कत्तलीकरीता गोवंशाची वाहतुक करणारे गुन्हे शाखेने घेतले ताब्यात,१३८ गोवंशाची केली सुटका….
गोवंश जनावरांची कत्तलीकरीता वाहतूक करणाऱ्यांवर गुन्हे दाखल,स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी….
भंडारा (प्रतिनिधी) – गोवंश जनावरांची कत्तलीकरीता वाहतूक करणाऱ्यांना भंडारा गुन्हे शाखेने मिळालेल्या गोपनीय माहितीवरून कौशल्यपूर्णरित्या सहाय्यक पोलिस निरीक्षक नारायण तूरकुंडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून यातील आरोपी १) बालगोपाल रुषीजी दुरुगकर (वय ४९ वर्ष), २) लोकेश बालगोपाल दुरुगकर (वय २७ वर्ष) दोन्ही रा.आंबेडकर वार्ड शहापुर. टाटा कंपनीचा योध्दा वाहन क्र. एम.एच.२८/बी.बी.-४५३९ चा चालक व मालक यांच्यावर जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून १) एकुण १३३ गोवंश जातीची जनावरे किंमत अं. ९,५०,०००/-रु. २) टाटा कंपनीचा योध्दा वाहन क्र. एम.एच.-२८//बी.बी.-४५३९ किंमती ५,००,०००/-. ०२ नायलॉन दोरखंड किंमती ५००/-रु असा एकुण १४,५०,५००/-रु. चा मुददेमाल हा जप्त केला आहे.
या बाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखा भंडारा येथील पो.हवा.कैलाश पटोले यांनी जनावर अवैध वाहतूकीबाबत गोपनीय माहिती काढुन त्याबाबत पो.नि.नितीन चिंचोळकर यांना माहिती दिली. त्यावरुन त्यांनी स.पो.नि. तुरकुंडे यांचे पथक नेमुन कारवाई करण्याचे आदेश दिले. यावरुन पथकाने गोपनिय माहितीच्या आधारे (दि.२८जुलै) रोजी सायंकाळी ७.३० वा.चे दरम्यान डॅा.आंबेडकर वार्ड शहापुर ता.जि. भंडारा येथील आरोपी बालगोपाल रुषीजी दुरुगकर (वय ४९ वर्ष)रा.आंबेडकर वार्ड शहापुर यांचे जुने घरासमोर रेड केली असता, सदर ठिकाणी दोरखंडाने बांधुन ठेवलेले गोवंश जातीची एकुण १३३ जनावरे दिसुन आले. त्यापैकी ११ जनावरे एका टाटा योध्दा चारचाकी वाहनामध्ये कोंबलेले मिळुन आल्याने कायदेशिर कारवाई करुन १३३ गोवंश जनावरांना ध्यान फाउन्डेशन गौशाळा गराडा ता.लाखनी येथे सुस्थितीत दाखल करुन, कत्तलीकरीता नेण्यात येण्या-या असाहाय्य मुक्या जनावरांना जिवनदान मिळवुन देण्यास मोलाची कामगीरी केली आहे. तसेच यातील आरोपीतांविरुध्द पो.स्टे. जवाहरनगर येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पोलिस अधीक्षक लोहित मतानी, अपर पोलिस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक स्थागुशा नितीन चिंचोळकर, पो. हवा. गेंदलाल खैरे, पो.हवा. कैलाश पटोले, पो.हवा.राजु दोडे, पो.हवा.सुनिल ठवकर, पो.हवा.संजय दोडे, पो.हवा.रमेश बेदुरकर, पो.ना.अंकुश पुराम, पो.शि.ढबाले, पो.शि.पेठे, चा.पो.ना.गजभिये यांनी अथक परिश्रम करुन, १३३ गोवंश जनावरांना कत्तलीपासुन वाचवून जीवनदान दिले आहे.