात अली याच्याविरुद्ध मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात
आली आहे. मात्र तो फरार होता. लोणी, तोफखाना, वारजे, पुणे,
श्रीरामपूर, वानवडी अशा अनेक पोलीस स्टेशनमध्ये
यांच्याविरोधात गुन्हे दाखल आहेत. त्यांच्यावर तब्बल २० पेक्षा
अधिक गुन्हे दाखल आहेत.








