
आयपीएस रश्मिता राव यांची धडक कारवाई; क्रिकेट सट्टेबाजांवर टाकली धाड
आयपीएस रश्मिता राव.एन.यांची धडक कारवाई; क्रिकेट सट्टेबाजांवर टाकली धाड
तुमसर(भंडारा) – तुमसर मध्ये क्रिकेट मॅचवर सट्टा लावणाऱ्यांवर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या मुळे अवैध धंदेवाल्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत. रश्मिता राव.एन.सहाय्यक पोलिस अधीक्षक उपविभाग तुमसर ह्या आपल्या स्टाफ सह पोलिस स्टेशन तुमसर हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना त्यांना माहिती मिळाली की, सार्वजनिक ठिकाणी लोकांकडून पैसे घेऊन सट्टा खेळला जात आहे. अशी माहिती मिळताच पोलिसांनी क्रिकेट सट्टयावर धाड टाकत मोठी कारवाई करून बिटिंगच्या म्हणजेच सट्टयाच्या गोरखधंद्याचा पर्दाफाश केला आहे.


या बाबत अधिक माहिती अशी की, दि.12 डिसेंबर रोजी रश्मिता राव. सहाय्यक पोलिस अधीक्षक उपविभाग तुमसर हे आपल्या स्टाफ सह पोलिस स्टेशन तुमसर हद्दीत पेट्रोलिंग करीत होत्या. त्या वेळेस त्यांना माहिती मिळाली की, जवळच सार्वजनिक ठिकाणी इंडीया विरुद्ध दक्षिण आफ्रिका च्या क्रिकेट मॅचवर लोंकाकडून पैसे घेऊन पैशांच्या हारजितचा जुगार खेळ खेळला जात आहे. त्या वर मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी सहाय्यक पोलिस अधीक्षक रश्मिता राव.यांच्या स्टाफ ने छापा टाकला टाकून सट्टयाच्या साहित्यासह मोबाईल जप्त केले. या मध्ये
आरोपी – 1) प्रशांत लांजेवार, रा. तुमसर, 2) भुऱ्या उर्फ सुनिल बिसने,रा.तुमसर, 3) बाल्या बिसने दोन्ही रा. तुमसर, 4) गुप्ता रा.गोंदिया, 5) आनंद रागळवार रा. तुमसर, 6) क्रिशु साखरवाडे रा.तुमसर, 7) राहुल पाडे रा तुमसर, 8) चेतन सार्वे रा.तुमसर, यांच्यावर गुन्हे दाखल केले असून पुढील तपास पोलिस करत आहेत.



