
बुलढाणा पोलिस अधिक्षकांच्या आदेशान्वये जिल्ह्यात अवैध धंदे विरोधात राबविली जातेय विशेष मोहीम…
बुलढाणा – दि. 25.09.2023 रोजी पोलिस अधिक्षक, बुलढाणा यांनी अवैध धंदयाविरुध्द कडक मोहिम राबविण्या संबंधाने आदेशीत केल्याने दि. 25.09.2023 रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पोलिस स्टेशन अंढेरा चे हददीत अवैध रेती उपसा व वाहतुकीबाबत वाळू उपसा करणारी एक बोट किंमत अंदाजे 4 लाख रुपये, एक अशोक लेलँड कंपनीचे टिप्पर किं. 25 लाख रुपये, विना रॉयल्टी वाळु अंदाजे 3 ब्रास कि. 30 हजार रुपये व इतर साहित्य कि. 1 लाख 20 हजार रुपये असा एकुण 31 लाख 30 हजार रुपयांचा मुददेमाल जप्त करुन पाच आरोपी विरुध्द कलम 379, 34 भा.दं.वि. सह कलम 21 (1), 21 (2) गौण खनिज अधिनियम प्रमाणे कार्यवाही करण्यात आली. तसेच
दिनांक 25.09.2023 रोजी बुलढाणा शहरात ईक्वाल चौक व मच्छी मार्केट परिसरात अवैधरित्या चालणा-या वरळी मटक्यावर छापा टाकुन दोन आरोपींना ताब्यात घेवुन त्यांचे कब्जातुन वरळी मटका साहित्य व रोख 7890/- रुपये जप्त करुन पोलिस स्टेशन बुलढाणा शहर येथे 02 गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
त्याचप्रमाणे दि. 26.09.2023 रोजी बुलढाणा शहरात मिळालेल्या गोपानिय माहिती वरुन सरुबाई वसुदेव लाड रा. छत्रपती नगर वार्ड नं. 01 बुलढाणा यांचेवर छापा टाकला असता सदर महिला हि अवैधरीत्या गांजा अंमलो पदार्थ जवळ बाळगुन मिळुन आली. तिचे जवळुन 1300 ग्रॅम गांजा अंमली पदार्थ कि. 15,600/- रु चा जप्त
करण्यात आला असुन पोलिस स्टेशन बुलढाणा शहर येथे कलम 8 क 20 (ब) 2 (ब) एन. डि. पि.एस. अॅक्ट प्रमाणे कार्यवाही करण्यात आली आहे.
सदरची कामगिरी ही सुनिल कडासणे, पोलिस अधिक्षक, बुलडाणा, बि.बि. महामुनी, अपर पोलिस अधीक्षक.बुलढाणा, अशोक थोरात अपर पोलिस अधिक्षक, खामगाव यांच्या मार्गदर्शनाखालो व अशोक लांडे, पोलिस निरीक्षक, स्था. गु. शा. यांच्या आदेशान्वे सपोनि स्वप्नील नाईक सपोनि निलेश सोळंके, पोहेकॉ दिपक लेकुरवाळे, शरद गिरी, अरुण हेलोडे, पंकज मेहेर, राजेंद्र अंभोरे, राजकुमार राजपुत पो.ना. गणेश पाटील, गजानन दराडे, युवराज राठोड, पोकॉ गणेश शेळके, जयंत बोचे मपोकॉ वनिता शिंगणे सर्व नेमणुक
स्थानिक गुन्हे शाखा, बुलडाणा यांनी केली.




