
चंद्रपुर शहरात अवैधरित्या गुटख्याची साठवणुक व विक्री करणारा गुन्हे शाखेच्या ताब्यात….
स्थानिक गुन्हे शाखेचा चंद्रपुर शहरातील दत्त नगरात अवैधरित्या महाराष्ट्रात प्रतिबंधित अशा सुगंधीत तंबाखु/गुटखा विक्रेत्यांवर छापा, 7,58,096 रू. चा अवैद्य सुगंधीत तंबाखु/गुटखा जप्त…


चंद्रपुर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलिस अधिक्षक यांनी स्थानिक गुन्हे शाखचे पोलिस निरीक्षक महेश कोंडावार यांना तसेच जिल्ह्यातील सर्व प्रभारिंना आदेशीत केले होते

त्याअनुषंगाने पोलिस निरीक्षक महेश कोंडावार यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांना शहरात प्रभावी पेट्रोलींग करून अवैध्यरित्या सुगंधीत तंबाखु विक्री करणाऱ्यांवर कार्यवाही करण्याचे निर्देश दिल्याने दिनांक 08/10/2024 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक रामनगर पोलिस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत असतांना गोपनीय बातमीदाराकडुन मिळालेल्या माहीती वरून एक ईसम अवैधरित्या सुगंधीत तंबाखु/गुटख्याची अवैधरीत्या साठवणुक व विक्री करीत आहे यावरुन स्थागुशा चे अधिकारी व कर्मचारी यांनी प्रेमकुमार बाबुराव बेले वय 50 वर्ष, धंदा-पान मटेरीअल विक्री. दत्त नगर नागपुर रोड ता. जि. चंद्रपुर हा आपले पान मटेरिअलचे दुकाणात व घरी दत्त नगर नागपुर रोड ता. जि. चंद्रपुर यांचे घरी छापा मारला असता दुकाणामध्ये व घरी अवैध्यरित्या सुगंधीत तंबाखु मिळुन आला.

असा एकुण मुददेमाल 7,58.096/-रू. चा माल जप्त करून आरोपी विरूध्द पो.स्टे. रामनगर येथे अपराध कमांक 932/2024 कलम 223, 275, 123 भारतीय न्याय संहिता 2023, सहकलम 30 (2), 26(2) (प), 26 (2) (पअ), 59 अन्न सुरक्षा आणी मानके अधि. गुन्हा नोंदकरण्यात आला आहे.
सदरची कार्यवाही पोलिस अधिक्षक मुमक्का सुदर्शन,अपर पोलिस अधिक्षक रिना जनबंधु यांचे आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक महेश कोंडावार यांचे मार्गदशनात पोउपनि. संतोष निभोरकर, पोउपनि. विनोद भुरले, पो.हवा. जयंत चुनारकर, नितेश महात्मे, चेतन गज्जलवार, पोशि किशोर वाकाटे, अमोल सावे, प्रफुल गारघाटे, चापोहवा दिनेश अराडे यांनी केली आहे.


