
गांजा वाहतूक करणाऱ्यांना भंडारा एलसीबीने केली अटक…
गांजा वाहतूक करणाऱ्यांना भंडारा एलसीबीने केली अटक, गांजासह १३ लक्ष रु चा मुद्देमाल केला जप्त….
भंडारा (प्रतिनिधी) – जुगार, घरफोडी, वाहन चोरी, अवैध धंदे, गांजा तस्करी विक्री, विनापरवाना शस्त्र, यांसारख्या वाढत्या घटनांमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत होता. हा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिस अधीक्षक लोहीत मतानी, आणि अपर पोलिस अधीक्षक ईश्वर कातकडे यांनी संबंधित सर्व अधिकाऱ्यांना गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या. म्हणुन त्या अनुषंगाने पोलिसांचे पथक हे कारवाई साठी गस्तीस असताना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून पोलिसांनी गांजाची अवैध वाहतुक करणाऱ्या वाहनाला नाकाबंदीच्या मदतीने पकडुन 1,44,880/- ₹ चा गांजा जप्त केला आहे. आणि आरोपी


1)फिरोज अहमद नबी रसुल (वय 42 वर्षे), रा.कुंभारपारा सहजादा टेलर्स दुकान समोर संबलपुर ता.धनुपल्ली जि.संबलपुर, राज्य ओरीसा

2) मोहम्मद शाहरुख मोहम्मद सलिम (वय 26 वर्ष), रा.कुंभारपारा सहजादा टेलर्स दुकान समोर संबलपुर ता. धनुपल्ली जि.संबलपुर राज्य ओरीसा

यांना अटक केली आहे. या बाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, (दि.03फेब्रुवारी) रोजी सपोनि नारायण तुरकुंडे स्थानिक गुन्हे शाखा भंडारा हे पथकासह भंडारा शहरात पेट्रोलिंग करीत असता गुप्त बातमीदारा मार्फत माहीती मिळाली की, कारधा कडुन भंडारा कडे येणा-या आयसर वाहन क्र. OD-15-W-0198 मध्ये गांजाची वाहतुक होत आहे. सदर खबरेवरुन सपोनि नारायण तुरकुंडे यांनी पोलिस स्टॉप सह त्रिमूर्ती चौक भंडारा येथे राष्ट्रीय महामार्ग क्र.53 वर नाकाबंदी केली असता वाहन क्रमांक OD-15-W-0198 पिवळ्या रंगाचे भाजीचे कॅरेट नी भरलेला महिंद्रा कंपनीचा ट्रक मिळुन आला. सदर राष्ट्रीय महामार्गावर वाहनाची वर्दळ सुरु असल्याने वाहतुकीची कोंडी होऊ नये, किंवा अपघात घडुन येऊ नये याकरीता सदर वाहन डिटेन करुन स्थानिक गुन्हे शाखा भंडारा चे परीसरात आणण्यात आले. सदर महिंद्रा कंपनीचा वाहन क्र.OD-15-W-0198 ची पोलिस स्टॉप, राजपत्रीत अधिकारी, पंचासमक्ष ट्रक मध्ये ठेवलेले पिवळ्या रंगाचे भाजीचे कॅरेट खाली करुन झडती घेतली असता सदर वाहनामधील पिवळ्या रंगाचे भाजीचे कॅरेट मध्ये 2 प्लॅस्टीक बोरी मध्ये 14,488 किलोग्रॅम गांजा किं 1,44,880/- चा व इतर साहित्य असा एकुण किं. 13,77,530/- चा माल मिळुन आल्याने फिर्यादी सपोनि नारायण तुरकुंडे स्था.गु.शा. भंडारा यांचे लेखी रिपोर्ट वरुन सदरचा गुन्हा नोंद करण्यात आला.
या मध्ये 1) 02 प्लॉस्टीक बोरी मध्ये 14.488 किलोग्रॅम गांजा किं. 1,44,880/- रु. 2) अशोक लेलॅन्ड कंपनीचा ट्रक क्र. OD-15-W-0198 कि. 12,00,000/- रु. 3) पिवळ्या रंगाचे प्लॅस्टीकचे जुने वापरते भाजीचे 443 नग कॅरेट प्रती नग 50/- रु. प्रमाणे किं. 22150/- रु. 4) 1 Vivo कंपनीचा ॲन्ड्राईड मोबाईल किं.10,000/- रु., 1 KECHAODA कंपनीचा किपॅड मोबाईल किं. 500/- रु. एकुण किं.10,500/- रु. असा एकुण कि. 13,77,530/- रु. मुद्देमाल हा जप्त करण्यात आला आहे.
सदरची कारवाई ही पोलिस अधीक्षक लोहीत मतानी, अपर पोलिस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलिस अधिकारी अशोक बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक नितीनकुमार चिंचोळकर, सपोनि. नारायण तुरकुंडे, पो.हवा. विजय राउत, पो.हवा. प्रदिप डहारे, पो.हवा. किशोर मेश्राम, पो.हवा. संदिप मते, पो.हवा. रमेश बेदुरकर, पो.हवा.अजय बारापात्रे, पो.हवा प्रशांत कुरंजेकर, पोशि सचिन देशमुख, चा.सफौ, कांबळे नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा भंडारा यांनी केली आहे.


