जनावरे चोरी करणाऱ्या टोळीतील एकास गुन्हे शाखेने घेतले ताब्यात…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

स्थानिक गुन्हे शाखेने एकास ताब्यात घेऊन जिल्ह्यातील जनावर चोरींच्या 04 गुन्ह्यांची यशस्वीपणे केली उकल,.आरोपी कडून एक इनोव्हा गाडी किं. 5,00,000/- रु. ची हस्तगत…..

बुलढाणा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,जिल्ह्यामध्ये जनावर चोरीच्या गुन्ह्यांची गंभीर दखल घेवून, पोलिस अधिक्षक  सुनिल कडासने यांनी अशा गुन्ह्याची उकल करुन, आरोपींचा शोध घेवून, मुद्देमाल हस्तगत करणेबाबत पोलिस निरीक्षक स्थागुशा, अशोक लांडे यांना आदेशीत केले होते. त्याअनुषंगाने पोनि अशोक लांडे यांनी त्यांचे अधिनस्त असलेले पोलिस अधिकारी व अंमलदार यांची स्वतंत्र पथके तयार करुन, जनावर चोरीच्या गुन्ह्यांचा समांतर तपास करुन, गुन्ह्याची उकल, आरोपींचा शोध आणि चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत करणेबाबत सुचना केल्या होत्या





त्या अनुषंगाने, ( 1 ) पो.स्टे. खामगांव ग्रामीण अप.क्र 295/2024 कलम 303 भा.न्या. सं. गुन्ह्याची हकीकत खालील प्रमाणे.यातील
फिर्यादी विवेक नरेंद्र फाळके रा. हिंगणा कारेगांव ता. खामगांव यांनी दि. 17/07/2024 रोजी पो.स्टे. खामगांव ग्रा. येथे रिपोर्ट दिला की, दि. 15/07/2024 रोजी रात्री दरम्यान फिर्यादीच्या मालकीचे व त्यांचे राहते घरासमोर बांधलेले 02 बैल किं. 30,000/-रु कोणीतरी अज्ञात चोरट्टयाने चोरुन नेले. सदर प्रकरणी पो.स्टे. खामगांव ग्रा. अप.क्र 295/2024 कलम 303 भा. न्या. सं. प्रमाणे दाखल होता.



सदर गुन्ह्याचा तपास करुन, गुन्ह्यात शेख शकील शेख जलील वय 42 वर्षे रा. जूने शहर, अकोला ता. जि. अकोला. यास निष्पन्न करुन अकोला जिल्ह्यातून दि. 29/07/2024 रोजी अटक करण्यात आली व त्याचे ताब्यातुन 1) टोयोटो कंपनीची इनोव्हा गाडी कि. 5,00,000/-रुपये, (गुन्ह्यामध्ये वापरलेले वाहन)जप्त करुन (1) पो.स्टे. खामगांव ग्रामीण गुरनं. 295/2024 कलम 303 (2) भा.न्या.स. (2) पो.स्टे. तामगांव गुरनं. 214 / 2024 कलम 379 भा.दं.वि.(3) पो.स्टे. जळगांव जामोद गुरनं. 384 / 2024 कलम 303 (2) भा.न्या.सं. (4) पो.स्टे. जानेफळ गुरनं. 310/2023 कलम भादंवि. हे गुन्हे उघड करण्यात आले तसेच अटक आरोपीचे चौकशीत सदरचे गुन्हे हे त्याने त्यांच्या सहकार्यासोबत केल्याचे कबुल केले तसेच ते सर्व आरोपी फरार आहेत
सदर गुन्ह्यामध्ये ईतर आरोपी सुध्दा निष्पन्न असून, निष्पन्न आरोपी व चोरीला गेलेल्या जनावरांचा शोध घेणे करीता पोलिस अधीक्षक बुलढाणा यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि अशोक एन. लांडे यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेची विशेष पथके नियुक्त असून, सदर पथकांकडून फरारी आरोपी/मुद्देमालाचा कसोशीने शोध घेण्यात येत आहे.



सदरची कामगिरी पोलिस अधिक्षक सुनिल कडासने,अपर पोलिस अधिक्षक,खामगाव अशोक थोरात,अपर पोलिस अधिक्षक,बुलढाणा
यांचे आदेशाने व मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक स्थागुशा अशोक एन. लांडे,सपोनि. आशिष चेचरे, पोहवा राजेंद्र अंभोरे, दिनेश बकाले, पुरुषोत्तम आघाव, पोशि. अमोल शेजोळ, जयंत बोचे, अजीज परसुवाले, चालक पोहवा समाधान टेकाळे सर्व नेमणूक- स्थागुशा. बुलढाणा यांनी केली.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!