पवनी येथील देहविक्री करणार्या हॅाटेलवर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा….

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

पवनी मध्ये देहविक्री करणाऱ्या हॉटेलवर भंडारा गुन्हे शाखेचा छापा; पिडीत महिलेची सुटका…

भंडारा (प्रतिनिधी) – भंडारा गुन्हे शाखेने पवनी येथे हॉटेल विराज बारच्या तळघरात सुरु असलेल्या देह व्यापार, वेश्या व्यवसायावर छापा टाकून पीडित महिलेची सुटका केली आहे. या प्रकरणी फिर्यादी नितिनकुमार चिंचोळकर, पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पवनी पोलिस ठाण्यात २०२४/२०२४ कलम ३,४,५,(१) (क) अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम, १९५६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या मध्ये पोलिसांनी आरोपी – रुपेश सूर्यभान शेंडे, (वय ३६ वर्षे) रा.चंडिकामाता मंदिर शनिवारी वार्ड, पवनी याला अटक केली आहे.





या बाबत अधिक माहिती अशी की, (दि.०१जुन) रोजी फिर्यादी हे स्थानिक गुन्हे शाखा कार्यालय, भंडारा येथे हजर असतांना त्यांना मुखबिर कडून खात्रीशीर माहिती मिळाली की, मौजा पवनी येथील कोरंभीकडे जाणा-या रोडवरील हॉटेल विराज बारच्या तळघरात देह विक्रीचा व्यवसाय, वेश्या व्यवसाय सुरू आहे. सदर खबरेवरून त्यांनी पंटर यास कार्यालयात बोलावून त्यास मुखबीरकडून मिळालेल्या खबरेची माहिती देवून त्यास खाजगी वाहनाने त्याचप्रमाणे फिर्यादी व सपोनि पुंजरवाड, मपोउपनि कुळमेथे, पोहवा. बेदुरकर, पोहवा. पटोले, पोहवा. बारापात्रे, पोहवा. मस्के, मपोना. पटले, मपोना. कापगते, चापोहवा. खराबे, चापोना. तिवाडे असे शासकीय वाहनाने रवाना झाले.



पंटर याने फिर्यादीस फोनकरून इशारा दिल्याने पोलिस स्टाफ सोबत हॉटेल विराज बार चे मागिल बाजुने असलेल्या लोखंडी शिडीने खाली जावून पाहिले असता हॉल लगत असलेल्या एका बंद रूममध्ये पंटर सह पिडीत स्त्रि दिसून आली. सदर स्रि हिला महिला अधिकारी यांचे कडून विचारपुस केली असता तिने सांगितले कि, आरोपी रूपेश शेंडे रा.पवनी ह्या इसमाने तिला येथे देह व्यवसाया करीता बोलाविले असून तो तिचे कडून देह व्यवसाय करून घेतो.



घटनास्थळावरून – १) LOVE GUARD कंपनीचे ३ सिलबंद काँडोम पॉकेट प्रत्येकी १२ नग प्रमाणे एकुण ३६ नग एकुण किंमती ३६०/- रू, २) LOVE GUARD कंपनीचे १० नग सिलबंद काँडोम एकुण किंमत १००/- रूपये आरोपीच्या अंगझडतीमध्ये ५००/- रूपयांच्या ९ नोटा, २००/- रूपयांची १ नोट, १००/- रूपयाच्या ४ नोटा, २०/- रूपयांची १ नोट, १० रूपयांच्या २ नोट असे एकुण ५,१४०/- रूपये एकुण मुद्देमाल ५,६००/- असे मिळून आले. आरोपी नामे रूपेश सुर्यभान शेंडे (वय ३६ वर्ष) रा.चंडिकामाता मंदिर शनिवारी वार्ड, पवनी याचे विरूध्द पो.स्टे. पवनी अप.क्र.२२४/२०२४ कलम ३, ४, ५(१) (क) अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियम, १९५६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कार्यवाही ही लोहित मतानी, पोलीस अधीक्षक, भंडारा यांचे मार्गदर्शनात पोनि नितीनकुमार चिंचोळकर, सपोनी केशव पुंजरवाड, मपोउपनि प्रिती कुळमेथे, पोहवा बेदुरकर, पोहवा पटोले, पोहवा बारापात्रे, पोहवा मस्के, मपोना पटले, मपोना. कापगते, चापोहवा. खराबे, चापोना तिवाडे सर्व स्थानिक गुन्हे शाखा, भंडारा यांनी केली आहे.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!