बुलढाणा LCB ने अट्टल मोटारसायकल चोरट्यास ताब्यात घेऊन नजीकच्या ७ जिल्ह्यातील गुन्ह्याची उकल करुन ९ लाखाचा मुद्देमाल केला जप्त…
अट्टल मोटार सायकल चोरट्यांना अटक, 7 जिल्ह्यातील गुन्हे उघडकीस; 9 लाखांचा मुद्देमाल जप्त…
बुलढाणा (प्रतिनिधी) – अट्टल मोटार सायकल चोरट्यांना बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेने मिळालेल्या गोपनीय माहितीवरून कौशल्यपूर्ण तपासाच्या आधारावर शिताफीने अटक करून बुलढाणासह ईतर 7 जिल्ह्यातील 23 गुन्ह्यांची उकल केली आहे. या मध्ये त्याच्याकडून 23 मोटारसायकल किं.9 लाख ह्या जप्त केल्या आहेत. या प्रकरणी सदर पो.स्टे. खामगांव शहर अप.क्र 464/2024 कलम 303(2) भा.न्या.सं. गुन्हा दाखल होता.
या बाबत सविस्तर वृत्त असे की, जिल्ह्यामध्ये मोटार सायकल चोरीच्या गुन्ह्यांची गंभीर दखल घेवून, पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, बी.बी. महामुनी यांनी मोटार सायकल संबंधीत गुन्ह्याची उकल करुन, आरोपींचा शोध घेवून, मुद्देमाल हस्तगत करणेबाबत पोलिस निरीक्षक अशोक लांडे, स्था.गु.शा. बुलढाणा यांना आदेशीत केले होते. सदर अनुशंगाने पोनि.अशोक लांडे यांनी त्यांचे अधिनस्त पोलिस अधिकारी व अंमलदार यांची स्वतंत्र पथके तयार करुन, मोटार सायकल चोरीच्या गुन्ह्यांचा समांतर तपास करुन, गुन्ह्याची उकल, आरोपींचा शोध आणि गेला मुद्देमाल हस्तगत करणेबाबत सुचना केल्या. सदर अनुषंगाने, (1) पो.स्टे. खामगांव शहर अप.क्र 464/2024 कलम 303(2) भा.न्या.सं. गुन्हा दाखल होता.
फिर्यादी अमोल गजानन फाळके, रा.शिवाजीनगर, सुटाळा बु. ता.खामगाव यांनी (दि.07ऑक्टोबर) रोजी पो.स्टे. खामगाव शहराचा अहवाल दिला की, (दि.05ऑक्टोबर) रोजी फिर्यादी फरशी खामगाव येथे हिरो स्प्लेंडर प्रो. कंपनीची मो.सा. क्र. MH-28-AM-5250 किं.30,000/-रु. ही कोनारी तरी अज्ञात चोरट्याने चोरून नेली. निवडणूक, पो.स्टे. खामगाव शहर अप.क्र 464/2024 कलम 303(2) भा.न्या.सं. प्रमाणे. सदर गुन्ह्याचा समांतर करून, गुन्ह्यात 4 जण निष्पन्न करून, अकोला 03 तसेच नांदेड जिल्हा ता. माहूर आणखी 01 यास ताब्यात घेतले. आरोपी 1) विशाल दुर्योधन इंगळे (वय 24 वर्षे), रा.अकोट फैल अकोला, 2) अंकीत प्रमोद मुलनकर (वय 25 वर्षे) रा.भेंडी ता.बार्शी टाकळी जि.अकोला, 3) विकास बबनराव मोरे वय 31 वर्षे रा. भेंडी काजी ता.बार्शी टाकळी जि.अकोला, 4) सिध्दार्थ श्रावण खरात (वय 38 वर्षे) रा.माहादापुर ता.माहूर जि. नांदेड यांना अटक करून यांच्या ताब्यातून – 1) हिरो स्प्लेंडर प्रो. कंपनीच्या 11 मो.सा. किं. 40,000/-रु. प्रत्येकी एकूण- 4,40,000/-रुपये, 2) हिरो स्प्लेंडर प्लस कंपनीच्या 06 मो.सा. किं. 40,000/-रु. प्रत्येकी एकूण- 2,40,000/-रुपये, 3) हिरो HF DELUXE कंपनीच्या 04 मो.सा. किं. 35,000/-रु. प्रत्येकी एकूण 1,40,000/-रुपये, 4) होंडा अॅक्टीव्हा कंपनीच्या 02 मो.सा. किं. 40,000/-रु. प्रत्येकी एकूण 80,000/-रुपये. सर्व 23 मो.सा. असा एकूण किं. 9,00,000/-रुपये. किमतीचा मुद्देमाल हा जप्त केला आहे.
सदर गुन्ह्यामध्ये मुख्य आरोपी विशाल दुर्योधन इंगळे (वय 24 वर्षे) रा.अकोट फैल अकोला. हा मोटार सायकली चोरी करण्यासाठी रेल्वे मार्गाने येऊन, बसस्टँड, कोर्ट, आठवडी बाजार व बल्क पार्कीग तसेच ईतर गर्दीच्या ठिकाणी उभ्या केलेल्या मोटार सायकली चोरुन न्यायचा, व यातील वरील ईतर 03 आरोपी हे चोरीच्या मोटार सायकलींची विक्री करीत होते. बुलढाणा तसेच जळगांव जिल्ह्यात घडलेल्या गुन्ह्यांचे तांत्रिक विश्लेषण तसेच गोपनीय माहितीवरुन सदरचे गुन्हे उघडकीस आणले आहेत.
वरील पैकी मुख्य आरोपी विशाल दुर्योधन इंगळे (वय 24 वर्षे) रा.अकोट फैल अकोला हा पो.स्टे. खामगांव शहर येथील गुन्ह्यात अटक असून त्याचा वि. न्यायालय यांचे कडून 7 दिवस पोलीस कस्टडी रिमांड मिळालेला आहे. त्याचे कडून आणखी माहिती घेवून, ईतर मो.सा. चोरीच्या गुन्ह्यांची माहिती घेवून, ते उघडकीस आणण्याची कार्यवाही सुरु आहे.
ईतर गुन्ह्यांचा तपास व आरोपी शोध – पोलीस अधीक्षक बुलढाणा यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. अशोक एन. लांडे यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांकडून अधीक तपास करण्यात येत आहे. नमुद सर्व आरोपी यांना पो.स्टे. खामगांव शहर यांच्या ताब्यात दिले असून, पुढील तपास पो.स्टे. खामगांव शहर यांच्या कडून करण्यात येत आहे.
पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, अपोअ.अशोक थोरात, बी.बी. महामुनी यांनी गुन्ह्यातील आरोपींचा शोध, गुन्ह्यांना प्रतिबंध बाबत सुचना दिल्या होत्या. सदर अनुशंगाने, पोनि.अशोक एन.लांडे, स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा यांनी वेगवेगळी पथके तयार करुन, त्यांना गुन्हे संबंधाने गोपनीय माहिती संकलीत करणे, जिल्हा व जिल्ह्याबाहेरील गुन्हेगारांची माहिती काढून त्यांचे हालचालींवर बारीक लक्ष ठेवणे, तांत्रीक स्वरुपातील बाबी व गुन्हेगारांचा अभिलेख पडताळणे बाबत सुचनात्मक मार्गदर्शन केले. समांतर तपासामध्ये गुन्ह्यामध्ये वरील प्रमाणे आरोपीतांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. आरोपींकडून एकूण 23 मोटार सायकली किं.9,00,000/-रुपये ह्या हस्तगत आल्या आहेत. जिल्ह्यातील मो.सा. चोरीच्या गुन्ह्यांची यशस्वी उकल झाल्याने अशा गुन्ह्यांना प्रतिबंध झालेला आहे.
सदरची कामगिरी पोलिस अधिक्षक विश्व पानसरे,अपर पोलिस अधिक्षक बुलढाणा बी बी महामुनी,अपर पोलिस अधिक्षक,खामगाव अशोक थोरात यांचे आदेशाने,पोलिस निरीक्षक अशोक एन. लांडे स्था.गु.शा. बुलढाणा, पोनि. आर. एन. पवार पो.स्टे. खामगांव शहर, सपोनि, रुपेश शक्करगे, पोहवा. दिपक लेकुरवाळे, शेख चाँद, अनुप मेहेर, पोना. गणेश पाटील, पोशि मंगेश सनगाळे, चापोशि शिवानंद हेलगे सर्व नेमूणक-स्थागुशा.बुलढाणा, सपोनि.मुळीक, पोहवा प्रदिप मोठे, नापोशि सागर भगत, पोशि गणेश कोल्हे, राम धामोळे, अंकुश गुरुदेव, राहूल थारकर, अमर ठाकूर, रविंद्र कन्नर नेमणूक- पो.स्टे. खामगांव शहर यांनी केली आहे.