गोधन चोरुन त्यांची तस्करी करणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

शेतकऱ्यांचे ‘पशूधन’ चोरणार्या आंतरजिल्हा टोळीस स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद,एकुन 10 गुन्ह्यांची केली उकल रोख 50,000/-रु.सह, ईनोव्हा व ईतर असा एकूण 5,55,000/-रु. चा मुद्देमाल केला जप्त….

बुलढाणा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि. 13/08/2025 रोजी पो.स्टे. चिखली येथे फिर्यादी श्री. गोपाल चंद्रशेखर साखरकर रा. राऊतवाडी, चिखली यांनी तक्रार दिली की, दि.10/08/2025 ते दि.11/08/2025 रोजीचे रात्री दरम्यान त्यांनी त्यांचे गोठ्यामध्ये बांधून ठेवलेली लाल रंगाची गाय किं. 32,000/-रु. हिला अज्ञात चोरट्यांनी निर्दय व क्रुर वागणूक देऊन, सिल्वर रंगाच्या इनोव्हा कारमध्ये डांबून चोरुन नेले. अशा तक्रारीवरुन पो.स्टे. चिखली येथे अप.क्र. 638/2025 कलम 303(2),281,3(5) भा.न्या.सं. सहकलम 5 (अ),5(ब),9,11(1) (क),11(1)(ड) प्राण्यांचा छळ प्रतिबंधक कायदा प्रमाणे गुन्हा नोंद आहे.







तसेच जिल्ह्यात पशुधन चोरीच्या घटना सतत घडत होत्या त्याअनुषंगाने शेतकरी बांधवांचे पशुधन चोरोच्या गुन्ह्यांची गंभीर दखल घेवून, अशा चोरीच्या गुन्ह्यांचा सखोल व बारकाईने तपास करुन, गुन्ह्यांची उकल करुन, गुन्ह्यातील आरोपी व मुद्देमालाचा शोध घेणेबाबत तसेच अशा गुन्ह्यांना प्रभावि प्रतिबंध करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजनांची अंमलबजावणी करणेबाबत पोलिस अधिक्षक निलेश तांबे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला आदेशीत केले होते.



सदर आदेशान्वये, पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा. सुनील अंबूलकर यांनी त्यांचे अधिनस्त पोलिस अधिकारी व अंमलदार यांचे स्वतंत्र पथक तयार करुन, पशूधन चोरीच्या गुन्ह्यांचा समांतर तपास करुन वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे कार्यवाही करणेबाबत पथकास सुचना दिल्या त्यानुसार दि. 17/08/2025 रोजी सदर गुन्ह्याचा स्था.गु.शा.च्या पथकाने सखोल व बारकाईने समांतर तपास करीत असतांना काही आरोपी हे जनावरं चोरीसाठी जिल्ह्यात असल्याची माहिती मिळाली, यावरुन पो.स्टे. चिखली हद्दीत जाफ्राबाद रोडवर नाकाबंदी करुन 1) रशीद शेख शफी वय 45 वर्षे रा. जूना बरजेई रोड, सिध्दीकनगर, धुळे, 2)शेख नदीम शेख जाबीर वय 24 वर्षे, रा. ईदगाहनगर, सिल्लोड,3)सय्यद मोईन सव्यद अजीम वय 25 वर्षे, रा. जैनुद्दीन कॉलनी, सिल्लोड,4) मोहम्मद कुरवान मोहम्मद अजीज वय 35 वर्षे, रा. सिध्दीकनगर, धुळे,5) शेख समीर शेख खलील वय 28 वर्षे रा. स्नेहनगर, सिल्लोड यांना निष्पन्न करुन आरोपींना ताब्यात घेण्यात आले.



सदर आरोपींनी विचारपूस दरम्यान जिल्ह्यात विवीध ठिकाणी जनावरे चोरीच्या एकूण 10 गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांचे ताव्यातून 1) नगदी रोख रक्कम 50,000/-रु2) ईनोव्हा गाडी किं. अं.- 5,00,000/-रु 3) एक मोबाईल किं.अं.- 5,000/-रुपये, 4) एक नग रस्सी दोरखंड कि.00/-रुपये, एकूण 5,55,000/-रु.चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

तसेच त्यांची अजुन सखोल चौकशी केली असता चोरीचे 10 गुन्ह्यांची उकल करण्यात आली सदर आरोपींनी1.)पो.स्टे. चिखली–01 गुन्हा 2) पो.स्टे. बुलढाणा ग्रामीण–02 गुन्हे3) पो.स्टे. चाड–03 गुन्हे 4) पो.स्टे. रायपूर–03 गुन्हे 5)पो.स्टे. बुलढाणा शहर–01 गुन्हा असे जनावरे चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे.गुन्ह्यात वरील 05-आरोपींना पकडण्यात आले असून त्यांना पुढील कारवाईकामी पो.स्टे. चिखली यांच्या ताब्यात देण्यात आले आहे. उर्वरीत फरारी आरोपींचा स्था.गु.शा.च्या विशेष पथकांकडून शोध घेण्यात येत आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पो.स्टे. चिखली करीत आहेत.

सदरची कामगिरी पोलिस अधिक्षक निलेश तांबे,अपर पोलिस अधिक्षक, बुलढाणा अमोल गायकवाड,अपर पोलिस अधिक्षक खामगाव श्रेणिक लोढा यांचे आदेशाने पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सुनिल अंबुलकर यांचे नेतृत्वात पोउपनि, प्रताप बाजड, पोहवा. शरद गिरी, दिपक लेकुरवाळे, शेख चाँद, पुरुषोत्तम आघाव नेमणूक-स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा, पोहवा राजू आडवे यांनी केली

 





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!