अट्टल दुचाकी चोरट्यास बुलढाणा शहर पोलिसांनी ताब्यात घेऊन उघड केले ५ मोटारसायकल चोरीचे गुन्हे….

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

अट्टल मोटारसायकल चोरट्यास बुलढाणा शहर पोलिसांनी ताब्यात घेऊन सात मोटार सायकल किं. 1,85,000/-रु.चा मुद्देमाल केला हस्तगत….

बुलढाणा(प्रतिनिधी) – पोलिस अधिक्षक विश्व पानसरे यांनी जिल्ह्यात दाखल मोटार सायकल चोरीच्या गुन्यांची गंभीर दखल घेवून, अशा गुन्ह्यांचा सखोल व बारकाईने तपास करुन, गुन्ह्याची उकल, आरोपीचा शोध आणि मुद्देमाल हस्तगत करण्यासाठी सर्व प्रभारिंना आदेशीत केले होते त्याअनुषंगाने पोलिस निरीक्षक ठाणेदार बुलढाणा शहर. रवि राठोड,  यांनी पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे स्वतंत्र पथक तयार करुन, मोटार सायकल गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेऊन, गुन्ह्याची उकल, चोरीस गेलेल्या मोटार सायकली हस्तगत करणेबाबत सुचित केले होते, त्यानुसार मोटार सायकल चोरी संदर्भातील सर्व गुन्हयांचा एकत्र डाटा करुन पो.स्टे. बुलडाणा शहर अप.क्र. 366/2025 कलम 303(2) भा.न्या.सं. गुन्ह्याची उकल केली.





याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की दि 15/04/2025 रोजी पो.स्टे. बुलढाणा शहर येथे मोटार सायकली चोरीच्या संबंधाने अप.क्र. 366/2025 कलम 303(2) भा.न्या.सं. प्रमाणे गुन्हा नोंद आहे. या गुन्ह्याचा तपास मोठ्या शिताफीने करुन तसेच तांत्रिक बाबीचा अभ्यास करुन आरोपी तेजस संजय पोकळे, वय 25 वर्ष रा. रोहिनखेड ता. मोताळा जिल्हा बुलढाणा यास सदर गुन्ह्यांत निष्पन्न करुन चोवीस तासाचे आत ताब्यात घेतले त्याची सखोल चौकशी केली असता आरोपीकडून सदर गुन्हयामध्ये चोरीस गेलेली मोटार सायकल जप्त करण्यात आली.



तसेच आरोपीने जिल्हयामध्ये अशा प्रकारचे आणखी गुन्हे केले असतील याबाबत आरोपी कडुन माहिती घेण्याकरीता आरोपीची  पोलिस कोठडी घेण्यात आली त्यातुंन आरोपीने  आणखी 05 गुन्हे केल्याची कबुली दिली आहे.त्यात बुलढाणा शहर येथील ३ गुन्हे शेगाव शहर येथील २ गुन्हे केल्याची कबुली दिली तसेच आरोपी तेजस संजय पोकळे, वय 25 वर्ष रा. रोहिनखेड ता. मोताळा जिल्हा बुलढाणा यांचे  ताब्यातून  एकूण 1,85,000/-रु  मुद्देमाल जप्त करण्यात आला सदर गुन्ह्याचा तपास व ईतर आरोपी शोध बुलढाणा पोलिस करीत आहे



महत्वाचे म्हनजे.सदर आरोपी हा आठवडी बाजार, गॅरेज गल्ली व ईतर वर्दळीच्या ठिकाणी बराच वेळ हॅन्डल लॉक नसलेली मोटार सायकल चोरी करुन निर्जन स्थळी नेऊन त्यांचे दोन्ही टायर, किंवा शॉकअप किंवा दोन्ही काढुन घेत होता.नमुद आरोपी याचे कडून जप्त इतर मोटार सायकल संबंधाने तपास करण्यात येत आहे. तसेच आरोपी कडून बुलढाणा व परिसरात मोटार सायकलच्या चोरी संबंधाने गुन्ह्याचा तपास करण्यात येत आहे.

सदरची कामगिरी पोलिस अधिक्षक विश्व पानसरे,अपर पोलिस अधिक्षक बुलडाणा बी.बी महामुनी, यांचे आदेशान्वये उपविभागीय पोलीस अधिकारी, बुलढाणा सुधिर पाटील, यांचे मार्गदर्शनाखाली ठाणेदार, पो.स्टे. बुलढाणा शहर पोलिस निरीक्षक रवि राठोड, सपोनि प्रताप भोस, भरत चापईतकर, जयसिंग राजपुत, दिनेश मोरे, पोउपनि रवि मोर, प्रोपोउपनि अश्विनी गाडे, माधुरी साळुंके, सपोउपनि नामदेव खवले, पोहवा प्रकाश बाजड, संदिप कायंदे, पंजाबराव साखरे, सुनिल जाधव, पोशि, मनोज सोनुने, योगेश लोखंडे, युवराज शिंदे, कौतीक बोर्ड, विनोद बोरे, चालक पोहेकों रमेश वाघ, चालक नापोशि विवेक तायडे, यांनी केली आहे. सर्व नेमणूक पोलीस स्टेशन बुलढाणा शहर

 





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!