सोनाळा(बुलढाणा)पोलिसांनी पकडला मोठा शस्त्रसाठा…
सोनाळा पोलिस स्टेशन हद्दीत सहा देशी पिस्टुलांसह 01 हरीयाना येथील आरोपीस अटक, 1,84,320/-रु.चा मुद्देमाल जप्त.सोनाळा पोलिसांची यशस्वी कारवाई…..
सोनाळा(बुलढाणा)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,
जिल्ह्याला लागून असलेल्या मध्यप्रदेश राज्याचे सीमेवर लागुन असलेले पोलिस स्टेशन म्हनजे सोनाळा,तामगांव, जळगांव जामोद हद्दीतील ग्राम टुनकी परिसरात देशी बनावटीचे अग्नीशस्त्र (पिस्टल), काडसूसे वगैरेची खरेदी-विक्री होत असल्याच्या तक्रारी येत होत्या. त्या अनुषंगाने तसेच आगामी सार्वत्रिक लोकसभा निवडणूक- 2024 चे पार्श्वभूमीवर अशा अग्नीशस्त्रांची खरेदी विक्रीला प्रतिबंध करुन,असे व्यवहार करणारे ईसमांचा शोध घेवून, त्यांचेवर प्रचलित कायद्यानुसार कारवाई करण्यसाठी पोलिस अधीक्षक सुनिल
कडासने, अपर पोलिस अधीक्षक अशोक थोरात, बी. बी. महामुनी यांनी संबंधीत पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी यांना आदेशीत केले होते.
त्यानुसारच दि. 23.02.2024 रोजी सपोनि. चंद्रकांत पाटील प्रभारी अधिकारी,पोहवा विनोद शिंबरे,पोशि राहूल पवार,चापोशि.शेख इम्रान शेख रहेमान सर्व पो.स्टे. सोनाळा यांचे पथकाला गोपनीय खबर मिळाली की, पो.स्टे. सोनाळा हद्दीतील ग्राम टुनकी बु. ते लाडणापूर रोडवरील केदार नदीचे पुलाजवळ एक ईसम देशी बनावटीचे पिस्टल (अग्नीशस्त्र) खरेदी विक्री करण्याच्या उद्देशाने त्याचे ताब्यात बाळगून आहे. सदर गोपनीय खबरे वरुन नमुद पोलिस स्टाफ यांनी सदर ईसमास पकडून, त्याची अंगझडती
घेतली असता त्याचे जवळ खालील प्रमाणे मुद्देमाल मिळून आला. सदर प्रकरणी पो.स्टे. सोनाळा येथे गुरनं. 46/2024 कलम 3/25
अग्नी शस्त्र कायद्या प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असुन
वसीम खान ईलीयास खान वय 22 वर्षे, रा. सिंगार, पुन्हाना, जिल्हा – नुहू, राज्य हरीयाणा. याला ताब्यात घेऊन त्याचेकडुन
1) देशी बनावटीचे 06 नग अग्नीशस्त्र (पिस्टल)
किं. प्रत्येकी 30,000/- रुपये प्रमाणे 1,80,000/-रुपये,
2) 07 नग पिस्टल मॅग्झीन किं. 2000/- रुपये,
3) एक नग जिवंत काडतूस किं. 500/- रुपये,
4) एक मोबाईल फोन क्रि. 500/- रुपये,
5) नगदी रोख- 1120/- रुपये,
6) एक बॅग किं. 200 /- रुपये
असा एकूण 1,84,320/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन सदर गुन्ह्यातील ईतर आरोपीतांचा शोध व तपास सुरु आहे
नमुद गुन्ह्यामध्ये ईतर आरोपीतांचा शोध घेणेकरीता पोलिस अधीक्षक, बुलढाणा यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अशोक एन.लांडे प्रभारी अधिकारी स्था.गु.शा. बुलढाणा यांचे नेतृत्वामध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे पथके तयार करण्यात आले आहेत. सदरची
पथके व आरोपीचा शोध घेण्यासाठी रवाना करण्यात आलेली आहेत. गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि. चंद्रकांत पाटील प्रभारी
अधिकारी पो.स्टे. सोनाळा करीत आहेत
सदरची कामगिरी सुनील कडासने पोलिस अधीक्षक बुलडाणा, अशोक थोरात-,अपर पोलिस अधीक्षक खामगांव, बी.बी महामुनी,अपर पोलिस अधीक्षक,बुलढाणा डि एस. गवळी उपविभागीय पोलिस अधिकारी मलकापूर यांचे आदेशाने
व मार्गदर्शनाखाली, सपोनि. चंद्रकांत पाटील प्रभारी अधिकारी, पोहवा विनोद शिंबरे,पोशि राहूल पवार, चापोशि. शेख इम्रान शेख
रहेमान सर्व पो.स्टे. सोनाळा यांचे पथकाने पार पाडली आहे.