खामगाव येथील घरफोडीचा स्थानिक गुन्हे शाखेने दोन दिवसात लावला छडा…
खामगाव येथे घरफोडी करणारा अट्टल गुन्हेगार स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात…
खामगाव(बुलढाणा) प्रतिनिधी – गेल्या काही दिवसांपासून खामगांव शहरामध्ये बरेच घरफोडीचे अनेक गुन्हे घडत होते. शेवटी सदर गुन्हयांची गंभीर दखल घेऊन, पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, बी.बी. महामुनी यांनी अशा गुन्ह्याची उकल करुन, आरोपीतांचा शोध घेवून, मुद्देमाल हस्तगत करणेबाबत अशोक लांडे, स्था.गु.शा. बुलढाणा यांना आदेशीत केले होते. सदर अनुषंगाने पोलिस निरीक्षक.अशोक लांडे यांनी त्यांचे अधिनस्त पोलिस अधिकारी व अंमलदार यांची स्वतंत्र पथके तयार करुन, घरफोडीच्या गुन्ह्यांचा समांतर तपास करुन, गुन्ह्याची उकल, आरोपींचा शोध आणि गेलेला मुद्देमाल हस्तगत करणेबाबत सुचना केल्या. सदर अनुषंगाने, (1) पो.स्टे. खामगांव शहर अप.क्र 463/2024 कलम 331(3), 305 (अ) भा.न्या.सं. गुन्ह्याची गुन्हा उघड करण्यात आला
या बाबत मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी किशोर मधुकर देशमुख (वय 55 वर्ष), रा.सावजी ले आउट खामगांव यांनी (दि.09ऑक्टोबर) रोजी पो.स्टे. खामगांव शहर येथे रिपोर्ट दिला की, (दि.05ऑक्टोबर) रोजी फिर्यादी व त्यांची पत्नी हे खामगांव शहरात गेलेले असतांना त्यांचे घरामध्ये अज्ञात चोरटयाने लाकडी खिडकी तोडुन आतमध्ये प्रवेश करुन घरातील सोन्याचा हार, अंगठया, कानातले वेल, कानातले डोरले, मंगळसुत्र, 2 ग्राम मणी असा एकुण 1,68,000/- रुपयाचा मुद्देमाल हा चोरुन नेला होता. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सि.सी.टि.व्ही फुटेज तसेच गोपनीय माहितीच्या आधारे नमुद आरोपीस निष्पन्न करुन त्यास चोहटटा बाजार येथून ताब्यात घेवुन गुन्हा उघड केला.
सदर आरोपी रवि ऊर्फ नारायण रामदास डाबेराव वय 38 वर्ष रा. वार्ड नंबर 4 चोहटटा बाजार ता.अकोट जि.अकोला हा सराईत गुन्हेगार असुन त्याचेवर याअगोदर चोरी, जबरी चोरी, घरफोडी, दरोडा, सरकारी कर्मचारी हल्ला अशा अनेक प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. सदर आरोपी सध्या पोलीस कस्टडी मध्ये आहे. त्याचे कडुन आणखी घरफोडी व चोरीचे गुन्हे उघड करण्याची प्रक्रीया चालु आहे. रवि ऊर्फ नारायण रामदास डाबेराव त्याच्या ताब्यातून नगदी 5800/- रुपये तसेच उर्वरीत मुद्देमाल हस्तगत करण्याची प्रक्रीया चालु आहे.
सदरची कामगिरी पोलिस अधिक्षक विश्व पानसरे,अपर पोलिस अधिक्षक,खामगाव अशोक थोरात, अपर पोलिस अधिक्षक बुलढाणा, बी.बी महामुनी यांचे आदेशाने पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा .अशोक एन. लांडे यांचे नेतृत्वात सपोनि, रुपेश शक्करगे, सपोनि आशिष चेचरे, पोहवा दिपक लेकुरवाळे, शेख चॉद, एजाज खान, गणेश पाटील, युवराज राठोड, समाधान टेकाळे, गजानन गोरले सर्व स्थागुशा. बुलढाणा यांनी केली आहे.