
MD अंमली पदार्थासह स्थानिक गुन्हे शाखेने तिघांना घेतले ताब्यात,
अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या इसमांकडून चारचाकी वाहनासह ९,४०,७६०/- रू. चा एम.डी. (मेफॉड्रॉन) पावडर जप्त स्थानिक गुन्हे शाखेची कार्यवाही….
चंद्रपुर(प्रतिनिधी)- याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,चंद्रपुर जिल्ह्यामध्ये पोलिस अधिक्षक मुमक्का सुदर्शन, अपर पोलिस अधिक्षक रिना जनबंधु यांच्या मार्गदर्शनाखाली अवैधरित्या होणारी मद्य विक्री तसेच ती करणाऱ्याविरोधात धडक मोहीम चंद्रपुर पोलीसांच्या वतीने चालू आहे. त्याच मोहीमेच्या अनुषंगाने पोलिस अधिक्षक . मुमक्का सुदर्शन, अपर पोलिस अधिक्षक, चंद्रपुर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्ष्क महेश कोंडावार यांचे नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे पथक स्थापन करुन सदर पथकाच्या माध्यमातुन मोठ्याप्रमाणात अवैधरित्या अंमली पदार्थाची ची विक्री करणाऱ्यांची माहिती काढून त्यावर कारवाई सुरू आहे.


त्यानुसार दि १९ फेब्रुवारी रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास गोपनिय माहिती मिळाली की, दिपक आसवानी, रा. सिंधी कॉलनी, रामनगर चौक, चंद्रपुर हा याचेसोबत दोन इसमांना घेऊन दिपक असावानी याची पांढऱ्या रंगाची मारूती सुझुकी कंपनीचे चारचाकी वाहन क्रमांक एम.एच. ३४ बी.व्ही. ४४४७ मध्ये एम.डी. (भेफोड्रॉन) पावडर घेवून विक्रीकरीता बगलखिडकीकडून रयतवारी परिसर चंद्रपुर येथे जाणार आहे.

सदर माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेचे पथक रवाना होवून रयतवारी परिसरातील निमवाटीका परिसरात सापळा रचुन दबा धरून बसून राहून मिळालेल्या माहितीमधील चारचाकी वाहन येताच चारचाकी वाहनाचा पाठलाग करून निमवाटीकेजवळ गाडी थांबवून गाडीतील इसमांना ताब्यात घेतले त्याची झडती घेतली असता त्याचेजवळ २३.४६ ग्रॅम एम.डी. (मेफेड्रॉन) पावडर किंमत १,४०,७६०/- रू. तसेच पांढऱ्या रंगाची मारूती सुझुकी कंपनीची चारचाकी वाहन क्रमांक एम.एच. ३४ बी.व्ही. ४४४७ किंमत ८,००,०००/- असा एकूण ९,४०,७६०/- रू. चा मुद्देमाल मिळून आल्याने सदर इसमाचे विरूद्ध कलम ८ (क), २१ (ब), एन.डी.पी.एस. प्रमाणे पोलिस स्टेशन रामनगर येथे गुन्हा दाखल करण्यात आला.तसेच यातील आरोपी १) मालु ऊर्फ नसीब आरीफ खान, वय २८ वर्ष, रा. रझा चौक, बगलखिडकी, चंद्रपुर २) दिपक अशोककुमार आसवानी, वय ३२ वर्ष, रा. सिंधी कॉलनी, रामनगर चौक, चंद्रपुर ३) जमीर शाबीर शेख, वय २२ वर्ष, रा. बगलखिडकी, चंद्रपुर यांना ताब्यात घेण्यात आले

सदरची कामगिरी पोलिस अधिक्षक मुमक्का सुदर्शन, अपर पोलिस अधिक्षक रिना जनबंधु यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक महेश कोंडावार यांचे नेतृत्वात सपोनि. दिपक काँक्रेडवार, पोउपनि, विनोद भुरले, पोउपनि. मधुकर सामलवार, पोउपनि. सुनिल गौरकार, सफौ. धनराज करकाडे, पोहवा. सुभाष गोहोकार, पोहवा. रजनीकांत पुठ्ठावार, पोहवा. सतिश अवथरे, पोहवा. दिपक डोंगरे, पोशि. प्रशांत नागोसे, किशोर वकाटे, अमोल सावे, शशांक बदामवार, चापोहवा. दिनेश आराडे स्थागुशा चंद्रपुर यांनी केली आहे.


