
भंडारा गुन्हे शाखेने संशयीत ईसमास ताब्यात घेऊन विद्युत तार चोरीचे आठ गुन्हे केले उघड…
भंडारा गुन्हे शाखेने विद्युत तार चोरीचे आठ गुन्हे केले उघड…
भंडारा (प्रतिनिधी) – स्थानिक गुन्हे शाखा, भंडारा यांनी विद्युत तार चोरीच्या तब्बल आठ गुन्ह्यांची उकल करून आरोपींना शिताफीने अटक केली आहे. या मध्ये 1) 700 मिटर लांब ॲल्युमिनीयम तार, 2) 08 कि.मी. लांबीची ॲल्युमिनीयम तार, 3) अॅल्यमिनियम तारा अंदाजे 500 किलो, 4) अंदाजे 3 कि.मी अॅलुमिनियम तार असा एकूण 18 लाखांचा मुद्देमाल हा जप्त करण्यात आला आहे. आरोपी – 1) सचिन उत्तमराव कटनकर, वय 34 वर्ष. रा. बिरसा मुंडा चौक शेंदुरवाफा/साकोली, जि. भंडारा. 2) निखिल शिवनाथ मडावी, (वय 26) रा.बिरसा मुंडा चौक सानगडी, ता.साकोली,जि.भंडारा., 3) परवेज मस्जीद अगवान, (वय 27) रा.आमगाव/बुज, ता.साकोली, जि.भंडारा, 4) तुषार धनराज लांजेवार, (वय 25 वर्ष), रा.पळसगाव/सोनका, ता.साकोली, जि.भंडारा, 5) दिपरत्न प्रदीप उके, (वय 29) वर्ष, रा.पळसगाव/सोनका, ता.साकोली, जि.भंडारा, आदींवर कारवाई केली आहे.


या बाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक गुन्हे शाखा, भंडारा येथील पोलिस हवालदार नितीन महाजन यांना गोपनीय सुत्रांकडुन खात्रीलायक माहीती मिळाली की, सेंदुरवाफा येथील ईलेक्ट्रीक कंत्राटदार सचिन कटनकर याचे घरी चोरीचे ॲल्युमिनीयम व तांब्याच्या ताराचा साठा अवैधरित्या साठवुन ठेवला आहे.

अशा माहितीवरुन सपोनि नारायण तुरकुंडे, पोहवा नितीन महाजन, राजेश पंचबुध्दे, संदीप मते, आशीष तिवाडे, पंकज भित्रे, पोशि जगदीश श्रावणकर, मंगेश माळोदे, यांच्या सोबत आरोपी सचिन कटनकर याचे घरी जाऊन सचिन कटनकर यास विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्याचे घरी 1) उच्चदाब वाहीनीचे ॲल्युमिनीयम तिहेरी तार अंदाजे किमती 7000/- रु, 2) पो.स्टे. लाखांदुर अप.क्र. 12/2020 कलम 379 भा.दं.वी. अंदाजे 700 मिटर लांब ॲल्युमिनीयम तार किमती 20,000/-रु, 3) पो. स्टे. अड्याळ अप. क्र. 89/2024 कलम 379 भा.दं.वी अंदाजे 08 कि.मी. लांबीचा ॲल्युमिनीयम तार किमती 1,80,000/- रु, 4) पो.स्टे. कारधा अप.क्र. 221/2024 कलम 379 भा.दं.वी. अंदाजे 3 कि.मी अॅलुमिनियम तार किमती 50,000/- रु. 5) पोलिस स्टेशन सिहोरा अप. क्र. 102/2024 कलम ३७९ भा.दं.वी.अंदाजे 400 किलो ॲल्युमिनीयम तार कि.20,000/-रु, ६) पो.स्टे सिहोरा अप. क्र.121/2024 कलम 379 भा.दं.वी. घटनास्थळ अॅलुमिनियम तारा अंदाजे 500 किलो किमती 1,00,000/- 7) पो. स्टे.सिहोरा अप.क्र.164/2023 कलम 379 भा.दं.वी. सह कलम 3, 4 महा. मालमत्ता विद्रुपन प्रति. अधि. अंदाजे 03 कि.मी. ॲल्युमिनीयम् तार किमती 14,50,000/- रु 8) पो.स्टे. साकोली अप. क्र. 308/2024 कलम 379 भा.दं.वी. अंदाजे 70 ते 80 तांब्याचे विदयुत वायर कि.4000/- रु असा एकुण 18,31,000/- रु. चा चोरीस गेलेला मुद्देमाल हा जप्त करण्यात आला आहे.

आरोपी नामे (1) सचिन उत्तमराव कटनकर, (वय 34 वर्ष), रा.बिरसा मुंडा चौक शेंदुरवाफा साकोली, जि.भंडारा यास विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्याने त्याचे आरोपी मित्र नामे (2) निखिल शिवनाथ मडावी, (वय 26 वर्षे) रा.सानगडी, ता.साकोली, जि.भंडारा, (3) परवेज मस्जीद अगवाल, (वय 27 वर्षे), रा.आमगाव बुज, ता.साकोली, जि.भंडारा, (4) तुषार धनराज लांजेवार, (वय 25 वर्ष), रापसगाव सोनका, ता.साकोली, जि.भंडारा, (5) दिपरत्न प्रदीप उके, (वय 29 वर्ष), रा.पळसगाव सोनका, ता.साकोली, जि.भंडारा यांच्या वसाने मौजा पो.स्टे. लाखांदूर गाव चिचगाव, विरली (बु), पो.स्टे. अडयाळ कोसरा, पोस्टे. कारधा सहा पला, पोस्टे. वाहनी वाहनी, चुल्हाड, मच्छेरा व पोस्टे. साकोली समुद्र शिवनीबांध येथुन रात्री दरम्यान चोर कलाकार कबुल केले. सर्वांना पोलिस स्टेशन कारधा यांच्या ताब्यात पुढील कारवाई करीता देण्यात आले आहे.
सदरची कारवाई पोलिस अधीक्षक लोहित मतानी, अपर पोलिस अधिक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक नितीनकुमार चिंचोळकर, सहाय्यक पोलिस निरीक्षक नारायण तुरकुंडे, पोहवा नितीन महाजन, राजेश पंचबुध्दे, संदीप मते, आशीष तिवाडे, पंकज भित्रे, पोशि जगदीश श्रावणकर, मंगेश माळोदे यांनी अथक परिश्रम व कौशल्यपुर्ण तपास करुन भंडारा जिल्ह्यातील एकुण आठ ॲल्युमिनीयम तार चोरीच्या गुन्ह्याची उकल केली आहे.


