वर्धा जिल्हा वडनेर पोलिस स्टेशन हद्दीत घडलेल्या ४ करोड दरोडा प्रकरणाचा ४ तासात उलगडा…

 वर्धा-  सवीस्तर व्रुत्त असे की  श्री अट्ठेसिंग भगवानजी सोळंके, वय ४२ वर्षे, रा. चानसभा, जि. पाटण, राज्य गुजरात यांनी पोलिस स्टेशन वडनेर येथे तक्रार दिली की, फिर्यादी हे त्यांचे मालक कमलेश शहा, अहमदाबाद, गुजरात यांचेकडे वाहनचालक काम करीत असून 3 महिन्यापुर्वी फिर्यादी यांना नागपूर येथील कार्यालयात चालक म्हणून काम करण्याकरिता पाठविले होते. फिर्यादी हे दिनांक […]

Read More

फोन टॅपिंग प्रकरणी IPS अधिकारी रश्मी शुक्ला यांना क्लिन चिट…

मुंबई -फोन टॅपिंग प्रकरणी आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांना मोठा दिलासा मिळाला आहे. हायकोर्टाकडून रश्मी शुक्ला यांच्याविरुद्ध नोंदवलेले दोन्ही एफआयआर (FIR) रद्द करण्यात आलेआहेत. एक पुण्यात, तर दुसरा मुंबईतील कुलाबा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला होता. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना राज्य गुप्तचर विभाग प्रमुख या नात्यानं विरोधी नेत्यांचे फोन कॉल्स बेकायदेशीरपणे रेकॉर्ड केल्याप्रकरणी या दोन FIR नोंदवण्यात आल्या होत्या. पुण्यात […]

Read More

विमानात एअर होस्टेस सोबत अश्लील चाळे करणारा बांग्लादेशी अटकेत…

मुंबई- विमानात कॅबिन क्रूसोबत अश्लील चाळे करणाऱ्या प्रवाशाला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. मस्कतहून मुंबईला येणाऱ्या विमान प्रवासादरम्यान फ्लाइट अटेंडंट्ससोबत हा प्रकार घडला आहे. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे विमातील सर्वच प्रवाशी चकीत झाले. प्रवाशाने कॅबिन क्रूसोबत अश्लील चाळे करत त्यांच्यासमोर हस्तमैथुन केल्याचाही आरोप आहे. पोलिसांनी या प्रकरणी एका बांगलादेशी नागरिकाला अटक केली आहे. मोहम्मद दुलाल असं या ३० वर्षीय आरोपचं नाव […]

Read More

बांधकाम व्यवसाईकाचा मुलगा बोलत असल्याचे सांगुन केली ६६ लाखाची फसवणुक….

पु्णे-   शहरातील नामांकित बांधकाम व्यावसायिकाचा मुलगा बोलत असल्याचे सांगत एका टोळीने कंपनीला ६६ लाख रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार पुण्यातून समोर आला आहे. सायबर पोलिसांनी या गुन्ह्याचा छडा लावत विशाल कुमार भरत मांझी (वय २१ वर्षे, रा. लकरीखुर्द, सिवान, बिहार) यास अटक केली. याबाबत सविस्तर माहिती अशी की, फिर्यादी एका नामांकित कन्स्ट्रक्शन कंपनीच्या कार्यालयात अकाऊंट विभागात काम करतात. आरोपी विशाल […]

Read More

नागपुर ग्रामीण LCB ने जप्त केला अवैधरित्या साठवलेला रेतीसाठा….

नागपुर ग्रामीण-  सवीस्तर व्रुत्त असे की नव्यानेच रुजु झालेले पोलिस अधिक्षक  नागपुर ग्रामीण हर्ष पोद्दार  यांनी दिलेल्या आदेशावरून आज दि. ०७ रोजी पोलिस स्टेशन खापा हद्दीतील पंजाबराव खैरी गावाजवळ खैरी नाला जवळ बेवारस सार्वजनिक ठिकाणी अवैधरित्या ९० ब्रास रेतीचा साठा दिसुन आल्याने अवैध रेतीचा साठा ठेवणान्या इसमांविरूद्ध रेड कारवाई करून पंजाबराव खैरी नाला जवळ सुमारे ९० ब्रास रेतीचा […]

Read More

कारंजा घाडगे पोलिसांनी पकडला प्रतिबंधित सुगंधीत तंबाखु(गुटखा)….

कारंजा (घा)वर्धा- कारंजा शहरात  मोठ्या प्रमाणात गुटख्याची अवैधपणे विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना होताच त्यांच्याकडून कारवाई करण्यात आली. यात दीड लाख रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला. ही कारवाई मंगळवार दिनांक ५ रोजी उशीरा करण्यात आली. गोपाल नासरे व अमोल झोरे अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. कारंजा परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध गुटखा विक्री करण्यात येत असल्याची माहिती पोलिस विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना प्राप्त झाली. यावरून स्थानिक पोलिसांनी […]

Read More

तलाठी परीक्षेतसुध्दा घोळच..१० लक्ष द्या तलाठी व्हा…

छत्रपती संभाजीनगर – वनरक्षक पदाच्या परीक्षेत शहरात सहा घोटाळे समोर आले आहेत आता तलाठी परीक्षेतही घोटाळेबाजांचे रॅकेट सक्रिय झाले असून थेट परीक्षा केंद्रातच उत्तरे पुरवली जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली असुन राजू भीमराव नागरे (२९, रा. कातराबाद) असे त्याचे नाव आहे. मंगळवारी सायंकाळी साडेचार वाजता चिकलठाण्यातील ईऑन डिजिटल परीक्षा केंद्राबाहेर तो परीक्षार्थीला उत्तरे पुरवण्याच्या […]

Read More

यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेने पांढरकवडा येथील कुख्यात आरोपीस केले हद्दपार….

यवतमाळ– पोलिस ठाणे पांढरकवडा हद्दीतील रामदेवबाबा ले आउट पांढरकवडा येथे वास्तव्यास असलेला इसम नामे विकेश ऊर्फ विक्की विठ्ठलराव देशट्टीवार वय ४१ वर्षे याचा गुन्हेगारी प्रवृत्तीचा अभिलेख २०१३ सालापासुन असुन त्याचे विरुध्द पांढरकवडा पोलिस स्टेशनचे कार्यक्षेत्रात लोकसेवक यांचेवर हमला करणे, शासकीय कार्यालयामध्ये जावुन हमला करणे व शांतता भंग करणे, शासकीय कामकाजामध्ये अडथळा करणे, शासकीय वस्तु चोरी करणे, दंगली करणे, […]

Read More

जिवंत काडतुस,गावठी कट्टा व चोरलेल्या मोटारसायकलसह आरोपीस अटक….

लातूर – जिल्हा पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी जिल्ह्यात अवैध शस्त्र बाळगणाऱ्या इसमावर कारवाई करण्याबाबत आदेशित केले होते. त्याअनुषंगाने पोलिस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलिस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस ठाणे स्तरावर विशेष पथके नेमून कार्यवाही करण्यात येत होती. त्यानुसार उपविभागीय पोलिस  अधिकारी लातूर शहर भागवत फुंदे यांचे मार्गदर्शनात पोलिस ठाणे एमआयडीसी पोलिस […]

Read More

चोरीच्या दुचाकीमुळे फुटले प्रेमाचे बिंग, मजनुसह पाच पोलिसांच्या जाळ्यात

अहमदनगर : एकाच महिलेवर दोघे भाळले अन् प्रेमाचा त्रिकोण तयार झाला. मात्र, प्रेमात अडसर ठरत असल्याने त्यातील एकाने दुसऱ्या ‘मजनू’चा काटा काढण्यासाठी सुपारी दिली. सहा जणांच्या टोळीने त्याला धमकावत मारहाण केली आणि चोरीचा बनाव करण्यासाठी दुचाकी व रोख पळविली होती. ‘एलसीबी’ने सुपारी देणाऱ्या मजनूसह पाच जणांच्या मुसक्या आवळल्या. तीन वर्षांपूर्वी घडलेल्या गुन्ह्याचा उलगडा झाला पण […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!