कुख्यात हातभट्टीवाला प्रकाश याचेवर स्थानबध्दतेची कार्यवाही…
हातभट्टीवाला’ प्रकाश हरीचंद मोटघरे यास एम.पी.डी.ए कायद्यान्वये केले भंडारा काराग्रुहात स्थानबध्द,पोलिस अधिक्षक लोहीत मतानी यांचे कार्यकाळातील चालु वर्षातील ४ थी कार्यवाही….
भंडारा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,प्रकाश हरीचंद मोटघरे, वय 54 वर्षे, रा. मानेगाव / बाजार, ता. जि. भंडारा हा पोलिस स्टेशन कारधा परीसरातील रहिवासी असुन तो आपल्या सोबत गुंड प्रवृत्तीच्या लोकांना सोबत घेऊन हात भट्टी मोहफुलाची दारू गाळून हातभट्टीवाला व्यक्ती अशी ओळख निर्माण केली
आहे. प्रकाश हरीचंद मोटघरे, हा मागील 5 वर्षा पासुन हातभट्टी दारू गाळण्याचे व्यवसायात सक्रिय असुन त्याचेवर पोलिस ठाणे कारधा येथे हातभट्टी दारू निर्मिती, वाहतूक, विक्री अशा प्रकारचे गुन्हे
दाखल असुन काही दारूच्या गुन्ह्यात मिळालेल्या पैशाच्या बळावर गुन्हयातील साक्षदार यांना पैशाचे आमिष देवुन त्याने स्वतःची निर्दोष सुटका केलेली आहे. त्याने त्याची एम.पी.डी.ए कायद्यान्वये
हातभट्टीवाला अशी ओळख निर्माण केली होती. त्याचे कृत्यामुळे मानेगाव / बाजार परिसरातील मुले दारूच्या आहारी जाऊन गुन्हेगारी प्रवृत्ती मध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे सार्वजनिक सुव्यवस्थेवर विपरीत परिनाम होऊन सार्वजनिक सुव्यवस्था धोक्यात येऊन प्रचंड दहशत निर्माण झाली असल्याने अशा समाज विघातक व्यक्तीवर अंकुश बसविने गरजेचे होते.
अशा सराईत गुन्हेगारास कायद्याचे कसोटीत बसवुन त्याचे गुन्हेगारीचा अस्त करणे हाच एकमेव पर्याय असल्याने जिल्हा पोलिस अधीक्षक लोहित मतानी यांच्या मार्गदर्शानात प्रकाश हरीचंद मोटघरे, वय 54 वर्षे, रा. मानेगाव / बाजार, ता. जि. भंडारा (महाराष्ट्र) याचे विरुध्द एम.पी.डी.ए कायद्यान्वये प्रस्ताव तयार करण्यात आला असुन, दिनांक 01/03/2024 रोजी जिल्हाधिकारी,
भंडारा श्री. योगेश कुंभेजकर यांचे स्थानबद्धता आदेशाने प्रकाश हरीचंद मोटघरे, वय 54 वर्षे रा मानेगाव / बाजार, ता. जि. भंडारा यास ताब्यात घेऊन जिल्हा कारागृह भंडारा येथे दाखल करण्यात आले. यांनतर सुध्दा अशा हातभट्टीवाल्यांचे गुन्हे अभिलेख तपासुन एम. पी. डी.ए कायद्यान्वये कारवाई करण्यासाठी पोलिस प्रशासन दक्ष आहे.
सदरची कारवाई पोलिस अधीक्षक लोहित मतानी व अपर पोलिस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलिस अधिकारी अशोक बागुल यांचे मार्गदर्शनात नितीनकुमार चिंचोळकर पोलिस निरीक्षक (स्था. गु. शा.) भंडारा, गणेश पिसाळ, पोलिस निरीक्षक, पो.स्टे.कारधा,पो.हवा.राजेश पंचबुधे, नापोशि अंकोश पुराम, पोहवा. डोंगरे, पोशि प्रमोद आरीकर यांनी केली.