देशी बनावटीच्या पिस्टलची विक्री व खरेदी करणाऱ्यांना सोनाळा पोलिसांनी घेतले ताब्यात…
देशी बनावटी पिस्टलचा सौदा करणारे व विकत घेणारे यांना शिताफीने सोनाळा पोलिसांनी घेतले ताब्यात…
बुलढाणा (प्रतिनिधी) – सार्वत्रिक लोकसभा निवडणूक-2024 निःपक्ष आणि भयरहीत वातावरणात पार पडाव्या, यासाठी बुलढाणा जिल्हा पोलिस दलाकडून खबरदारीच्या विवीध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. सदर अनुषंगाने जिल्ह्याच्या मध्यप्रदेश सीमेला लागून तुमच्या पोलिस स्टेशन पो.स्टे. तामगाव, जळगाव जामोद हद्दीमध्ये देशी बनावटी अग्नीशस्त्र (पिस्टल), काडतुसे व ईतर हत्यारांची तस्करी, खरेदी विक्री करणाऱ्या इसमांचा शोध घेवून, अशा इसमांना मुद्देमालासह पकडून त्याचेवर प्रचलित कायद्यानुसार कारवाई करण्यासाठी पोलिस अधीक्षक सुनिल कडासने, अपर पोलिस अधीक्षक अशोक थोरात, बी.बी. महामुनी यांनी संबंधीत पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी यांना आदेशीत केलेले होते. त्या अनुषंगे या मध्ये पोलिसांनी मिळालेल्या गोपनीय माहितीवरून कौशल्यपूर्ण तपास करून देशी बनावटीच्या पिस्टलची डिलच्या तयारीत असलेल्या चौघांना अटक करून त्यांच्याकडून पिस्टल-4, जिवंत राऊंड-17, मोसा-1, मोबाईल-3 व रोख असा एकूण 2 लाख 17 हजार रु.चा मुद्देमाल हा जप्त केला आहे.
या बाबत अधिक माहिती अशी की, (दि.18एप्रिल) रोजी सपोनि .चंद्रकांत पाटील-प्रभारी अधिकारी, पोहेकों, विनोद शिंबरे, विशाल गवई, मोहिनुद्दीन सैय्यद, पोकों, राहूल पवार, गणेश मोरखडे, चालक पोहेको, विनायक इंगळे सर्व पो.स्टे. सोनाळा यांचे पथकाला गोपनीय माहिती मिळाली की, वसाडी शिवारात ग्राम पचोरी येथून काही लोक येणार असून, ते ईतर लोकांसोबत देशी बनावटीच्या पिस्टलची डिल (व्यवहार) करणार आहेत. सदर गोपनीय माहितीवरुन वसाडी ते हडीयामाल या ठिकाणी सापळा रचून, निमखेडी फाट्याजवळ 1) भारसिंग मिस्त्रा खिराडेव रा. पाचोरी तह. खकनार, जि.बुरहानपुर (म.प्र.), 2) हिरचंद गुमानसिंग उचवरे रा. पाचोरी तह. खकनार जि. बुरहानपुर (म.प्र.), 3) आकाश मुरलीधर मेश्राम रा. करुणानगर, बालाघाट (म.प्र.)4) संदिप अंतराम डोंगरे रा. आमगाव, ता. बालाघाट जि. बालाघाट (म.प्र.) या 04 ईसमांना पकडून, त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्या जवळ 1) देशी बनावटीचे 04 नग अग्नीशस्त्र (पिस्टल) मॅग्झीनसह किं.प्रत्येकी 30,000/-रुपये प्रमाणे 1,20,000/-रुपये., 2) 17 नग शरीर काडतूस किं. 8500/-रुपये, 3) तीन मोबाईल फोन किं. 16,500/-रुपये, 4) नगदी रोख- 32,370/- रुपये, 5) एक मोटार सायकल किं. 40,000/- रुपये असा एकूण- 2,17,370/-रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. सदर प्रकरणी पो.स्टे. सोनाळा येथे कलम 3/25 अग्नी शस्त्र कायद्या प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला.
नमुद गुन्ह्यामध्ये एक पाहिजे असलेला आरोपी व याचा निर्माता आरोपीचा शोध घेणेकरीता पोलिस अधीक्षक, बुलढाणा यांचे मार्गदर्शनाखाली पोनि.अशोक एन.लांडे प्रभारी अधिकारी स्था.गु.शा. बुलढाणा यांचे नेतृत्वामध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे, तसेच पो.स्टे. सोनाळा यांचे विशेष पथक तयार करण्यात आले आहे. गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि, चंद्रकांत पाटील-प्रभारी अधिकारी पो.स्टे. सोनाळा करीत आहेत.
अशा प्रकारे सदरची कारवाई ही पोलिस अधिक्षक सुनिल कडासने अपर पोलिस अधीक्षक बुलढाणा,बी. बी. महामुनी, अपर पोलिस अधीक्षक खामगांव,अशोक थोरात,उपविभागिय पोलिस अधिकारी मलकापुर डी.एस. गवळी यांचे आदेशाने व मार्गदर्शनाखाली, सपोनि चंद्रकांत पाटील-प्रभारी अधिकारी सोनाळा यांचे सुचनेवरुन पोहवा. विनोद शिवरे, विशाल गवई, मोहिनुद्दीन सैय्यद,पोशि. राहूल पवार, गणेश मोरखडे, चालक पोहेकॉ. विनायक इंगळे सर्व पो.स्टे. सोनाळा यांच्या पथकाने केली आहे.