AI तंत्रज्ञानामुळे घरफोडी उघड: मध्य प्रदेशातील चोरट्याला हिंगणा पोलिसांकडून अटक, २.४८ लाखांचा मुद्देमाल जप्त

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

नागपूर: हिंगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका देशी दारू दुकानात झालेल्या घरफोडीचा तपास लावत हिंगणा पोलिसांनी एका अट्टल आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. या कारवाईत आरोपीकडून घरफोडी व वाहनचोरीचे एकूण ७ गुन्हे उघडकीस आले असून, सुमारे २,४७,९३३ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

घटना काय घडली? धनगरपुरा रोडवरील ‘व्हि. ए. चानपुरकर’ या देशी दारू दुकानाचे मालक अनिल चरणबाबु चानपुरकर (वय ४९, रा. रायपूर, हिंगणा) यांनी २५ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री १०:३० वाजता दुकान बंद केले होते. दुसऱ्या दिवशी (२६ ऑगस्ट) सकाळी ८:०० वाजता दुकान उघडण्यासाठी आले असता, दुकानाच्या मुख्य दरवाजाचे आणि मागील दरवाजाचे कडी-कोयंडे तुटलेले आढळले. दुकानाच्या काउंटरमध्ये ठेवलेली ४१,६०० रुपयांची रोख रक्कम चोरीला गेल्याचे स्पष्ट झाले.



सीसीटीव्ही (CCTV) फुटेजची पाहणी केली असता, २५ ते ३० वयोगटातील, अंगात पांढऱ्या-काळ्या रंगाचा टी-शर्ट आणि डोक्यावर टोपी घातलेला एक अज्ञात इसम चोरी करताना दिसून आला. धार्मिक मंदिराच्या कामात व्यस्त असल्याने फिर्यादीने २८ ऑगस्ट २०२६ रोजी हिंगणा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यावरून पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला.

अटक करण्यात आलेला आरोपी:



  • नाव: राहुल शिवदास राठोड (वय २४ वर्षे)

  • मूळ रहिवासी: गाव शिरपूर, ता. खकनार, जि. बुरहानपूर (मध्य प्रदेश)



  • सध्याचा पत्ता: देशमुखवाडी, फटींग यांच्या घरी भाड्याने, ता. हिंगणा, नागपूर

  • अटक दिनांक: ३० ऑगस्ट २०२६ (रात्री २२:०५ वाजता)



AI तंत्रज्ञान आणि खबऱ्यांच्या मदतीने लागला तपास: वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र बोबडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची अत्यंत बारकाईने पाहणी केली. आरोपीने घातलेले कपडे, टोपी आणि त्याची चालण्याची पद्धत यावरून संशय बळावला. पोलिसांनी फुटेजमधील फोटोवर ए.आय. (AI) प्रणालीचा वापर करून अज्ञात आरोपीचा स्पष्ट फोटो तयार केला. त्यानंतर गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार ट्रॅप लावून आरोपी राहुल राठोड याला ताब्यात घेण्यात आले.

उघडकीस आलेले गुन्हे व जप्त मुद्देमाल: आरोपीच्या चौकशीतून हिंगणा पोलीस ठाण्यातील घरफोडी व वाहनचोरीचे एकूण ७ गुन्हे उघडकीस आले आहेत.

जप्त केलेला मुद्देमाल (एकूण किंमत ₹२,४७,९३३):

  • नगद रक्कम: ₹३९,८००/-

  • सोने-चांदीचे दागिने व वस्तू: चांदीचे दोन प्याले (₹१०,०००), कुंकाचा करंडा (₹४,०००), सोन्याची नथ (₹२८,०००), सोन्याचा १ ग्रॅमचा सिक्का (₹१५,०००), चांदीचा चमचा व समई (₹२,०००), १५ तोळे चांदीचे पैजण (₹४०,०००), चांदीचा गोप (₹२,१३३), आणि विविध वजनाची ४ मंगळसूत्रे व कानातले जोड (₹८१,०००).

  • वाहन: होंडा युनिकॉन मोटारसायकल (क्रमांक MH 31 CD 6883 – किंमत ₹१७,०००).

तपास पथक व अधिकारी:

ही यशस्वी कारवाई पोलीस आयुक्त श्री विश्वास नागरे पाटील, सह पोलीस आयुक्त श्री नवीनचंद्र रेड्डी, अप्पर पोलीस आयुक्त (दक्षिण विभाग) श्री वसंत परदेशी, पोलीस उपआयुक्त (परिमंडळ १) श्री सिंगा रेड्डी आणि सहायक पोलीस आयुक्त (MIDC विभाग) श्री यशवंत नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

कारवाई करणारे अमंलदार:

वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र बोबडे, तपास पथक प्रमुख पो.उ.नि. संतोष राठोड, पो.ह. कैलास चव्हाण, पो.ह. अरुण कांबे, ना.पो.शि. अतुल तलमले, पो.शि. कार्तिकेडाऊ, पो.शि. अनिल झाडे आणि पो.शि. प्रणित बंड (सर्व हिंगणा पोलीस ठाणे, नागपूर शहर).







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!