
अवैधरित्या गोवंशाची वाहतुक करणारे स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात,१४ गोवंशाची केली सुटका…
अवैधरित्या गोवंश वाहतुक करणाऱ्या वाहनावर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई एकुण कि. 15,69,200/- रु चा मुद्देमाल केला जप्त,गोवंशाची केली सुटका….
भंडारा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त इसे की,अवैध गोवंश वाहतुक व तस्करीची माहिती स्थानिक गुन्हे शाखा, भंडारा चे पोलिस निरीक्षक नितीन चिंचोळकर यांना मिळाली. पोलिस अधिक्षक नुरुल हसन, अपर पोलिस अधिक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनात दिनांक 14 फेब्रुवारी रोजी स. पो. नि. शिरीष भालेराव,केशव पुंजरवाड, स. फौ. खैरे, पो. हवा. कठाणे, पो. शि. पेठे, श्रावाणकर,गजभिये यांना रवाना केले. मौजा शहापुर येथे नाकाबंदी करुन मिळालेल्या गोपनीय नुसार भंडारा कडुन नागपूर कडे जाणाऱ्या एका भरधाव आयसर वाहनाचा पाठलाग करुन धांबवुन पाहणी केली असता त्यात 14 गोवंश जातीचे जनावरे क्रूरपणे कोंबल्याचे दिसुन आले. सदरची जनावरे ही अवैधरित्या वाहतुक करण्यात येत असल्याने आरोपीतांवर कारवाई करण्याकरिता जनावरांना गौशाळेत सुरक्षीततेच्या दृष्टीने ठेवण्यात आली आहे.


सदर प्रकरणी आरोपी (1) राजु पंढरी चहांदे, वय 52 वर्ष, रा. गोडेगांव, जुनी कामठी, वाहक आरोपी शेख ईर्शाद शेख मुमताज, वय 35 वर्ष, रा. मदन चौक, कामठी यांनी वाहन मालक (3) मुस्तकीन अहमद कुरेशी यांच्या वाहनात, जनावर मालक (4) शेख अकील शेख हुसेन व (5) सलीम कुरेशी रा. जाफर नगर, सदर, नागपूर यांनी एकत्रीत पणे अंदाजे कि. 1,68,000/- रु 14 गोवंश जातीच्या जनावरांना क्रुरतेने कोंबुन आयसर क्र. MH-40-CD-9209 मध्ये भरुन अवैधरित्या वाहतुक करताना मिळुन आल्याने त्यांच्या ताब्यातुन एकुण कि, 15,69,200/- रु चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

सर्व आरोपी विरुध्द पोलिस स्टेशन जवाहर नगर येथे अप. क्र. 41/2025 कलम 281, 3 (5), भा. न्या. सं. सह कलम 11 (1), 11 (1) (5), 11 (1) (ज), 11 (1) (ग) प्राण्यांचा छळ प्रतीबंधक अधिनियम 1960, सह कलम 5 (अ), 9 महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम, 1976 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. पुढील तपास पोलिस स्टेशन जवाहर नगर चे अधिकारी करीत आहे.

सदरची कार्यवाही पोलिस अधिक्षक नुरुल हसन, अपर पोलीस अधिक्षक. ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा, भंडारा चे पोनि नितीन चिंचोळकर, सपोनि. शिरीष भालेराव, केशब पुंजरवाड, स. फौ. खैर, पो. हवा. कठाणे, पो. शि. पेठे,. श्रावाणकर, गजभिये यांनी केली.


