
पोलिस अधिक्षक नवनित कॅावत यांचा संवाद प्रकल्प ठरतोय बीड जिल्ह्यातील नागरिकांसाठी वरदान,काय आहे संवाद प्रकल्प…
बीड जिल्ह्यातील नागरीकांच्या सुविधेसाठी पोलिस अधिक्षक नवनित कॅावत याचे संल्पनेतुन प्रोजेक्ट संवाद सारखा स्तुत्य उपक्रम सुरु…..
बीड(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,बीड जिल्ह्यातील नागरीक हे मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागात राहतात. त्यामुळे बहुतांश वेळा त्यांना पोलिस स्टेशनशी संबंधीत काम असेल तर त्यांना पोलिस स्टेशनला पोहचायला बराच वेळ लागतो.तसेच पोलिस स्टेशनला पोहचण्यासाठी बस भाडे/स्वतःचे वाहन असल्यास इंधन खर्च या स्वरुपात पैसाही खर्च होतो. पोलिस स्टेशनला गेल्यानंतर बऱ्याच वेळा काम होत नाही. किंवा नागरीकांचे समाधान होत नाही. त्यामुळे नागरीकांना वरीष्ठांकडे दाद मागण्यासाठी दुरचा प्रवास करावा लागतो. त्यामुळे नागरीकांचे आर्थीक नुकसान तर होतेच परंतु त्याच बरोबर त्यांना शारिरीक व मानसीक त्रास होतो


या सर्व बाबींचा विचार करुन व नागरीकांना चांगली सेवा देण्याच्या भावनेतुन पोलिस अधिक्षक नवनित काँवत यांचे संकल्पनेतुन संवाद प्रकल्प हा उपक्रम बीड जिल्हा पोलिस दलात राबवला जात आहे. यासाठी पोलिस अधिक्षक नवनीत काँवत यांनी QR Code तयार केला आहे. सदरचा QR Code हा पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी यांचे कक्षात व पोलिस ठाणे अंमलदार यांचे कक्षात लावण्यात आला आहे. नागरीकांनी आपल्याकडे असलेल्या मोबाईलद्वारे सदरचा QR Code स्कॅन केल्यानंतर त्यांच्या मोबाईलचे स्क्रिनवर एक लिंक येईल. ती लिंक उघडल्यानंतर एक माहीतीचा फॉर्म येईल. त्यामध्ये नागरीकांना

1) स्वतःचे नाव,

2) मोबाईल क्रमांक,
3) ज्या पोलिस ठाण्याच्या संबंधी काम आहे त्या पोलिस ठाण्याचे नाव निवडणे,
4) पोलिस ठाणे येथे भेट देण्याचे कारण किंवा माहीती,
5) पोलिस ठाणे येथे भेट दिल्यानंतर किंवा पोलिस ठाण्याच्या कामकाजावर आपण समाधानी आहात काय?
6) समाधानी किंवा असमाधानी असल्याचे कारण,
7) तुम्ही दिलेली भेट यावरुन पोलिस ठाणेस किती गुण द्याल? (गुण 1-5),
8) सुधारणेसाठी काही सुचना. असल्यास त्या
सदरची माहीती भरुन ती सबमीट करणे आवश्यक राहील. एखादी व्यक्ती पोलिस स्टेशनच्या कामकाजाबाबत असमाधानी असल्यास त्यांची पोलिस अधिक्षक कार्यालयाकडुन 24 तासांच्या आत समस्या जाणून घेवुन समाधान करण्याचा प्रयत्न केला जाईल. सदरचा QR Code हा सोशल मिडीयाच्या माध्यमातुन सुद्धा नागरीकांपर्यंत पोहचवला जाणार आहे. त्यामुळे एखाद्या नागरीकास अवैध धंदे किंवा इतर महत्वाची गोपनीय माहीती द्यायची असेल तर ते सदरचा QR Code स्कॅन करुन माहीती देवु शकतात. अशा व्यक्तींचे नांव व मोबाईल क्रमांक गोपनीय ठेवले जाईल. तसेच याद्वारे नागरीकांना त्यांच्या काही तक्रारी असल्यास त्या QR Code द्वारे देवु शकतात. नागरीकांनी केलेल्या तक्रारी, दिलेल्या प्रतिक्रीया, सुचना ह्या पोलिस अधिक्षक हे स्वतः पाहु शकणार आहेत. तसेच नागरीकांनी केलेल्या प्रत्येक तक्रारीची दखल पोलिसांकडुन घेतली जाणार आहे.
या उपक्रमाद्वरे पोलिस आणि नागरीक यांच्यात समन्वय साधला जाणार आहे. यापुढे नागरीकांना विनाकारण पोलिस स्टेशन, उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय, अपर पोलिस अधिक्षक कार्यालय, पोलिस अधीक्षक कार्यालयात चकरा मारण्याची आवश्यकता नाही. यामुळे नागरीकांचा वेळ व पैशांचा होणारा अपव्यय टाळता येणार आहे. सदरचा उपक्रम हा नागरीकांच्या सेवेसाठी राबवीण्यात येत आहे.
सदरचा ‘ संवाद प्रकल्प ‘ हा उपक्रम दिनांक 06/02/2025 रोजी पासुन बीड जिल्ह्यात राबवीला जात आहे. सदर उपक्रमाचा नागरीकांनी योग्य उपयोग करुन पोलिस व नागरीकांमध्ये निर्माण झालेली दरी दुर करावी. तसेच नागरीकांनी सुचविलेल्या सुधारणांचे स्वागत केले जाईल असे मत पोलिस अधिक्षक नवनीत काँवत यांनी व्यक्त केले आहे.


