
प्रतिबंधीत नायलॅान मांजाची विक्री करणाऱ्यास स्थानिक गुन्हे शाखेने घेतले ताब्यात…
मकरसंक्रांती निमित्त सर्वत्र पतंगोत्सव सुरू झाला आहे. मात्र त्यासाठी बंदी असलेल्या नायलॉन मांजाची विक्री सुरूच आहे. त्यामुळे मानवांसह पक्षांचाही जीव धोक्यात येत असल्याने पोलिसांनी बंदी असलेल्या नायलॉन मांजा विक्रीवर करवाईचा बडगा उगारला आहे. या मध्ये पोलिसांनी मांजा विक्री करणाऱ्या आरोपीला अटक करून ५० हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे…
चंद्रपूर (प्रतिनिधी)- सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक चंद्रपूर यांनी अवैध नॉयलॉन मांजा विकी करणाऱ्या विरुध्द कार्यवाही करण्या करीता मोहीम राबवीन्याबाबत आदेशीत केले होते. त्या वरून दिलेल्या निर्देशाप्रमाणे पोलिस निरीक्षक महेश कोंडावार स्थानिक गुन्हे शाखा यांनी पो.उप नि. अतुल कावळे यांचे पथक तयार करुन, (दि.07जानेवारी) रोजी पोलिस स्टेशन राजुरा हद्दीत वार्ड नं ०७, गांधी भवन, राजुरा मध्ये राहनारा राजेश सुधाकर येरावार हा त्याचे गायत्री किराणा दुकान मध्ये महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत नायलॉन मांजाची साठवणुक करून विकी करीत आहे. अशा मिळालेल्या खबरेवरुन कारवाई करत. आरोपी नामे


राजेश सुधाकर येरावार, (वय ५३ वर्ष), चंदा गायत्री किराणा दुकान रा.वार्ड नं.०७, गांधी भवन, राजुरा जि.चंद्रपुर

याला ताब्यात घेवुन त्याचे कडुन MONO KITE कंपनीची चक्री असलेला नॉयलॉन मांजा प्रतिनग कि अं.८००/-रू. २६ नग, TUN TUN कंपनीची चक्री असलेला नॉयलॉन मांजा प्रतिनग कि. अं.७००/-रू.१८ नग, GO INDIA GO कंपनीची चक्री असलेला नायलॉन मांजा प्रतिनग कि अं ७००/- रू. २४ नग असा एकूण ५०,२००रु. माल जप्त करण्यात आला आहे.

यातील आरोपी नामे राजेश सुधाकर येरावार, (वय ५३ वर्ष), रा.राजुरा, जि.चंद्रपुर विरूध्द (दि.07जानेवारी) रोजी पोलिस स्टेशन राजुरा येथे अप कमांक 09/24 कलम ५,१५ पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ सह कलम १८८ भा.द.वि.अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदरची यशस्वी कामगीरी पोलिस अधिक्षक चंद्रपूर अप्पर पोलिस अधिक्षक चंद्रपूर यांचे मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक महेश कोंडावार, स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर, पोलिस उप निरीक्षक अतुल विनायक कावळे, पोहवा अनुप डागे,जमिर पठाण, मिलींद चव्हाण, नितेश महात्मे, सर्व स्था.गु.शा. चंद्रपुर यांनी केली आहे.


