
स्कोडा गाडीत गुटख्याची तस्करी करणारे गोबरवाही पोलिसांनी नाकाबंदी करुन केले जेरबंद…
सुंगंधित तंबाखू(गुटखा) याची कारमधुन तस्करी करणारे गोबरवाही पोलिसांचे ताब्यात, एकुण 07,43,420/- रु मुद्देमाल जप्त….
गोबरवाही(भंडारा)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,कुठल्याही प्रकारचे अवैध धंदे खपवून घेतले जाणार नाही याबाबत पोलिस अधिक्षक नूरुल हसन यांनी आपले धोरण आधीच स्पष्ट केलेले आहे आणि तस्या सुचना देखील सर्व प्रभारींना देण्यात आल्या होत्या त्यानुसार दि. 25 एप्रिल रात्री पोलिस स्टेशन गोबरवाही येथील पथक पोस्टे हद्दीत पेट्रोलिंग करीत असतांना रात्री 01.00 वा. चे सुमारात त्यांना गोपनीय माहीती मिळाली की एका स्कोडा गाडीत महाराष्ट्रात प्रतिबंधित असा गुटखा सुगंधीत तंबाखुची वाहतुक होणार आहे


अशा मिळालेल्या गोपनीय माहीती वरून पोलिस पथक हे मौजा पवनारखारी रेल्वे गेटजवळ नाकाबंदी करुन थांबले असता सदर स्कोडा गाडी क्र. एम एच 14 डि.एफ 0154 येतांना दिसली तीस थांबवुन चालकास व सोबतचे व्यक्तीस विचारपुस करुन त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव अनुक्रमे 1) मोहम्मद जैद अबुजर अन्सारी वय 24 वर्ष रा. टिपु सुलतान चौक संघर्ष नगर नागपुर, तंबाखु मालक 2) अब्दुल वाहीद रियाज उद्दीन अंन्सारी वय 32 वर्ष रा. यशोदरा चौक नागपुर असे सांगितले

पंचासमक्ष सदर स्कोडा गाडीची पाहणी केली केली असता गाडीत 1) गाडीमध्ये एकुण 30 प्लास्टीक चुंगळया असुन त्यापैकी 24 पांढ-या व 06 निळया रंगाच्या प्लास्टीक चुंगळया दिसुन आल्या त्यापैकी एका प्लास्टीक चुंगळीमध्ये पि.के. कंपणीचा पान मसाला
गुटख्याचे एकण 60 पॉकीट प्रती पाँकीटमध्ये 62 पाउच बंद असुन प्रती पँकीट अं.कि. 120/- रू. प्रमाणे एकुण 30 प्लास्टीक चुंगळयामध्ये एकुण 1.800 पिके, कंपणीचा पान मसाला गुटख्याचे
पाँकीट एकुण कि. 2,16,000/ -रू 2) एका पांढ–या रंगाच्या प्लास्टीक चुगंळीत कागदी खोक्यात सिलबंद 15 बॉक्स असुन प्रती बाँक्समध्ये 10 RATNA TOBACCO 3000 असे इंग्रजीत नाव असलेली सुगंधीत तंबाखु प्रती बॉक्स कि. 1020/- रू. प्रमाणे असुन एकुण 15 बॉक्समध्ये 150 डब्बे एकुण कि. 15.300/ -रू 3) एका पांढ-या रंगाच्या प्लास्टीक चुंगळीत मुसाफीर पान मसाला गुटख्याचे 101 पाँकीट प्रती पाँकीट 120 रू. प्रमाणे एकुण कि.
12;120/’र .चा माल महाराष्ट्र राज्यात प्रतीबंधीत असलेला सुगंधीत गुटखा तंबाखुज्य पदार्थ आरोपी क्र. 02 यांच्या सांगण्यावरून अवैद्यरित्या विना परवाना विक्री करण्याच्या हेतुने चारचाकी
स्कोडा गाडी क्र. एम एच 14डी एफ 0154 अं.कि. 5.00,000/ – रू. असा एकुण कि 7.43,420 माल जप्त. गाडीत भरून आरोपी क्र. 01 हा नमुद माल वाहतुक करतांना मिळुन आल्याने नमुद दोन्ही आरोपींविरूध्द अप क्र – 141 / 2025 कलम 274, 275, 123 223.३(6)भा.न्या संहिता-2023 सहकलम 26(2).().27. (2). (iv). 26(2). (1). 30,(2).(1) अन्न व सुरक्षा आणि मानके अधिनीयम 2006 प्रमाणे पोलिस स्टेशन गोबरवाही येथे गुन्हा नोंद करण्यात आला

सदरची कार्यवाही पोलिस अधिक्षक नूरुल हसन,अपर पोलिस अधिक्षक ईश्वर कातकोडे यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक गोबरवाही शरद शेवाळे आणि डी बी पथकाने केली


