
बल्लारशहा येथील जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा,११ जुगारी ताब्यात…
बल्लारशाह येथील पेपरमील च्या मागील वर्धा नदीच्या काठावरील जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा, 1,78,300/रू चा माल केला जप्त…,
बल्लारशाह(चंद्रपुर)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांचे आदेशानुसार दि. 11 एप्रिल 2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पोस्टे बल्लारशाह हद्दीत पेट्रोलींग करीत असतांना पथकास गोपनीय माहीती मिळाली की बल्लारशाह पेपरमीलच्या मागे, वर्धा नदीच्या काठी निखील रणदिवे रा. बल्लारशाह हा इसम काही इसमांना सोबत घेऊन 52 ताशपत्याचा कट पत्याचा जुगार खेळत आहे अशा मिळालेल्या गोपनीय माहीती वरून सदर ठिकाणी स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने सापळा रचुन छापा मारला असता, घटनास्थळावर चंद्रपूर, राजुरा, बल्लारशा येथील राहणारे एकुण ११ इसम जुगार 52 ताश कट पत्ता गेम खेळत असतांना मिळुन आले.


तसेच जुगाराचे डावावर व त्यांचे अंगझडतीत एकुण 1,78,300/ रू मुद्देमाल मिळुन आला. सदर अकरा आरोपींना ताब्यात घेवुन त्यांचे विरूद्ध पोस्टे बल्लारशाह येथे अप क 267/2025 कलम 12(अ) महाराष्ट्र जुगार कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. पुढील तपास पोस्टे बल्लारशाह करीत आहे.

सदरची कार्यवाही पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन,अपर पोलिस अधिक्षक रिना जनबंधु यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अमोल काचोरे, स्थानिक गुन्हे शाखा यांचे नेतृत्वात स्था.गु.शा.चे पोलिस उपनिरीक्षक, विनोद भुरले, मधुकर सामलवार, संतोष निंभोरकर, गौरकार, सफौ. करकाडे, पो. हवा. सतिश अवथरे, रजनिकांत पुठ्ठावार, नितीन कुरेकार, पोशि प्रशांत नागोसे, शशांक बादमवार, प्रफुल गारघाटे यांनी केली आहे.



