रात्र गस्तीदरम्यान कारधा पोलिसांनी पकडला २२ लाख रु किंमतीचा गुटखा….

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

सुगंधित तंबाखू व गुटख्याची अवैधरित्या वाहतुक करणाऱ्यावर कारधा पोलिसांची  कारवाई 40,92,004/- रु चा मुद्देमाल केला जप्त….

कारधा(भंडारा)प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक यांचे आदेशाने अवैध धंद्यावर कार्यवाही करण्याच्या उद्देशाने पोलिस स्टेशन कारधा येथील डी बी पथकातील नापोशि. विकास जानकीराम जाधव हे पोलिस स्टॉप सह पो. स्टे परीसरात पेट्रोलिग करीत असतांना त्यांना मुखबीर कडुन गोपनीय माहीती मिळाली की कारधा शहरातुन सुंगंधीत तंबाखु तसेच गुटख्याची वाहतुक होणार आहे





या अनुषंगाने पंचासह  पहाटे ४.४० ते ५ च्या दरम्यान कारधा चौक येथे नाकाबंदी दरम्यान आयचर गाडी क्र. सि. जी. 08 ए.आर. 6050 ची झडती घेतली असता सदर वाहनात 1) Pan Parag Premium Mrp Rs 4/- (30*104) असे 60 केस2) Pan Parag Supreme Rs 20 ((60*12) असे 60 केस 3) Pan Parag Premium Rs 10 (103*21) असे 60 केस असा माल किमती 22.22.221/रु चा माल व MS CHANNEL 100×50 MM चे लोखंडी चॅनल की 3.69.783./रु. चा माल मीळुन आला सदर वाहन क्र.आयचर सि. जी. 08 ए.आर. 6050 कि 15.00.000/रु. असा एकुण *40,92,004/-रु माल मिळुन आला



सदर आरोपी चालक नामे. 1) बलराम रामुजी रिझोलीया वय 40 वर्ष रा. 36 कोहीनुर नगर पालदा इंदौर 2) दिनेश अंबादास गुजेरिया वय 30रा. मानपुर इंदौर (मध्य प्रदेश) हे अवैद्यरित्या सुगंधित तबाखु व गुटखा याची प्रतीबंधक साठा विक्री साठी साठवुन व वाहतुक करुन प्रतिबंधित अन्नपदार्थ हे खाल्यास ते मानव जिवीतास अपायकारक आहे व तो खाल्ल्याने शरीरास इजा होउ शकते म्हणुन महाराष्ट! शासनाने त्याचे उत्पादन, वितरण, विक्री व साठवणुकीवर प्रतिबंध लावलेला आहे, हे माहिती असतांना स्वतःच्या फायद्याकरीता या अन्नपदार्थाची विक्रीसाठी वाहतुक करतांनी मिळुन आल्याने अप क्र. 75/2025 कलम- 223, 274, 275, 123, 3(5) भा.न्या. संहिता-2023 सहकलम 59, 26(2)(A), 26(2)(iv), 27(3)(E), 3(1) (ZZ) (iv) अन्न सुरक्षा आणी मानके अधिनियम 2006 नमुद कलामान्वेय तोंडी रिपोर्टवरुन वरून सदरचा गुन्हा नोंद करण्यात आला



सदरची कारवाई पोलिस अधिक्षक नूरुल हसन, अप्पर पोलिस अधिक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत कुलकर्णी ,पोलिस निरीक्षक गणेश पिसाळ, यांच्या मार्गदर्शनाखाली विकास जानकीराम जाधव यांनी केली.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!