स्थानिक गुन्हे शाखेने अट्टल घरफोड्यास अटक करुन,साकोली व वरठी येथील घरफोडीचे गुन्हे केले उघड…..
अट्टल घरफोड्या भंडारा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात,२ घरफोड्या केल्या उघड…
भंडारा (प्रतिनिधी) – स्थानिक गुन्हे शाखा भंडारा यांनी घरफोड्या करणाऱ्या चोरट्याला मिळालेल्या गोपनीय माहितीवरून कौशल्यपूर्ण तपास करून शिताफीने अटक केली आहे. या प्रकरणी फिर्यादी नामे प्रशांत पुरुषोत्तम ईळपाते यांनी दिलेल्या फिर्यादीवरून साकोली व वरठी पोलिस ठाण्यात अनुक्रमे अप क्र 115/24 कलम 454, 380 भा.दं.वि. आणि अप क्र 45/24 कलम 454, 380 भा.दं.वि. अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील आरोपी व्यंकटी रामा गोडमारे, (वय 38 वर्ष), रा.विर्सी वार्ड, वडसा देसाईगंज, जि.गडचिरोली याला अटक करून त्याच्याकडून एक सोन्याची 117 ग्रॅम लगड कि.₹2,98,000/-, एक चांदीची 35 ग्रॅम कि. ₹2,000/-, एक चांदीची 250 ग्रॅम लगड कि.₹15,000/- असा एकुण- ₹3,15,000/- रु. चा मुद्देमाल हा जप्त केला आहे.
या बाबत अधिकची माहिती अशी की, स्थानिक गुन्हे शाखा, भंडारा चे पोहवा अजय बारापात्रे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारवर पोलिस स्टेशन साकोली अप.क्र. 115/24 कलम 454, 380 भा.दं.वि. मधील संशयीत आरोपी नामे व्यंकटी रामा गोडमारे, (वय 38वर्ष), रा.विर्सी वार्ड, वडसा देसाईगंज, जि.गडचिरोली याने केल्याचे समजले. त्यानंतर सपोनि.नारायण तुरकुंडे,पोहवा अजय बारापात्रे, सतिश देशमुख, संदीप मते, शैलेश बेदुरकर, बंटी मडावी, योगेश पेठे, आशीष तिवाडे, यांनी देसाईगंज येथुन आरोपी नामे व्यंकटी रामा गोडमारे, (वय 38 वर्ष), रा.विर्सी वार्ड, वडसा देसाईगंज, जि, गडचिरोली ताब्यात घेऊन स्थानिक गुन्हे शाखा, भंडारा येथे आणुन पोलिस अधीक्षक लोहित मतानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे व पोलीस निरीक्षक नितीन चिंचोळकर यांच्या मार्गदर्शनात आरोपीस विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्याने मार्च महिन्यात मौजा साकोली व वरठी जवळील दोन गावात घरफोड्या केल्याचे कबुल केले. सदर पोलिस स्टेशन च्या अभीलेखाची पाहणी केली असता (1) साकोली अप. क्र. 115/24 कलम 454, 380 भा. दं. वि, (2) वरठी अप. क्र. 45/24 कलम 454, 380 भा. दं. वि. असे दोन गुन्हे दाखल आहेत. सदर गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या मुद्देमालापैकी एक सोन्याची 117 ग्रॅम लगड कि. ₹2,98,000/-, एक चांदीची 35 ग्रॅम लगड कि. ₹2,000/-, एक चांदीची 250 ग्रॅम लगड कि. ₹15,000/- असा एकुण ₹3,15,000/- चा मुद्देमाल त्याच्या राहते घरातुन जप्त करून आरोपी नामे व्यंकटी रामा गोडमारे, (वय 38 वर्ष), रा.विर्सी वार्ड, वडसा देसाईगंज, जि.गडचिरोली यास पोलिस स्टेशन साकोली च्या ताब्यात पुढील कारवाई करीता देण्यात आले आहे.
सदरची कारवाई पोलिस अधीक्षक लोहित मतानी, अपर पोलिस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक नितीनकुमार चिंचोळकर, सहायक पोलिस निरीक्षक नारायण तुरकुंडे, हेड कॉन्स्टेबल अजय बारापात्रे, सतिश देशमुख, संदीप मते, शैलेश बेदुरकर, बंटी मडावी, योगेश पेठे, आशीष तिवाडे, कौशीक गजभिये यांनी अथक परिश्रम व कौशल्यपुर्ण तपास करुन आरोपीस ताब्यात घेवुन भंडारा जिल्ह्यातील दोन घरफोडीच्या गुन्ह्याची उकल केली आहे