
तुमसर सहा.पोलिस अधिक्षक रश्मिता राव यांचा क्रिकेट बुकी अड्ड्यावर छापा….
तुमसर शहारातील IPL क्रिकेट बेटीचे अड्यावर सहा.पोलिस अधिक्षक रश्मिता राव(भापोसे)यांचा छापा, बुकी चक्रेश्वर ऊर्फ बाल्या बिसने व सुनिल बिसने यांना घेतले ताब्यात…


तुमसर(भंडारा)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की ,लोकसभा निवडनुकीच्या अनुषंगाने अवैध धंदे यांचेवर कार्यवाही करण्यासाठी दिनांक ०३/०४/२०२४ रोजी रात्री ०८/३० वा. दरम्यान तुमसर येथील उपविभागीय पोलिस अधिकारी तथा सहा. पोलिस अधिक्षक रश्मिता राव एन. (भा.पो.से.)ह्या आपल्या
कार्यालयीन स्टाप सह पेट्रोलींग करीत असतांना गोपनिय खबर मिळाली की, मोठा बाजार, तुमसर येथे शनिचरे यांच्या घरी काही इसम IPL मध्ये चालु असलेल्या क्रिकेट मॅचवर सट्टालावुन
जुगार खेळ खेळत आहेत. अशा निश्चित खबरेवरून उपविभागीय पोलिस अधिकारी, तुमसर रश्मिता राव एन. यांनी मोठाबाजार तुमसर येथे चालु असलेल्या क्रिकेट बुकींच्या अड्यावर छापा मारला असता कलकत्ता विरूद्ध दिल्ली यांची मॅच सुरू होती बंद खोलीत चार इमस हे लाईन होल्डींग मशीन लावुन मोबाईल वरून क्रिकेट सट्टा लावणाऱ्या ग्राहकांकडुन फोन येत होते. फोनवर सेशन व बॅटींग बॉलींग वर ठरलेल्या भावाप्रमाणे एका कागदावर आकडे लिहत होते तसेच लाईन होल्डींग मशीनच्या साहाय्याने रेकॉर्ड करीत होते. सदर कार्यवाहीमधे तुमसर शहरात पहिल्यांदाच लाईन होल्डींग मशीन द्वारे क्रिकेट बेटींग करीता असतांना आरोपी क्र. १ ) तुषार अशोक बिसने वय २४ वर्ष २) पुर्वेश राजु बिसने वय २३ वर्ष, ३) कुणाल दिवाकर बिसने, वय २३ वर्ष, व एक विधीसंघर्षग्रस्त बालक सर्व रा. मातानगर, मोठाबाजार तुमसर असे मिळुन आले.
क्रिकेट बेटींग चे साहित्य व त्याकरीता किरायाने रूम मुख्य सुत्रधार सुनिल सुरेश बिसने व चक्रेश्वर ऊर्फ बाल्या सुरेश बिसने दोन्ही रा. मातानगर, मोठाबाजार तुमसर हे आहेत. सदर गुन्ह्यात लाईन होल्डींग मशीन सह इतर १,८२,०३०/- रू. चा मुद्देमाल जप्त करून पो.स्टे. तुमसर येथे जुगार कायद्याअंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सदरची कारवाई ही पोलिस अधिक्षक लोहीत मतानी,अपर पोलिस अधिक्षक ईश्वर कातकोडे,सहाय्यक पोलिस अधिक्षक, तुमसर, रश्मिता राव एन. (भा.पो.से), व यांचे पथक यांनी केली असुन पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक दर्जाचे अधिकारी हे करीत आहेत. पुढील तपासात नागपुर, गोंदिया, वर्धा,मुंबई येथील क्रिकेट बुकी हे पोलिसांचे रडारावर आहेत.

IPL क्रिकेट बेटींग करणाऱ्यांमुळे लहान मुले हे बेटींगच्या आहारी जावुन त्यांचे वर विपरीत परिणाम होत असल्याने त्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे. बेटींग करीता पैसे लावुन कर्जबाजारी होवुन आत्महत्या करीत असल्याचे घटना मागिल काही दिवसांपुर्वी घडल्या होते. असे अनुचित प्रकार घडणार नाहीत तसेच त्यांना आळा घाल्याण्याकरीता पोलिसांचे प्रयत्त सुरू आहेत.


