
सम्रुध्दी महामार्गावरुन मुंबईकडे जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सवर दगडफेक करणारे काही तासात बुलढाणा पोलिसांचे ताब्यात….
समृध्दी महामार्गावरुन जाणाऱ्या ट्रॅव्हल्सवर दगडफेक करणारे ४८ तासाचे आत बुलढाणा पोलिसांनी केले जेरबंद…
बुलढाणा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि.०७ ॲाक्टोबर २०२४ रोजी दिग्रस येथुन मुंबई येथे जाण्याकरीता निघालेल्या माही ट्रॅव्हल्स क्रमांक एम एच २९ ची.ई ६७७७ हि मेहकर कडुन समृध्दी महामार्गाने जात असतांना बीबी हद्दीत समृध्दी महार्गावर असलेला देउळगांव कोळ गावाजवळील ओव्हरहेड ब्रिज वरुन अज्ञात व्यक्तीनी ट्रॅव्हल्सवर दगड फेकुन मारले होते. त्यात ट्रॅव्हल्सचा समोरील काच फुटुन ट्रॅव्हल्सचालक व इतर दोन असे तिघांना मार लागुन दुखापत झाल्या होत्या. वाहन चालकाने वाहन नियंत्रणात ठेवल्याने सुदैवाने जिवीतहानी टळली होती.दगडफेक करुन अज्ञात आरोपी पसार झाले होते. सदर बाबत माही ट्रॅव्हल्स क्रमांक एम एच २९ बी.ई ६७७७ चे मालक भिकुसिंग भानावत रा. दिग्रस जि. यवतमाळ यांच्या तक्रारीवरुन पोलिस स्टेशन बीबी येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता पोलिस अधिक्षक विश्व पानसरे यांचे आदेशानुसार सदरच तपास पोलिस स्टेशन बिबी चे ठाणेदार संदिप पाटील करीत असतांना त्यांना मिळालेल्या गुप्त माहीतीच्या आधारे आर.पी. ट्रॅव्हल्स चा एजंट तेजराव ऊर्फे रवि भगवान सिरसाठ रा पार्टी सिरसाठ यास दिनांक १०/१०/२०२४ रोजी सुलतानपुर येथुन ताब्यात घेवुन पोलिस स्टेशन ला आणुन विश्वासात घेवुन कसोशिने विचारपुस केली असता त्याने सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली व सदर गुन्हयात रामनारायण डिगंबर चव्हाण रा. खापरखेड घुले (रामभरोसे हॉटेल मालक), त्याचेकडील कामगार शेख जावेद शेख शरिफ रा. बिबी, शुभम रामेश्वर आटोळे रा.बीबी (रंगीला बार चालक) यांनी माही ट्रॅव्हल्सवर पुलावरुन दगडफेक केली असुन त्याने माही ट्रॅव्हल्स हि मेहकर वरुन जालना दिशेने निघाल्याची माहीती फोनवरुन दिल्याची कबुली दिली. त्यावरुन सर्व चारही आरोपींना वेगवेगळ्या ठिकाणावरुन पोलिस स्टेशन बीबी पोलिस पथकाने ताब्यात घेतले व पोलिस स्टेशनला आणुन विचारपुस केली असता, आरोपींनी सदर गुन्हयाचे पुर्वनियोजीत कट रचुन गुन्हा केल्याची माहीती उघड झाली.

यातील आरोपी १) रामनारायण डिगंबर चव्हाण वय-४५ वर्षे रा. खापरखेड घुले ता.लोणार याची बिबी ते सुलतानपुर रोडवर रामभरोसे हॉटेल असुन सदर हॉटेलवर रात्रीचे वेळेस ट्रॅव्हल्स जेवणाकरीता थांबत असल्याने सुमारे एक वर्षापुर्वी पर्यंत माही ट्रॅव्हल्स च्या गाड्या देखील रामभरोसे हॉटेलवर थांबत असत, परंतु मागील वर्षी रामनारायण चव्हाण व माही ट्रॅव्हल्स चे मालक यांच्यात वाद झाले त्यानंतर पोलिस स्टेशन दिग्रस जि. यवतमाळ येथे रामनारायण चव्हाण व दिलीप रुडे यांनी माही ट्रॅव्हल्स च्या बॅटरी तसेच सी.सी.टी.व्ही चे डिव्हीआर चोरी केल्याबाबत यांचेविरुध्द माही ट्रॅव्हल्स चे मालकाने दिलेल्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल होता. त्यानंतर माही ट्रॅव्हल्स ह्या हॉटेलवर थांबणे बंद होवुन इतर ट्रॅव्हल्स देखील थांबणे कमी झाल्याने हॉटेल व्यवसायावर परीणाम झाल्याने सदर बाबीचा रामनारायण चव्हाण याचे मनात राग होता. त्यातुन त्याने ट्रॅव्हल्सचा चालक यांना तुम्ही तीकडे आले तर तुमच्या गाड्या फोडुन तुम्हाला जिवाने ठार मारतो अशा धमक्या दिलेल्या होत्या. त्यानंतर व्यवसाय सुरळीत चालत नसल्याने रामनारायण चव्हान याने काही दिवसांपूर्वी त्याचा रंगीला वाईन.
बार हा आरोपी शुभम आटोळे व रामभरोसे हॉटेल इतर व्यक्तीस चालवण्यास दिले होते. व आरोपी जावेद शेख हा त्याचेकडे कामावर होता. तसेच आरोपी रवि शिरसाठ ऊर्फ तेजराव हा ट्रॅव्हल एजंट म्हणुन काम करत असल्याने त्याचे व रामनारायण चव्हाण यांची मैञी होती. त्यावरुन घटेनेच्या दोन- तीन दिवस अगोदर आरोपी रामनारायण चव्हाण याच्या रामभरोसे हॉटेलवर सर्व आरोपी थांबलेले असतांना रामनारायण चव्हाण याने ज्यांनी ज्यांनी मला त्रास दिला व ज्यांच्यामुळे माझे नुकसान झाले त्यांना आता बघतो असे म्हणून इतर आरोपींना मदत करण्यास सांगीतले. त्यावेळी सर्व आरोपींनी माही ट्रॅव्हल्स फोडण्याचा तसेच ट्रॅव्हल्स चालक यास जिवाने ठार मारण्याचा कट रचला.

त्यावेळी आरोपी रामनारायण चव्हाण याने इतर आरोपींना त्याने माही ट्रॅव्हल्सचा जाण्यायेण्याचा पुर्ण टाईम व रुट ची माहीती घेतलेली असुन इतरांनी मदत करावी सांगुन आरोपी रवि ऊर्फ तेजराव भगवान शिरसाठ याने मेहकर येथुन गाडी निघाल्यावर गाडीचे लोकेशन दयावे व इतर आरोपींनी समृध्दी महामार्गावरील देऊळगांव कोळ पुलावर जावुन तेथुन दगडफेक करुन गाडी फोडावी असे ठरवले होते. त्याप्रमाणे दि.०७/१०/२०२४ रोजी ०९/०० वा. सुमारास रामनारायण चव्हाण याने रवि शिरसाठ यास मेहकर येथे जावुन गाडीची माहीती देण्यास सांगीतले. व तो आरोपी शुभम आटोळे याच्या मोटारसायकलने त्याचे हॉटेलवरुन बिबी येथे आला. बीबी येथुन आरोपी जावेद शेख यास सोबत घेवुन मोटारसायकलने कुंभेफळ गावाकडुन देवुळगांव कोळ येथील ब्रिजवर जावुन थांबले. दरम्यान आरोपी रामनारायण चव्हाण व जावेद शेख यांनी आरोपी रवि शिरसाठ यास वेळोवेळी संपर्क करुन माही ट्रॅव्हल्स ची माहीती घेतली. त्यांना रवि शिरसाठ कडुन ट्रॅव्हल्स मेहकर येथुन समृध्दी महामार्गाने जालना दिशेने रवाना झाल्याची माहीती मिळताच त्यांनी पुलाच्या बाजुला पडुन असलेले दगड गोळा करुन पुलाच्या कठड्यावर ठेवले. समृध्दी महामार्गाने माही ट्रॅव्हल्स पुलाजवळ पोहचली असता ट्रॅव्हल्स चालकास जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने पुलावरुन ट्रॅव्हल्सवर दगड फेकुन मारले. वाहनाचा काच फुटुन देखील गाडी न थांबता निघुन गेल्याने आरोपींनी घटनास्थळावरुन मोटारसायकलने पळ काढला व त्यांच्या रामभरोसे हॉटेलवर येवुन थांबले. अशा प्रकारचा घटनाक्रमांची आरोपींनी कबुली दिली. सदर गुन्हयातील आरोपींनी दिलेल्या कबुलीवरुन व फिर्यादीच्या जबाबावरुन नमुद आरोपी रामनारायण डिगांबर चव्हाण याने पुर्व वैमनस्यातुन व व्यवसायात झालेल्या आर्थिक नुकसानातुन तसेच ट्रॅव्हल्स मालकाने २०२३ मध्ये पो.स्टे दिग्रस येथे दिलेल्या तक्रारीच्या रागातुन त्याचे इतर आरोपी साथिदारांच्या मदतीने कट रचुन माही ट्रॅव्हल्स चालकास जिवे ठार मारण्याच्या तसेच वाहनाचे नुकसान करण्याचे उद्देशाने ट्रॅव्हल्सवर दगड फेकुन मारल्याचे निष्पन्न झाल्याने सदर गुन्हयात कलम १०९ (१), कलम ६१ (१) भारतीय न्याय संहीता हे कलम वाढ करण्यात आले. गुन्हयात उपरोक्त नमुद चारही आरोपींना अटक करण्यात आली असुन पुढील तपास सुरु आहे.
सदर गुन्हयातील अज्ञात आरोपींचा शोध घेवुन गुन्हयात आरोपी निष्पन्न करुन गुन्हयाची उकल करण्याची सदरची कामगीरी मा. पोलीस अधिक्षक बुलढाणा श्री विश्व पानसरे साहेब, मा.अपर पोलीस अधिक्षक बुलढाणा बी.बी महामुनी साहेब, अपर पोलीस अधिक्षक खामगाव श्री अशोक थोरात साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी मेहकर श्री प्रदिप पाटील साहेब, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा श्री अशोक लांडे साहेब यांच्या मार्गदर्शनात पोलीस स्टेशन बिबी चे ठाणेदार सपोनि संदिप पाटील, पोलीस अंमलदार अरुण मोहीते, अरुण सानप, रविंद्र बोरे, यशवंत जैवळ जुबेर पॅरीवाले, सायबर सेल चे रुषीकेश खंडेराव यांनी केली.


