वरोरा पोलिसांचा सट्टा जुगारावर छापा….

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

वरोरा पोलिसांचा सट्टा जुगारावर छापा,३२ जुगारींना घेतले ताब्यात….

वरोरा(चंद्रपूर) प्रतिनिधी – पोलिस अधिक्षक यांना गुप्त माहितीदाराकडून मिळालेल्या खात्रीलायक गोपनीय माहितीवरून तसेच सदर माहीतीची शहानिशा करुन बेकायदेशीररित्या चालणार्या आकड्यांचा जुगाराचा सट्टा खेळणाऱ्या सट्टेबाजांच्या अड्ड्यावर वरोरा पोलिसांनी छापा टाकून मुद्देमालासह सट्टेबाजांना  पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी फिर्यादी – अनिल मेश्राम, सहायक पोलिस निरीक्षक, पोलिस ठाणे वरोरा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भा.दं.सं. अप ३०५/२०२४, कलम ४ आणि ७ अंतर्गत वरोरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे





या बाबत अधिक माहिती अशी की, पोलिस अधिक्षक, चंद्रपुर यांना पोलिस ठाणे वरोरा हद्दीतील माढेळी येथे आठवडी बाजार, माढळी ता.वरोरा, जि.चंद्रपुर येथे निळया टिनाचे शटर दार असलेल्या बंद दुकानामध्ये मेजर उर्फ सुरेंद्र बळवंत कुळसंगे हा माणसे ठेवून काही इसम लोकांकडुन पैसे घेवुन सट्टा पट्टीची खायवाडी करत आहे. अशा माहीतीच्या ठिकाणी बाजार लाईन, सार्वजनिक मुत्रीघराचे बाजूला असलेल्या अतिक्रमण करून बनविलेल्या एका टीनाचे लोखंडी शटरचे दार असलेल्या दुकानासमोर काही इसम गर्दी करून बसलेले दिसुन आले. त्यापैकी तिन इसम कागदावर पेनाने काही लिखाण करताना दिसुन आले. मिळालेल्या बातमीची खात्री झाल्याने सोबत असलेल्या पोलिस कर्मचारी यांच्या मदतीने सट्टा पट्टीचा जुगार खेळणा-या इसमांना घेराव टाकला परंतु मोकळया जागेचा फायदा घेवुन काही इसम पळून गेले पंरतु लिखाण करणारे इसमांना जागीच ताब्यात घेतले. ताब्यात घेण्यात आलेल्या इसमांना पंचासमक्ष त्यांचे नांव पत्ता विचारून अंगझडती घेतली असता नमूद जप्त मुद्देमाल पंचनामा कारवाई करुन जप्त केला आणि त्यास ताब्यात घेवुन पोलिस स्टेशनला आणुन अधिक विचारपुस केली असता आरोपी २) श्रीकांत किशोर कांबळे, (वय ३९ वर्षे), ३) सतिश किष्णाजी काटकर, (वय ५० वर्षे) ४) अनिकेत पांडूरंग खुळसंगे, (वय २३ वर्षे), सर्व रा.माढळी, ता.वरोरा, जि.चंद्रपुर हे काम मेजर उर्फ सुरेंद्र बळवंत कुळसंगे, (वय ४५ वर्षे), रा.विठ्ठल मंदीर वार्ड, माढेळी, ता.वरोरा, जि.चंद्रपुर यांच्या सांगणेवरून करतो आणि ३००/-रू. रोज घेतो असे सांगीतले तसेच तसेच तेथे सट्टा-पट्टी लावायला येणा-या पळून गेलेल्या लोकांबाबत विचारपुस केली असता लगवडी करणारे २८ आरोपींचे व इतर २०:२५ अनोळखी इसम असल्याचे सांगितले. त्यांना ओळख पटवून सदर गुन्हयात अटक करण्यात आली आहे.



आरोपी १) श्रीकांत किशोर कांबळे, (वय ३९ वर्षे), २) सतिश किष्णाजी काटकर, (वय ५० वर्षे) ३) अनिकेत पांडूरंग खुळसंगे, (वय २३ वर्षे), सर्व रा.माढळी, ता.वरोरा, जि.चंद्रपुर हे काम ४)मेजर उर्फ सुरेंद्र बळवंत कुळसंगे, (वय ४५ वर्षे), रा.विठ्ठल मंदीर वार्ड, माढेळी, ता.वरोरा, जि.चंद्रपुर यांचे सांगण्यानुसार स्वतःच्या आर्थिक फायदयाकरिता लोकांकडुन अंक आकडयावर पैशाची बाजी लावुन कल्याण व मिलन नावाचा सट्टा-पट्टीचा हार जीतचा जुगार खायवडी करताना एकुण २३,९७५/-रू च्या मुद्देमालसह मिळुन आले. तसेच सट्टा-पट्टी लावणारे पळून गेले तरी त्याचे हे कृत्य कलम ४,५ महाराष्ट्र जुगार कायदया प्रमाणे होत असल्याने नमुद आरोपी विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या वर नमुद ४ आरोपी व्यतिरिक्त सट्टापट्टी लगवाडी करणारे – ५) बाळकृष्ण बालपांडे ६) पुंडलिक घटे ७) कैलाश पंधरे, ८) विलास गळमळे, ९) नेमीनाथ चौधरी १०) मारोती नागपुरे ११) पंकज तडस १२) दिनकर ठाकरे १३) शेख रमजान १४) निकुरे मिस्त्री १५) अनिल पाटील १६) अविनाश १७) महेश तडस सर्व रा. माढळी ता. वरोरा जि. चंद्रपुर १८) सोनु जवादे रा. शेकापुर ता. हिंगणघाट १९) शंकर साळवे रा. खरवड २०) वसंता कन्नाके २१) रमेश थोटे रा. वंदली २२) सुधाकर पवार २३) धर्मा घोसले रा.पारधी टोला, यवती २४) श्रीहरी प्रगतीई रा. वाघनख २५) समीर आयुदकर २६) श्रीभाऊ तुराणकर दोन्ही रा.वडगाव २७) पाणील पाटील रा.धानोरा २८) विलास बल्की रा.बोरी २९) विनोद जवादे ३०) प्रमोद धोटे दोन्ही रा.आमडी ३१) दिलीप पाजारे ३२) सोनु हिवरकर दोन्ही रा.निलजई व इतर २०-२५ अनोळखी इसम यांचेवर सुध्दा गुन्हा दाखल करण्यात आला असुन त्यांचे ताब्यातुन



१) – १) सटट्टापटट्टी ज्यावर अंक आकडे लिहीलेले ०४ नग, कि.अं. ००.००/-रू २) एक पेपर पॅड,कि.अं.२०/- रू ३) एक पेन कि. अं. ५/-रू. ४) रोख रक्कम ४,१००/- रू. ५) रेड भी कंपनीचा अँड्रॉइड मोबाईल कि.अं.५,५००/- रू. असा एकुण ९,६२५/- रू. चा मुद्देमाल

२) – १) सटदा पट्टी ज्यावर अंक आकडे लिहीलेले ०२ नग, कि.अं. ००.००/- रू. २) एक पॅड, कि,अं.२०/- रू ३) एक पेन कि.अं. ५/- रु ४) रोख रक्कम ३,४००/- रू. ५) नोकिया कंपनीचा कि-पॅड मोबाईल कि.अं.१,५००/- असा एकुण ४,७२५/- रु.मुद्देमाल

३) – १) सटट्टा पट्टी ज्यावर अंक आकडे लिहीलेले ०१ नग, कि. अं. ००.००/- रू. २) एक पॅड, कि.अं.२०/-रू ३) एक पेन कि. अं. ५/-रू. ४) रोख रक्कम ३,२००/-रू. ५) सॅमसंग कंपनीचा अँड्रॉइड मोबाईल कि.अं.६,५००/- रू. असा एकुण ९,७२५/-रू.चा मुद्देमाल

४) – १) रोख रक्कम २,३००/रू. २) नोकिया कंपनीचा मोबाईल, कि.अं. १,५००/- रु. असा एकुण ३,८००/- रु. चा मुद्देमाल

५) – १) टिनाचे शेडमध्ये असलेले पाण्याचे दोन कॅन जुने वापरते प्रत्येकी कि. अं. ३००/- रू. असा एकुण ६००/-रू, २) दोन लोखंडी बाक/टेबल जुने वापरते प्रत्येकी किंमत १०००/-रू. प्रमाणे २०००/-रू.असा एकुण एकुण २,६००/-रू. चा मुद्देमाल असा एकुण ३०,४७५/-रू चा सट्टा पटट्टी खायवाडीचा मुद्देमाल हा जप्त करण्यात आला आहे.

सदरची कारवाई ही पोलिस अधिक्षक मुमुक्का सुदर्शन, अपर पोलिस अधिक्षक, रिना जनबंधु, सहा पोलिस अधिक्षक तथा उपविभागिय पोलिस अधिकारी,वरोरा नवोमी  साटम, स यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक अमोल काचोरे तसेच सपोनि अनिल मेश्राम, पो.अं. महेश गावतुरे, फुलचंद लोधी ज्ञानेश्वर मडावी, आदींनी केली आहे.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!