तुमसर परीसरातील कुख्यात गुंड रफिक व त्याची टोळीस २ वर्षाकरीता केले हद्दपार…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

कुख्यात गुंड रफिक व त्याच्या गँग मधील सदस्य यांचेवर भंडारा पोलीसांची हद्दपारीची कार्यवाही,दोन वर्षा करीता भंडारा जिल्ह्यातुन केले हद्दपार…..

भंडारा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,लोकसभा निवडनुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हा पोलिस अधिक्षक लोहीत मतानी हे जिल्ह्यातील धोकादायक व्यक्ती यांचेवर अंकुश बसावा म्हनुन कायदेशीर कार्यवाहीचे करण्याचे आदेश सर्व प्रभारींना दिलेले आहेत





त्याच अनुषंगाने तुमसर येथील टोळी प्रमुख 1) रफिक निसार शेख वय 32 वर्ष रा. आंबेडकर वार्ड तुमसर, ता.तुमसर, जि. भंडारा
(गुन्हेगारी टोळीचे सदस्य) 2) रत्नदिप उर्फ कालु हेमराज माटे वय 41 वर्ष रा. जगनाडे नगर तुमसर ता. तुमसर,जि. भंडारा 3 ) भुपेंद्र मोहन गिलोरकर वय 32 वर्ष रा. हनुमान नगर तुमसर, ता.तुमसर, जि. भंडारा 4 ) गौरव उर्फ विक्की क्रिष्णा राखडे वय 19 वर्ष रा. दुर्गा नगर तुमसर, ता.तुमसर, जि. भंडारा 5) शुभम उर्फ झब्या देवेंद्र
कटकवार वय 29 वर्ष रा. कुंभारे वार्ड तुमसर, ता.तुमसर, जि. भंडारा 6) मयूर उर्फ गप्पु रविकांत सांडेकर वय 22 वर्ष रा. देव्हाडी, ता.तुमसर, जि. भंडारा 7) मनोज देविदास कान्हेकर वय 37 वर्ष रा. कुंभारे वार्ड तुमसर, ता. तुमसर, जि. भंडारा) राकेश गंगाधर लांजेवार वय 29 वर्ष रा. नेहरु वार्ड तुमसर, ता.तुमसर, जि. भंडारा ता.तुमसर, जि. भंडारा हे पोलिस स्टेशन तुमसर हद्दीतील तुमसर शहर येथील रहिवासी असुन ते गुंड व खुनसी प्रवृत्तीचे गुन्हेगार आहेत. टोळी प्रमुख व टोळी सदस्य यांचेवर सन 2015 पासुन निर्विघ्न गुन्हेगारी क्षेत्रात सक्रिय असुन त्याचेवर पोलीस ठाणे तुमसर येथे खुन, खुनाचा प्रयत्न, दंगा, गंभीर दुखापत, खंडणी, दरोड्याची पुर्व तयारी करणे. अशा प्रकारचे अनेक गुन्हे दाखल आहेत. त्यांनी गुंडागर्दी करुन संघटीत गुन्हेगारी टोळी अशी ओळख निर्माण केली होती. त्याचे कृत्यामुळे सार्वजनिक सुव्यवस्थेवर विपरीत प्रभाव निर्माण
होऊन सार्वजनिक सुव्यवस्था धोक्यात येऊन प्रचंड दहशत निर्माण झाली असल्याने अशा समाज विघातक व्यक्तीवर अंकुश बसविने गरजेचे होते.



अशा सराईत गुन्हेगारास कायद्याचे कसोटीत बसवुन त्याचे गुन्हेगारीचा अस्त करणे हाच एकमेव पर्याय असल्याने जिल्हा पोलिस अधीक्षक लोहित मतानी यांच्या मार्गदर्शानात वरील टोळी प्रमुख व टोळी सदस्य यांनी पोलिस स्टेशन तुमसर परीसरातील दहशत पसरवित असल्याने पोलिस निरीक्षक नरेन्द्र हिवरे पो.स्टे. तुमसर यांनी प्रस्ताव तयार केला. लोकसभा निवडणुकी दरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणुन हद्दपार प्राधिकरण तथा पोलिस अधीक्षक, भंडारा यांनी दि (5)रोजी  गुन्हे अभिलेख तपासुन महाराष्ट्र पोलिस अधिनियम कलम 55 प्रमाणे कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे.
सदरची कारवाई पोलिस अधीक्षक लोहित मतानी,अपर पोलिस अधीक्षक  ईश्वर कातकडे, सहा. पोलिस अधीक्षक तथा उपविभागीय पोलिस अधिकारी,तुमसर  रश्मिता राव एन,  यांचे मार्गदर्शनात नितीनकुमार चिंचोळकर पोलीस निरीक्षक (स्था.गु.शा.), तत्कालीन ठाणेदार निलेश ब्राम्हणे, व ठाणेदार नरेंद्र हिवरे पोलिस निरीक्षक, पोलिस स्टेशन तुमसर, सफौ. धर्मेंद्र बोरकर, पो.हवा.राजेश पंचबुधे, पो.ना. अंकोश पुराम, पो.ना. मार्कड डोरले यांनी केली.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!