अवैधरित्या विक्रीकरीता गांजा बाळगणारे स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

अवैधरित्या गांजाची तस्करी करणा-या ३ आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने नाकाबंदी करुन घेतले ताब्यात…

चंद्रपुर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,चंद्रपुर जिल्ह्यामधे पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांचे मार्गदर्शनाखाली अवैध ड्रग्स, गांज्या विक्री करणा-या विरुद्ध धडक मोहीम चंद्रपुर पोलिसांचे वतीने चालु आहे. त्या मोहीमेच्या अनुषंगाने पोलिस अधिक्षक मुम्मुका सुदर्शन यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक महेश कोंडावार यांचे नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे पथक स्थापन केले असुन सदर पथकाचे माध्यमातुन मोठया प्रमाणात अवैधरित्या ड्रग्स / गांज्याची विक्री करणा-याची माहिती काढुन त्यावर कारवाई सुरू आहे.





त्यानुसार दिनांक ०६/०९/२०२४ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथकास गोपनिय बातमी मिळाली की,श्रीनिवास उर्फ सिक्कंदर विकल गुतकोंडावार, वय ३६ वर्ष, धंदा-मजुरी, रा. उर्जाग्राम ताडाली, चंद्रपुर, २) लतीश उर्फ लतिफ बंडु निवलकर, वय-१९ वर्ष, रा. आंबेडकर चौक, चंद्रपुर, ३) इरफान उर्फ भु-या इजाईल खान वय-३२ वर्ष, धंदा पानठेला, रा. बगडखिडकी, चंद्रपुर हे नागपुर वरून चंद्रपुर येथे त्यांचे ताब्यातील मोपेड गाडी क्रमांक एम. एच. ३४ बी.क्यु. ४५५९ नी अवैधरित्या गांज्याची वाहतुक करीत आहे अशा गोपनीय माहीती वरून स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने पोलिस स्टेशन भद्रावती हद्दीत नागपुर ते चंद्रपुर हायवे वरील मौजा सायवन गावाजवळील पंजाबी धाब्या समोर नाकाबंदी केली



तसेत मिळालेल्या माहीती प्रमाणे वरील आरोपींना मोपेड गाडीसह ताब्यात घेवुन झडती घेतली असता त्यांचेकडे एका नॉयलान थैलीमध्ये गांजा वनस्पतीचे पाने/फुले/बियांचे वजन ५,८४९ किलो ग्रॅम अंदाजे किमंत अंदाजे ९०,०००/- रू. तसेच पांढ-या रंगाची होंडा मोपेड गाडी क्रमांक एम. एच. ३४ बी. क्यु. ४८५९ किमंत ८०,०००/- असा एकुण १,७०,०००/- रू. चा माल मिळुन आल्याने सदर तिन्ही इसमांविरूध्द एन.डी.पी.एस. अॅक्ट प्रमाणे पोलिस स्टेशन, भद्रावती येथे गुन्हा दाखल करण्यात आला



सदर कार्यवाही पोलिस अधिक्षक  मुम्मका सुदर्शन,अपर पोलिस अधिक्षक रिना जनबंधु, यांचे मार्गदर्शनाखाली स्थागुशा  पोलिस निरीक्षक महेश कोंडावार, यांचे नेतृत्वात पोउपनि विनोद भुरले, पोउपनि मधुकर सामलवार, पोहवा किशोर वैरागडे,सतिश अवथरे, नापोशि संतोष येलपुलवार, पोशि नितीन रायपुरे,गोपाल आतकुलवार,गोपीनाथ नरोटे, अमोल सावे,प्रफुल गारघाटे, शशांक बदामवार, चापोहवा दिनेश अराडे सर्व स्थानिक गुन्हे शाखा, येथील अधिकारी व कर्मचारी यांनी केली आहे.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!