
स्थानिक गुन्हे शाखेची जिल्ह्यातील सर्वात मोठी कार्यवाही,१ कोटीचे वर गुटखा केला जप्त…
स्थानिक गुन्हे शाखेची गुटखा विरोधातील जिल्ह्यातील सर्वात मोठी कारवाई,मेहकर पोलिस स्टेशन हद्दीत पकडला 1.43 कोटीचा गुटखा, ट्रक चालकांसह 03 आरोपी अटकेत….
बुलढाणा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,महाराष्ट्र शासनाने प्रतिबंध केलेला, मानवी आरोग्यास अत्यंत हानीकारक असा गुटखा व तत्सम सुगंधीत तंबाखूजन्य पदार्थांची विक्री, वाहतूक, साठवणूक करणाऱ्या इसमांचा शोध घेवून त्यांचेवर कठोर
कार्यवाही करण्यासाठी पोलिस अधिक्षक. निलेश तांबे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला आदेशीत केले होते.



सदर आदेशाचे अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुनिल अंबुलकर यांनी त्यांचे अधिनस्त पोलिस स्टाफचे स्वतंत्र पथके तयार करुन त्यांना वरिष्ठांचे आदेशाप्रमाणे अवैध गुटखा संबंधाने कारवाई करणेबाबत सुचित केले होते त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक, पो.स्टे. मेहकर हद्दीत पेट्रोलिंग करीत असतांना स्थानिक गुन्हे शाखेचे पथकास गोपनीय माहिती मिळाली की, काही ईसम हे त्याचे ताब्यातील अशोक लेलँड कंपनीच्या 02 ट्रकमध्ये शासन प्रतिबंधीत सुगंधीत पान मसाला व गुटखा माल बाळगून त्याची चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने अमरावती कडून समृध्दी महामार्गाने मुंबईकडे जात आहेत.

अशा गोपनीय माहीतीवरुन समृध्दी महामार्गावरील फर्दापूर टोलवर स्था. गु. शा. च्या पथकाने सापळा रचून माहिती प्रमाणे नमुद 02 अशोक लेलँड कंपनीचे ट्रक पकडून त्यावर कारवाई केली. या कारवाईमध्ये दोन ट्रक चालकांसह 03 ईसमांना पकडून,वाहनास थांबवुन त्यांची तपासनी केली त्यात 1.) गुटखा 264 पोते किं. 1,13,09,760/-रुपये,2) अशोक लेलँड कंपनीचे 02 ट्रक किं. 30,00,000/-रुपये. असा एकूण- 1,43,09,760/-रु. चा मुद्देमाल जप्त केला तसेच आरोपी १) मोहम्मद इम्रान मो. हफिज वय 28 वर्षे, रा. बियाबानी मोहल्ला, अचलपूर जि. अमरावती.२)अजीम बेग हाफिज बेग वय 36 वर्षे, रा. अन्सारनगर, अमरावती.३) एजाज अहेमद अजीज अहेमद वय 31 वर्षे, रा. शिरजगांव ता. चांदूरबाजार जि. अमरावती यांचे विरुध्द पो.स्टे. मेहकर येथे भा.न्या.सं.चे कलम 274, 275,223,123 सह अन्न व सुरक्षा माणके कायदा 2006 चे कलम 26,27,59 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असुन. गुन्ह्याचा पुढील तपास पो.स्टे. मेहकर करीत आहेत.
सदरची कारवाई पोलिस अधिक्षक निलेश तांबे यांचे आदेशान्वये अपर पोलिस अधिक्षक बुलढाणा अमोल गायकवाड,अपर पोलिस अधिक्षक खामगाव यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुनिल अंबुलकर यांचे नेतृत्वात पोउपनि प्रताप बाजड, अविनाश जायभाये, पोहवा शरद गिरी, दिपक लेकुरवाळे, पुरुषोत्तम आघाव, गणेश पुरुषोत्तम पाटील, पोशि निलेश राजपूत, मपोशि पूजा जाधव, चापोहवा समाधान टेकाळे नेमणूक- स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा, पोहवा राजू आडवे, पोशि ऋषीकेष खंडेराव तांत्रिक विष्लेषण विभाग, बुलढाणा यांचे पथकाने केली.




