
भंडारा स्थानिक गुन्हे शाखेने मोटारसायकल चोरट्यांना केली अटक…
भंडारा गुन्हे शाखेने मोटारसायकल चोरट्यांना केली अटक…
भंडारा (प्रतिनिधी) – भंडारा गुन्हे शाखेने मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघड करून आरोपी अतुल भास्कर जांभूळकर (वय 24 वर्षे), रा. दोघोरी मोठी, ता. लाखांदूर, जि.भंडारा आणि सुमित अरुण वासनीक (वय 25 वर्षे), रा.दीघोरी मोठी, ता.लाखांदूर, जि.भंडारा यांना अटक करून मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी फिर्यादी अशोक मालू मेश्राम, रा.सेंदूरवाफा ता.साकोली आणि सचिन पुरषोत्तम मेश्राम, रा.सालेबर्डी, ता.साकोली यांनी दिलेल्या फिर्यादीवरून साकोली दोघोरी पोलिस ठाण्यात 255/2024 कलम 379 भा. दं. वि. 48/2024 कलम 379 भा.दं.वि. अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.


या बाबत अधिक माहिती अशी की, स्थानिक गुन्हे शाखा, भंडारा चे हेड कॉन्स्टेबल सतिश देशमुख, संदीप मते, अजय बारापात्रे, शैलेश बेदुरकर, कौशीक गजभिये, हे मौजा दिघोरी ता.लाखांदुर, जि.भंडारा, येथे पेट्रोलींग करीत असताना मुखबिर कडुन माहीती मिळाली की, आरोपी नामे सुमित अरुण वासनिक रा.दिघोरी यांचे घरी 2 हिरो होन्डा कंपनीच्या स्प्लेंडर मोटार सायकल संशईत रित्या ठेवलेल्या आहेत. त्याचे घरी जाऊन चौकशी केली असता त्याचे घरी (1) MH 31-R-2023, (2) MH-31-DA-7217 क्रमांकाची स्प्लेंडर मिळुन आली. आरोपी नामे (1) सुमित अरुण वासनिक यास विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्याने त्याचा आरोपी मित्र नामे (2) अतुल भास्कर जांभुळकर, (वय 24 वर्ष), रा.दिघोरी मोठी, ता.लाखांदूर, जि.भंडारा याच्या सोबतीने मौजा सालेबडर्डी व कुंभली येथुन रात्र दरम्यान चोरल्याचे कबुल केले. व दोन्ही वाहनांची नंबर प्लेट बदलवुन खोट्या नंबर प्लेट लावल्या. दोन्ही आरोपीतांना पोलीस स्टेशन दिघोरी च्या ताब्यात पुढील कारवाई करीता देण्यात आले.

सदरची कारवाई हि पोलिस अधीक्षक लोहित मतानी, अपर पोलिस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा नितीनकुमार चिंचोळकर, पोहवा सतिश देशमुख, संदीप मते, अजय बारापात्रे, शैलेश बेदुरकर, आशीष तिवाडे, कौशिक गजभिये, अमीत वडेट्टीवार यांनी अथक परिश्रम व कौशल्यपुर्ण तपास करुन भंडारा जिल्ह्यातील एकुण दोन गुन्ह्याची उकल केली आहे.



