
पोलिस अधिक्षकांच्या संकल्पनेतील संवाद अॅपवर मिळालेल्या माहीतीच्या आधारे बीड पोलिसांनी पकडला लाखोंचा गुटखा…
पोलिस अधिक्षक नवनीत काँवत यांनी सुरु केलेल्या संवाद अॅप वर मिळालेल्या गोपनिय माहीतीवरुन बीड पोलिसांची गुटख्यावर धडाकेबाज कारवाई,१३ लाखाचा सुगंधीत गुटखा केला जप्त…..
बीड(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, पोलिस अधिक्षक नवनीत काँवत यांनी जनतेच्या तक्रारी जाणुन घेण्यासाठी सुरु केलेल्या संवाद प्रकल्पा अंतर्गत जनतेस देण्यात आलेल्या क्युआर कोडवर दि १२ रोजी पो.स्टे. परळी ग्रामीण हद्दीत मौजे धर्मापुरी येथील सोमनाथ अशोक फड व बाबुराव श्रीपती मुसळे यांच्याकडे महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत असलेला गुटखा / तंबाखुजन्य पदार्थ असल्याची गोपनिय माहीती मिळाल्याने सदरची माहीती पोलिस अधिक्षक यांनी पो.स्टे. परळी ग्रामिण प्रभारी अधिकारी यांना देऊन कारवाई करण्याचे आदेश दिले होते.


त्याअनुषंगाने पोलिस अधिक्षक यांनी दिलेल्या माहीतीवरुन प्रभारी अधिकारी पो.स्टे. परळी ग्रामिण यांनी दोन स्वतंत्र पथके तयार करुन मौजे धर्मापुरी येथील सोमनाथ अशोक फड व बाबुराव श्रीपती मुसळे यांचे किराणा दुकानावर व राहते घरी दि १२ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ ते ५ वा चे दरम्यान छापा टाकला असता दोन्ही ठिकाणी मिळुन १) शॉट पानमसाला २) नवरतन पान मसाला ३) विमल पान मसाला ४) V-1 तंबाखु ६) जाफरानी तंबाखु व इतर तंबाखुजन्य पदार्थ असा एकुण १३,५0,000/- रु किंमतीचा मुद्येमाल मिळुन आल्याने सदरचा मुद्देमाल पो.स्टे. परळी ग्रामिण येथे आणुन पुढील योग्य ती कायदेशिर कारवाई करण्याकामी अन्न व औषधी प्रशासनास पत्र व्यवहार करण्यात आला असुन अन्न व औषधी प्रशासनाच्या तपासणी नंतर गुन्हा दाखल करीत आहोत.

सदरची कार्यवाही ही पोलिस अधिक्षक नवनीत काँवत यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. मजहर सय्यद, सपोनि समाधान कवडे, पोउपनि अंकुश निमुने, रियाज शेख, पोशि. विष्णु घुगे, पांडुरंग वाले, सुनिल अन्नमवार, तुळशीराम परतवाड, सुंदर केंद्रे, शंकर वाघमारे सर्व नेमणुक पो.स्टे. परळी ग्रामिण यांनी केली आहे.

सदरची कामगिरी ही पोलिस अधिक्षक यांनी सुरु केलेल्या संवाद प्रकल्प अॅपवर मिळालेल्या गोपनिय माहीतीवरुन करण्यात आलेली आहे. बीड पोलिस दलातर्फे बीड जिल्हयातील जनतेस आवाहन करण्यात येते की, संवाद प्रकल्प अॅप वर जास्तीत जास्त गोपनिय माहीती दयावी जेणे करुन अवैध धंदयावर धडाकेबाज कारवाई करता येईल. माहीती देणाराचे नाव गोपनिय ठेवण्यात येईल.


